Wednesday, January 21, 2009

देशाच्या तरुणांना राष्ट्रउभारणीसाठी सहभागी करा!

मुंबईवर अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर मुंबई विद्यापीठ, एस.एन.डी.टी. विद्यापीठ व यशवंतराव मुक्त विद्यापीठ या तिन्ही विद्यापीठांच्या वतीने २० डिसेंबर २००८ रोजी मुंबईतील शिवाजी पार्क येथे सलोखा सभेचे आयोजन करण्यात आले. मुंबई, ठाणे व नवी मुंबईतील सुमारे दीड लाख विद्यार्थी, तसेच महाराष्ट्रातील १२ विद्यापीठांचे कुलगुरू आणि १८ शहिदांची कुटुंबे त्या सभेला आली. सर्व विद्यापीठांनी या प्रकरणी वेगळ्या दृष्टिकोनातून नवा अभ्यासक्रम सुरू करावा अशी सूचना सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंना महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल एस. सी. जमीर यांनी केले. राज्यपालांनी उपस्थित असलेल्या सर्व तरुणांना दहशतवादाविरुद्ध लढण्याची शपथ दिली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, देशावर आलेल्या अशा प्रकारच्या संकटांना तोंड देण्यासाठी एखाद्या राज्यपालांनी व कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना एकत्र करून त्यांना देशाच्या प्रश्नावर काम करायला आवाहन करण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असावी! म्हणून सर्वप्रथम ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्यांचे, राज्यपालांचे, उपस्थित असलेल्या कुलगुरूंचे व सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन व धन्यवाद!
  (संपुर्ण लेख वाचण्यासाठी लेखाच्या शिर्षकावर क्लिक करा...........)

Friday, January 9, 2009

सत्याचा मार्ग स्वीकारा! सत्यमचा नव्हे!!

जानेवारी २००९- नवीन वर्ष! आपण टीव्हीवर चॅनेल्स बदलावीत तसे नियतीने २००८ मध्ये वेगवेगळ्या घटना घडवल्या! जे होत आहे ते चांगल्यासाठीच ही म्हण तर २००८ ने साफ खोटी ठरवली. देशांतर्गत आणि बाहेरच्या जगात खूप मोठय़ा घटना घडल्या व त्या खूप वेगाने घडल्या. काही घटनांचे विश्लेषण आपण करू शकू तर काहींचे करता येणार नाही, अशा घटना फक्त धडे शिकवण्यासाठीच होत असतात असे समजायचे आणि पुढे जात राहायचे. जगात सुरक्षित असे काहीही नाही व कुठलीही गोष्ट ही ‘कायम’ स्वरूपाची नसते!