Monday, April 27, 2009

मराठी उद्योजगत - प्रगतीचा एक्सप्रेस वे!

मराठी उद्योग जगत : प्रगतीचा एक्स्प्रेस वे!भारतातील १०० अग्रगण्य कंपन्यांच्या ‘मोस्ट पॉवरफुल’ सीईओंची यादी नुकतीच एका इंग्रजी दैनिकाने प्रसिद्ध केली त्यात पहिल्या क्रमांकावर टाटा उद्योगसमूहाचे रतन टाटा, तर दुसऱ्या क्रमांकावर रिलायन्सचे मुकेश अंबानी आणि तिसऱ्या क्रमांकावर इन्फोसिसचे नारायण मूर्ती आहेत। अशा या यादीत फक्त एकच मराठी नाव सापडलं आणि ते म्हणजे हिंदुस्तान लिव्हरचे नितीन परांजपे, त्यांचे सर्वात प्रथम अभिनंदन! गेल्या वर्षी सीटी बँकेचे ग्लोबल सी.ई.ओ. म्हणून विक्रम पंडितांचं नाव खूप गाजलं. १०० सीईओंच्या यादीत फक्त एकच मराठी नाव असल्यामुळे वाईट वाटलं, आणि त्याहीपेक्षा अधिक दु:खद वस्तुस्थिती अशी की या शंभर भारतीय अग्रगण्य कंपन्यांच्या यादीमध्ये एकाही मराठी उद्योगसमूहाचा समावेश नाही! एकेकाळी भारतीय उद्योगसमूहांचा उल्लेख करताना आपण टाटा, बिर्ला आणि किर्लोस्कर असा करत होतो, तर गेल्या काही वर्षांपासून फक्त टाटा, बिर्ला आणि रिलायन्स असाच करतो. काही नवीन नावेही आपण घेतो ती म्हणजे इन्फोसिस, HDFC, ICICI Bank, पॅन्टलून रिटेल यात सुद्धा एकाही मराठी नाव दिसत नाही! असं जरी असलं तरी गेल्या काही वर्षांत ज्या मराठी टॉप मॅनेजर्सशी आणि उद्योगपतींशी माझा कामानिमित्ताने जवळून संबंध आला, तेव्हा मला एक गोष्ट प्रकर्षांने जाणवली की, मराठी टॉप मॅनेजर्स आज उद्योजक आणि मोकळ्या मनाने चर्चा करायला तयार आहेत, बदलायला तयार आहेत आणि हीच मानसिकता मला वाटतं मोठय़ा यशाची नांदी आहे! येत्या १० वर्षांत ‘मोस्ट पॉवरफुल’ सीईओंच्या यादीमध्ये किमान १० सीईओ हे मराठी टॉप मॅनेजर्स असायला हवेत, आणि भारतीय १०० अग्रगण्य कंपन्यांच्या यादीमध्ये किमान पाच मराठी उद्योगसमूहांचा तरी समावेश असायला हवा। निदान त्या दृष्टीने प्रयत्न तरी व्हायला पाहिजेत।  (संपुर्ण लेख वाचण्यासाठी लेखाच्या शिर्षकावर क्लिक करा...........)