Monday, June 22, 2009

मुंबईच्या पुनर्विकासात मराठी माणसांच्या घरा साठी ९०:१० चा फॉम्र्युला वापरा

येत्या ५० वर्षात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र जर टिकवायचा असेल, तर मुंबईतल्या मराठी माणसांच्या हातात चांगल्या प्रमाणात आर्थिक सत्ता, अधिकार आणि मुख्य म्हणजे हक्काचं घर येणं महत्त्वाचं व आवश्यक आहे! पारसी समाजाने १९३४ पासून त्यांच्या लोकांसाठी घरे बांधली, काल बोहरी समाजाचे धर्मगुरू सैयदना यांनी संपूर्ण भेंडीबाजारात त्यांच्या लोकांसाठी २५,००० हजार घर बांधण्यासाठी प्लॅन तयार केला. त्याच्यापाठोपाठ मुंबईशी काडीचाही संबंध नसलेल्या परप्रश्नंतीयांसाठी १९९५ नंतर आता २००० सालापर्यंतच्या झोपडय़ांना संरक्षण देण्याची घोषणा सरकार करण्याच्या तयारीत आहे. मुंबईत प्रत्येक समाजाने त्यांच्या लोकांसाठी आणि झोपडपट्टय़ांच्या माध्यमातून परप्रश्नंतियांना राहायची व्यवस्था केली. फक्त मेला तो मुंबईतला मराठी माणूस कारण त्याच्यासाठी कुणी सैयदना व्हायला तयार नाही!

Monday, June 8, 2009

जय महाराष्ट्र!


१ मे २००९ रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापनेला ४९ वर्षे पूर्ण होऊन महाराष्ट्राने ५०व्या वर्षांत पदार्पण करीत असताना राज्याच्या माहिती आणि नियोजन विभागाने सादर केलेल्या आर्थिक पाहणी अहवालात महाराष्ट्र राज्याच्या अर्थव्यवस्थेवर जागतिक मंदीचा मोठा परिणाम झाल्याचा निष्कर्ष काढला. शेती व औद्योगिक उत्पादनातही मोठय़ा प्रमाणात घट झालेली आहे. त्यात दाखवलेली खरी


धक्कादायक बाब म्हणजे गेल्या तीन दशकांत मराठी माणसांची राज्यातील टक्केवारी जवळपास आठ टक्क्यांनी घसरून ६८.८ वर आलेली आहे, त्या वेळी हिंदी भाषिकांची लोकसंख्या दुपटीहून अधिक म्हणजे पाच टक्क्यावरून ११ टक्क्यांवर गेली आहे. जशा संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या कटू आठवणी अजूनही विसरता येत नाहीत, त्यातच वरील आकडेवारीने आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. पण त्यापेक्षाही दु:खद गोष्ट कोणती असेल तर गेली ४९ वर्षे आपल्या तथाकथित विचारवंतांनी आपल्या समाजाविषयी काही अतिशय नकारात्मक प्रतिमा निर्माण करून ठेवल्या आहेत व त्या त्रिकालाबाधित सत्य असल्यासारख्या आपण त्यांनाच कवटाळून बसलो आहोत. मराठी माणूस चाकरमानी आहे, नव्हे त्याची प्रवृत्तीच चाकरमानीपणाची आहे, उद्योगात पडण्याची त्याची इच्छा नसते, गाव सोडून कुठे जात नाही, त्याला इतर समाजातील लोक ‘डाऊन मार्केट’ समजतात. तसेच सतत आपणच आपल्या मराठी बांधवांना आळशी, संकुचित वृत्ती असलेला, मराठीपणाविषयी आणि भाषेविषयी न्यूनगंड असलेला म्हणून हेटाळणी करत आहोत. दुर्दैवाने अशा प्रकारचे लेख पन्नास वर्षांनंतर आजही वाचायला मिळतात.

(संपुर्ण लेख वाचण्यासाठी लेखाच्या शिर्षकावर क्लिक करा...........)