Monday, August 17, 2009

यशासाठी घ्या राईट टर्न

देशाच्या पहिल्या १०० उद्योगांच्या यादीत किमान पाच तरी उद्योग मग ते कुठल्याही उत्पादन घेणारे असोत की कुठल्याही सव्र्हिस सेक्टरचे असोत, ते पूर्णपणे मराठी माणसांचे असायला हवेत! आज आपण पाहतो की ५० ते १०० कोटींच्या वर व्यवसाय करणाऱ्या मराठी उद्योजकांना त्यांचा व्यवसाय ३०० ते ५०० कोटींच्यावर वाढवायचा आहे, तसेच लाखाचा व्यवहार करणाऱ्यांना कोटी कोटीचे व्यवहार करायचे आहेत. त्याचबरोबर कित्येक तरुण-तरुणींना आज स्वत:चा उद्योग सुरू करायचा आहे आणि यशासाठी ते वाटेल ती मेहनत करायला तयार आहेत. मुख्य गोष्ट म्हणजे कुणाच्याही मनात आज कुठल्याही प्रकारचा न्यूनगंड दिसत नाही! मग थोडक्यात त्यांचे मुख्य प्रश्न काय ते जरा बघू या?


आज कुणाकडे चांगलं प्रश्नॅडक्ट आहे तर कुणाकडे नवीन प्रश्नॅडक्टस तयार करायची संपूर्ण टेक्नॉलॉजी; कुणाकडे मॅन्युफॅक्चरिंगचं ज्ञान आहे तर कुणाकडे लेटेस्ट मशिनरी आहे; कुणाकडे जुने नावाजलेले ‘ब्रॅण्ड’, तर कुणाच्या डोक्यात एक चांगलं आकर्षक ब्रॅण्ड बनवण्याची कल्पना; काहींकडे चांगले टेक्निकल ज्ञान आहे तर काही अनुभवाने श्रीमंत; काही पारंपरिक व वडिलोपार्जित व्यवसाय करताहेत तर कुणाकडे अगदी वेगळी व नवीन सेवा देण्याची कॉन्सेप्ट; कुणाचे नुसतेच पेपर वर्क तयार आहे, तर काहींचं प्रश्नेजेक्ट अजून फक्त त्यांच्या मनातच घोळत आहे; महिला उद्योजकांचे काही मूलभूत प्रश्न आहेत, काही महिला आर्टिस्ट आहेत, प्रश्नेसेसर आहेत, फॅशन डिझाइनर, कॉम्प्युटर प्रश्नेग्रामर, इंटिरियर डेकोरेटर, आर्किटेक्ट आहेत, तर काही कर्तव्यदक्ष गृहिणी आहेत आणि पण स्वत:चा संसार सांभाळून स्वयंरोजगार कसा उभा करायचा याचे ज्ञान त्यांच्याजवळ नसल्यामुळे त्यांचे धारिष्ट अजून होत नाही; कुणाचे प्रश्नेजेक्ट अध्र्यावर आहेत तर कुणाच्या हातात पुरेसा पैसा नसल्यामुळे प्रश्नेजेक्ट सुरूच झालेले नाही! प्रश्नेजेक्ट टाकले तर मार्केटिंगचे काय करायचं? मूळ भांडवल उभं केले तर उद्या व्यवसायाच्या रोजच्या खर्चासाठी पैसे कसे उभारणार? ब्रॅण्ड आहे तर जाहिरात कशी करायची? जुन्या नावाजलेल्या कंपन्यांना आजच्या स्पर्धेला तोंड कसे देता येईल ही काळजी लागलेली आहे? तरुणांकडे प्रचंड उत्साह आहे पण नेमके काय करावे हेच कळत नाही? कुठून सुरुवात करावी? कुठे जावं? कुणाला विचारावं? अशा एक ना अनेक समस्या! पण आशा सोडलेली नाही, हिंमत आहे, मेहनत करायची तयारी आहे, मनात मोठे होण्याची स्वप्ने आहेत आणि काहीही करून यश मिळवायचेच आहे ही जिद्द!

आज मी मोठे उद्योग किंवा SME असा भेद करणार नाही. व्यवसायाला लागणारे भांडवल, परदेशी गुंतवणूक, टेक्नॉलॉजी, मार्केटिंग, नेटवर्किंग, प्रश्नेडक्टस्, ब्रॅण्डस, अॅडव्हर्टायझिंग, ह्युमन रिसोर्स, परदेशी सहकाराचे करार किंवा इतर कुठल्याही टेक्निकल गोष्टींबद्दल बोलणार नाही. मला वाटतं की, कुठलाही व्यवसाय सुरू करण्याआधी किंवा नंतर येणाऱ्या कुठल्याही संकटांना सामोरे जाण्यासाठी लागणारी मनाची तयारी होणार नाही तोपर्यंत यश मिळणं कठीण आहे. आपल्या मराठी उद्योजकांना एक प्रश्न हमखास पडतो तो म्हणजे मोठे यश मिळवण्यासाठी नेमके काय करायला पाहिजे? इतर समाजातील उद्योजक काय करतात? मी एवढंच म्हणेन की तहान-भूक विसरून आपल्या उद्योगाच्या यशासाठी झोकून देता आले पाहिजे! तुम्हाला पडलेले प्रश्न हे जगात केव्हातरी कुणालातरी पडलेच असणार. तुमचा कदाचित हा पहिलाच अनुभव असेल. मग इतरांनी असेकाय करून त्या प्रश्नावर मात केली आणि यश मिळवलं? प्रश्न आहे तिथं उत्तर हे असणारच! फक्त आपण ते शोधण्यात कमी पडतो, म्हणजे आपण कुठेही मागे नसून, अभ्यासात कुठेतरी कमी पडतो हे लक्षात घ्या! खरं तर यशासाठी अशा कुठल्याही जादूच्या छडीची गरजसुद्धा भासत नाही. शास्त्रोक्त अभ्यासाबरोबरच लागते ती निर्णय घेण्याची क्षमता- योग्य मानसिकता! घेतलेला प्रत्येक निर्णय हा बरोबरच असला पाहिजे असा काही नियम नव्हे, चुकीचा तर चुकीचा पण सगळ्यात पहिले निर्णय घेता येणे महत्त्वाचे आहे!


कित्येकवेळा नुसते पुढे काय होणार या भितीमुळे आपल्याला कुठलाही प्रश्न डोंगराइतका वाटत असतो. काहीवेळा जुने-वाईट अनुभव आपली पाठ सोडत नाहीत म्हणून घबराट होत असते. आपण स्वत:ची तुलना चुकीच्या व्यक्तींशी किंवा परिस्थितीशी करतो व निराश होतो. त्यातच आपल्याजवळची माणसं उत्तर देण्यापेक्षा मूळ प्रश्नासोबत इतर उप-प्रश्न जोडून प्रश्नांची यादी लांबवत जातात, प्रश्नावर प्रश्न विचारून भांडावून सोडतात आणि आपला आत्मविश्वास कमी होत जातो. म्हणून वस्तुनिष्ठपणे कुठल्याही प्रश्नाकडे शांतपणे बघता आलं पाहिजे. अशा एक ना अनेक विचारांच्या जाळ्यात आपण अडकत जातो आणि उत्तर शोधण्यासाठी लागणारी मानसिक क्षमताही आपण घालवून बसतो. अशा अवस्थेत मी एकच सांगेन की प्रश्न कितीही बिकट असला तरी कुठल्याही निर्णयाप्रत येण्यापूर्वी त्यावर आपली प्रतिक्रिया ताबडतोब देऊ नका. कुठलीही नकारात्मक भावना मनात येत असेल तर तिला तिथल्यातिथे थांबवा. कधी कधी उत्तर शोधायचा घाईने प्रश्न आणखी बिकट होत जातात. गेल्या दहा वर्षात सतत टीव्हीवरच्या ब्रेकिंग न्यूज बघायच्या सवयीमुळे कदाचित आपल्यालासुद्धा घाईने उत्तर शोधण्याची सवय लागलेली आहे. मी तर म्हणेन की ब्रेकिंग उत्तरापेक्षा घ्या एक छानसा ब्रेक! प्रत्येक प्रश्न हा त्याच दिवशी सोडवला पाहिजे हा नियम बनवू नका, आणि ‘ये दिन भी जायेंगे’ असे म्हणत वस्तुनिष्ठपणे परिस्थितीचा शांतपणे विचार करा. प्रश्नाच्या उत्तरापेक्षा आपल्याला या गर्तेतून कुठल्याही परिस्थितीत बाहेर पडायचंय आहे अशी मनाशी खूणगाठ मारणं गरजेचे आहे. आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना (गरज वाटल्यास कुटुंबियांनासुद्धा) विश्वासात घ्या आणि प्रत्येकाला त्याचे स्वतंत्र विचार निर्भिडपणे मांडूद्या, कुठलाही किंतु न ठेवता त्यांच्याशी चर्चा करायला हरकत आहे. उत्तर कुठून वा कोणाकडून मिळाले यापेक्षा उत्तर मिळणे हे महत्त्वाचे आहे. जमल्यास एखाद्या त्रयस्थ माणसांबरोबर प्रश्नासंबंधी चर्चा करायचा प्रयत्न केला पाहिजे. अशा प्रकारे जेव्हा आपण आपले प्रश्न नव्याने मांडत जाता तेव्हा आपल्याच नकळतपणे त्याचे उत्तर सापडत जातं.

कित्येक मराठी उद्योजकांशी बोलताना मला त्यांच्यामध्ये आत्मविश्वास कुठेही कमी आढळला नाही. त्यांची विचार करण्याची पद्धतही बऱ्याचदा बरोबर असते. पण त्यांच्याबरोबर सखोल चर्चा करण्यासाठी त्यांच्या क्षेत्रातली जाणकार माणसं त्यांच्याजवळ नसतात. त्यांना थोडे प्रश्नेत्साहन देण्यासाठी व त्यांच्या मेहनतीचे व गुणांचे कौतुक करणारी, आपुलकीचे दोन शब्द बोलणारी हक्काची माणसे चटकन सापडत नाही. मोठे निर्णय घेताना कुणी तरी पाठीवर थाप मारून हो पुढे म्हणणारे हात नसतात! खरं तर आज सर्व क्षेत्रात मराठी माणसे आहेत व त्या त्या क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम करीत आहेत आणि ही माणसे मदत करायलादेखील तयार आहेत; परंतु कदाचित तुम्हाला त्यांची पूर्ण माहिती नसेल. म्हणजे आपण माणसे ओळखण्यात आणि जोडण्यात ‘नेटवर्किंग’मध्येसुद्धा कुठे तरी कमी पडतो हे लक्षात घ्या. ही पोकळी तुम्हाला जाणीवपूर्वक आणि कष्टानेच भरून काढावी लागेल! पुढील काही लेखात नेटवर्किंगच्या संदर्भात मी सविस्तरपणे लिहिणार आहे.

मराठी समाजातील सर्व लहान मोठय़ा उद्योजकांना, तरुण-तरुणींना मी सांगू इच्छितो की, ‘स्वतंत्र व्यवसाय’ करणे ही फक्त गुजराती, मारवाडी किंवा सिंधी वा इतर कुणा एकाच समाजाची मक्तेदारी नाही हे लक्षात घ्या आणि स्वत:ला कुठेही कमी समजू नका. आजच्या आघाडीच्या उद्योजकांची यादी पाहिली तर मी काय म्हणतो हे सिद्ध होईल. आज टॉप उद्योजकांच्या यादीत असलेले रतन टाटा, नारायण मूर्ती, मुकेश अंबानी, सुनील मित्तल, विजय मल्ल्या, कुमारमंगलम बिर्ला हे कुठल्याही एका विशिष्ट जाती किंवा समाजाचे नाहीत. दुसरे, व्यवसायात सुरुवातीच्या काळात किंवा नंतर भेडसावणारे सगळे प्रश्न अगदी टाटापासून रिलायन्सपर्यंत आणि आजच्या आघाडीच्या इन्फोसिसलासुद्धा भेडसावले होते. नव्हे या घटकेलासुद्धा मोठ-मोठे प्रश्न त्यांनासुद्धा भेडसावत आहेत आणि उद्या पण त्यांना कितीतरी जटील समस्यांना सामोरे जावे लागणार आहे! मग तुम्ही कशाला घाबरताय? मला इथं इन्फोसिसच्या जन्माची थोडी माहिती देणे गरजेचे वाटते. १९८१ साली नारायण मूर्तीनी इन्फोसिसची सुरुवात केली तेव्हा त्यांच्याकडे होते एक मोठे स्वप्न आणि खिशात शून्य पैसे! त्यांच्या पत्नी सुधा मूर्तीकडून त्यांनी दहा हजाराचे भांडवली कर्ज घेतले व उद्योजक होण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण केले. मूर्ती कुटुंबांनी १९८२ साली पुण्यात दोन खोल्यांचे घर घेण्यासाठी एचडीएफसीकडून गृहकर्ज घेतले; पण रु. १२२४ चा मासिक हप्ता देण्यासाठी सुधा मूर्तीना रोज चार किलोमीटर चालत जाऊन रिक्षाचे पैसे वाचवत होत्या. त्या काळी श्री. व सौ. मूर्ती रोज एकमेकांना सांगत की आपल्याला काहीही करून गृहकर्ज फेडण्यासाठी किमान १३०० रुपये तरी कमावलेच पाहिजे! त्यानंतरचा इतिहास सर्वाना माहीत आहे.

हे सगळे सांगायचा उद्देश एकच की, कुठल्याही मोठय़ा व्यवसायाची सुरुवातही अशीच छोटय़ा प्रमाणात धडपडत ठेचकाळत होत असते, पण त्यांच्या मागे असते फक्त एक मोठे होण्याचे स्वप्न! आणि भांडवल असते त्यांची जिद्द! वरील कुठल्याही समस्यांनी घाबरून न जाता ‘पॉझिटिव्ह अॅटिटय़ूड’ ठेवून व वस्तुस्थितीला धरून मोकळ्या मनाने आपण कुठलाही प्रश्न बघितला तर त्याचे उत्तर शोधणे केव्हाही कठीण नाही. व्यवसायात किंवा आयुष्यात आपण ज्याला प्रश्न समजतो तो यश मिळण्याच्या आधीचा एक टप्पा आहे जिथे एक राईट टर्न घेता आला पाहिजे!

नितीन पोतदार
कॉर्पोरेट लॉयर/ ९९३०९५४७४७

1 comment:

HAREKRISHNAJI said...

आपला ब्लॉग खुप छान आहे