Monday, September 14, 2009

‘बिझिनेस नेटवर्किंग’ (भाग १) मराठी उद्द्योगजगत प्रगतीचा एक्सप्रेस वे!

कुठल्याही उद्योग किंवा व्यवसायात यशाचं शिखर गाठण्यासाठी लागणाऱ्या शिडीच्या पहिल्याच पायरीला ‘बिझनेस नेटवर्किंग’ म्हणतात! आज ‘बिझिनेस नेटवर्किंग’ हा मार्केटिंगचा एक भाग नसून तो बिझनेस डेव्हलपमेंटचाच एक मुख्य भाग बनला आहे. ‘बिझनेस नेटवर्किंग’ ही संकल्पना आपल्या देशात पूर्वीपासून होती पण साधारणपणे गेल्या दशकात या संकल्पनेला लोकमान्यता मिळाली व मोठय़ा प्रमाणात रुजत गेली. खास करून मराठी उद्योजकांनी आणि व्यावसायिकांनी ‘बिझनेस नेटवर्किंग’ ही संकल्पना अधिक गंभीरपणे घ्यायला हवी. कारण गुजराथी, कच्छी, मारवाडी, सिंधी व इतर समाजांत मोठय़ा प्रमाणात व्यापारी मंडळी फार पूर्वीपासून एकत्र आहेत व एकमेकांना प्रत्येक बाबतीत ते मदत करत असतात. त्या मानाने मराठी समाजात उद्योजकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न फारसे यशस्वी झालेले नाहीत ही फार दुर्दैवी गोष्ट आहे. पण सुदैवाने मराठी समाजातील आजच्या पिढीच्या उद्योजकांत आणि आघाडीच्या प्रश्नेफेशनल्समध्ये मोठय़ा प्रमाणात नेटवर्किंगचे ज्ञान आहे आणि विविध स्तरांवर वेगवेगळ्या माध्यमांतून मराठी माणसं एकत्र येऊन काम करताना दिसतात.