Sunday, January 31, 2010

माझं tweet .....यशाची फॅक्टरी किमान तीन वेळा बघां कारण?३१ जानेवारी, २०१०:  आताच हरिश्चंद्राची फॅक्टरी बघुन आलो; मित्रांनो प्रत्येक मराठी माणसाने सहकुटुंब, शेजारी, मित्र, दुश्मन जे मिळतील त्यांना घेउन किमान तीन वेळा बघायलाच पाहिजे असा आहे!  पहिल्यांदा हा एक मराठी चित्रपट आहे म्हणुन, दुसऱ्यांदा कालच्या मराठी माणसांने काय करुन ठेवलं आहे ते बघण्यासाठी, आणि तिसऱ्यांदा आजचा एक मराठी माणुस काय करु शकतो हे बघाण्यासाठी!!   चौथ्यांदा पण तुम्ही बघालं कारण तुम्हाला तो मना पासुन आवडलेला असेल!लेखक आणि दिगदर्शक प्रकाश मोकाशी, आणि त्यांच्या संपुर्ण टीमचं तोंड भरून कौतुक करायला मात्र विसरू नका!
(जानेवारी २०१० महीन्यातील माझं Tweets वाचण्यासाठी शिर्षकावर क्लिक करा...........)

Wednesday, January 27, 2010

माझं tweet.....Branding India!

२७ जानेवारी, २०१०: काल लोकसत्ता मुंबई वृतांन्त मधे वरील शिर्षकाची एक बातमी वाचली.  मला खुप कौतुक वाटलं. बातमीत म्हटलं आहे की सध्याचा जमाना आहे मार्केटिंगचा, ब्रॅण्डिंगचा. या काळातल्या तरुणांचा दृष्टिकोनही बराचसा व्यावहारिक, औपचारिक आहे.  अगदी आपल्या राष्ट्रीय प्रतिकांबद्दलसुद्धा.  त्याबद्दल त्यांना जरी आदर असला तरी बदलत्या काळानुसार आपल्या राष्ट्रीय प्रतिकांचंही योग्य ‘ब्रॅण्डिंग’ व्हावं, असं त्यांना ठामपणे वाटतं.

कॅम्पस मूड टीमने याच विषयावर तरुणाईशी संवाद साधला, तरूणांची मत वाचण्यासारखी आहेत म्हणुन लिंक देत आहे जरूर वाचा; http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=42834:2010-01-25-15-05-29&catid=41:2009-07-15-03-58-17&Itemid=81  

माझं tweet.....आपणच ‘वातावरणकर्ते’!

२७ जानेवारी, २०१०: माजी राष्ट्रपती व ‘मिसाईल मॅन’ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा ई-मेलद्वारे ‘भवताल’च्या निसर्गायनवरचा प्रतिसाद, २६ जानेवारीच्या दैनिक लोकसत्ता मधे प्रसिद्द झाला तो शब्दशहं खाली देतं आहे. आपण सगळ्यांनी संपुर्ण वाचावं ही आग्रहाची विनंती करण्यासाठी माझं हे आजचं दुसरं ट्विट.....................

"तुम्ही कुठे असलात, काहीही केलं तरी पर्यावरणावर परिणाम करूशकता- मग अगदी घरी, शाळेत, कॉलेजात किंवा कामाच्या ठिकाणी असलात तरी!

Sunday, January 24, 2010

माझं tweet.....मराठी माणसांच्या यशाची फॅक्टरी सुरु.

२४ जानेवारी, २०१०: ........ मराठी चित्रपट सृष्टीला मिळालेलं घवघवीत यश बघुन आपण सर्व सुखावलो नसतो तरच नवल! मराठी माणसांच्या यशाची फॅक्टरी २४x७ चालु राहो!! मराठो का पिक्चर अभी बाकी हैं.......................

थ्री चिअर्स टू ....सर्वोत्कृष्ट अभिनेता - उपेंद्र लिमये; सर्वोत्कृष्ट संगीतकार अजय-अतुल; ‘गंध’चे सचिन कुंडलकर; याशिवाय मराठीतील सवरेत्कृष्ट चित्रपटाचा मान मिळवणारी ‘हरीश्चंद्राची फॅक्टरी’! ‘विठ्ठल’मधील बाल कलाकाराच्या भूमिकेसाठी मराठी बाल कलावंत अनिकेत रुमाडे ज्याला विशेष ज्युरी पुरस्कार मिळाला.

Friday, January 22, 2010

माझं tweet.....IIT & VJTI साकारणार ‘टेकफेस्ट’ n ‘टेक्नोवेन्झा’ Bravo!

२२ जानेवारी, २०१०: IIT मुंबई, VJTI, पाल्र्याचे साठय़े महाविद्यालय यांसारख्या अनेक कॉलेजेस्नी आजची तरुणाई ही फक्त धम्माल मस्ती करण्यातच मश्गुल नाही, तर आपल्या सामाजाबद्दलही तितकीच सजग आहे हे त्यांच्या होणाऱ्या विविध कॉलेज फेस्टिव्हल्समधून सध्या दिसतं आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे IIT आणि VJTI येथे यंदा २२ ते २४ जानेवारी दरम्यान पार पडणाऱ्या ‘टेकफेस्ट’ आणि ५ ते ७ फेब्रुवारी या दिवसांत रंगणाऱ्या ‘टेक्नोवेन्झा’ अंतर्गत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून यानिमित्ताने ही ‘टेक्नोपिढी’ सुद्धा समाजकार्यासाठी पुढे आली आहे. डॉ. कलामांच्या ‘भारत २०२०’ च्या स्वप्नाने प्रेरित झालेल्या VJTI च्या विद्यार्थ्यांनी यावर्षी ‘टेकिंग टेक्नोलॉजी टू सोसायटी’ हा मंत्र घेऊन ‘प्रतिज्ञा’ हा अभिनव उपक्रम राबविण्याचे ठरवले आहे. याअंतर्गत शालेय पातळीवर हा फेस्टिव्हल नेऊन मुंबईतील शालेय विद्यार्थ्यांमध्ये तंत्रज्ञानाविषयी गोडी निर्माण करणे हा याचा उद्देश असणार आहे. ‘निवृत्ती’ या तीन दिवसीय कार्यक्रमाअंतर्गत VJTI चे ‘गो-ग्रीन’चा संदेश देणार आहेत. आपला कॅम्पस एव्हरग्रीन करण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत, व देशभरातील कॉलेज कॅम्पस पर्यावरणीय दृष्टय़ा काय पावले उचलता येतील याची चर्चा ‘निवृत्ती’मध्ये होणार आहे.

सोमवारपासून सुरू झालेल्या साठय़े महाविद्यालयाच्या ‘ग्रॅव्हिटी’ या विज्ञान महोत्सवातही ‘प्रयत्न’ आणि ‘बायोपार्क’ या अंतर्गत ग्रामीण भारताचा विकाकरण्यासाठी काय प्रयत्न करता येतील याची चाचपणी साठय़े महाविद्यालयाचे विद्यार्थी करणार आहेत. तर ‘बायोपार्क’ या उपक्रमाअंतर्गत पर्यावरणीय जैवविविधता जपण्यासाठी पावले उचलली जाणार आहेत.

http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=40960:2010-01-18-15-34-53&catid=57:2009-07-20-04-01-13&Itemid=70

Wednesday, January 13, 2010

मराठी सुवर्णकारांचा विश्वासार्हता हाच ‘ब्रॅण्ड’ - नितीन पोतदार

मराठी समाज ही तुमची हक्काची ग्राहकपेठ आहे; पण त्याचबरोबर इतर समाजाला तुमच्या विश्वासार्हतेच्या जोरावर ग्राहक बनविता आलं तर खऱ्या अर्थाने तुमच्या व्यवसायाचं सोनं होईल! पारसी समाज जशी त्यांची जुनी गाडी विकताना त्यांच्या समाजाच्या इमेजचा वापर करतो, मग शुद्ध सोनं आणि सुवर्णालंकार विकायला मराठी सुवर्णकारांनी त्यांच्या ‘विश्वसार्हते’चं ब्रॅण्ड वापरलं तर बिघडलं कुठे, असा सवाल प्रख्यात कॉर्पोरेट विधिज्ज्ञ नितीन पोतदार यांनी केला.

Monday, January 4, 2010

2010 च्या दशकात मराठी उद्दोजकांसाठी यशाचा पासवर्ड फक्त ’सहकार्य’ (collaboration)!

ससा आणि कासवाची जुनी गोष्ट आपल्याला माहीतच आहे. कालांतराने सशाने त्याच्या पराभवाचं मूळ शोधून काढलं (Root Cause Analysis).‘स्पर्धकाला कमी लेखणे’ आणि ‘फाजिल आत्मविश्वास’ हे दोन स्वत:चे दोष त्याला उमगले. मनाची तयारी करून त्याने पुन्हा कासवाला शर्यतीसाठी निमंत्रण दिले आणि या खेपेस कुठलीही चूक न करता धावत जाऊन शर्यत जिंकला- तात्पर्य आपल्या स्पर्धकांना कमी न लेखता सदैव जागरूक असायला हवं. गोष्ट इथं संपत नाही- कासवाने आता त्याच्या पराभवाची कारणमीमांसा केली. त्याने या खेपेस शर्यतीसाठी मार्गात एक नदी येईल असा मार्ग निवडला. सशाने विचार न करता पुन्हा शर्यतीसाठी होकार दिला. या खेपेस नदीपर्यंत ससा धावत गेला पण पोहता येत नसल्यामुळे त्याला थांबावं लागलं, कासव हळूहळू आला पण त्याने नदी सहजपणे पार केली आणि शर्यत जिंकली. तात्पर्य: कासवाने पाण्यात पोहता येणं ही त्याची Core Competency- खरी क्षमता ओळखून मार्ग निवडला म्हणून जिंकला आणि शर्यतीचा अभ्यास न करता शर्यतीत सहभागी झाल्यामुळे ससा हरला. दोन शर्यतीनंतर कासव आणि ससा हे एकमेकांचे चांगले मित्र झालेले होते आणि त्यांनी त्याच मार्गावर पुन्हा कमीत कमी वेळेत शर्यत जिंकण्याचा निर्णय घेतला पण एकटय़ाने नव्हे तर दोघांची ‘टीम’ करून एकमेकांच्या सहकार्याने! नदीपर्यंत सशाने कासवाला आपल्या पाठीवर घेतलं ज्यामुळे वेळेची बचत झाली आणि पुढे नदीत कासवाने सशाला पाठीवर घेऊन दोघांनीही शर्यत जिंकली! तात्पर्य : प्रत्येकाने स्वत: हुशार असणं केव्हाही चांगलं, पण आपण जिथं कमी पडतो तिथं दुसऱ्याच्या ताकदीचा उपयोग करण्यात जास्त हुशारी असते. मुख्य म्हणजे दोघांनीही अपयशाने खचून न जाता प्रत्येक वेळी नवीन मार्ग शोधला. एकमेकांशी स्पर्धा न करता दोघांनीही सहकार्याने परिस्थितीवर मात केली. केवळ बोधकथा म्हणून या गोष्टींकडे न पाहता प्रत्यक्ष व्यवहारात त्याचा उपयोग होऊ शकतो. उदा. एकाच उद्योगक्षेत्रात कार्यरत असलेले दोन उद्योजक हे एकमेकांचे स्पर्धक असू शकतात, पण त्यांनी एकमेकांना एकमेकांचे ‘शत्रू’ समजण्याची चूक करू नये.