Sunday, January 31, 2010

माझं tweet .....यशाची फॅक्टरी किमान तीन वेळा बघां कारण?३१ जानेवारी, २०१०:  आताच हरिश्चंद्राची फॅक्टरी बघुन आलो; मित्रांनो प्रत्येक मराठी माणसाने सहकुटुंब, शेजारी, मित्र, दुश्मन जे मिळतील त्यांना घेउन किमान तीन वेळा बघायलाच पाहिजे असा आहे!  पहिल्यांदा हा एक मराठी चित्रपट आहे म्हणुन, दुसऱ्यांदा कालच्या मराठी माणसांने काय करुन ठेवलं आहे ते बघण्यासाठी, आणि तिसऱ्यांदा आजचा एक मराठी माणुस काय करु शकतो हे बघाण्यासाठी!!   चौथ्यांदा पण तुम्ही बघालं कारण तुम्हाला तो मना पासुन आवडलेला असेल!लेखक आणि दिगदर्शक प्रकाश मोकाशी, आणि त्यांच्या संपुर्ण टीमचं तोंड भरून कौतुक करायला मात्र विसरू नका!
(जानेवारी २०१० महीन्यातील माझं Tweets वाचण्यासाठी शिर्षकावर क्लिक करा...........)


बिहार is बिझिनेस, गुजरात is प्रोग्रेस, and महाराष्ट्र is डिसग्रेस!

२० जानेवारी २०१०: ‘धान्यापासून दारू विरोधातील या संघर्षांला निवडणुकीसारखेच रुप देत ही लढाई म्हणजे ‘दारु सोडा विरुद्ध दारु वाढा’ अशा स्वरुपाची आहे, असे सांगत सर्वांनी कच न खाता रस्त्यावर उतरुन शासनाचा हा निर्णय परतवून लावला पाहिजे’  .......नरेंद्र दाभोळकर. त्यांचा धडक कार्यक्रम खाली क्लिक करुन जरुर वाचा.  प्रश्न आपण सगळे काय करणार आहोत ह्याचा आहे?

http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=41332:2010-01-19-16-34-15&catid=26:2009-07-09-02-01-20&Itemid=3


शिक्षणसम्राटांना दणका! स्वागत असो!!
१९ जानेवारी २०१०:  गुणवत्तापूर्ण शैक्षणिक संस्थेऐवजी ‘गृहउद्योगा’ प्रमाणे व्यक्तिगत लाभासाठी अभिमत विद्यापीठे चालवली जात असल्याची टीका करून देशभरातील ४४ अभिमत विद्यापीठांचा अभिमत दर्जा काढून घेण्यात येणार असल्याचे मनुष्यबळ विकास खात्याने आज सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले.  कारवाईचे स्वागत आहे.
........ज्योती बसु! एक विचार! एक आंदोलन! एक तपस्वी!!!

१८ जानेवारी २०१०:  गेली साठ वर्षे देशाच्या राजकारणावर मोठा प्रभाव असलेले मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते व पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री ज्योती बसू गेले!  एक युग संपले.   मन सुन्न झालं.  सर तुम्हाला नम्र प्रणाम.


........नवीन वर्षाची सुंदर बातमी!
१७ जानेवारी २०१०:  कला आणि आधुनिकतेचा सुरेख संगम साधत वांद्रे येथील रंगशारदा ऑडिटोरियमजवळ पुढील वर्षी देशभरातील कलावंतांसाठी ‘दी बॉम्बे आर्ट सोसायटी’चे नवे कलादालन सुरु होणार आहे.  चित्रकला व शिल्पकलेला   देशाविदेशात, राज्यातील तसेच देशातील कलावंताना मुंबईत आपल्या कलेचे प्रदर्शन करण्याची अडचण संपणार असून केवळ प्रदर्शनच नव्हे तर या कलावंतांना राहण्याचीही व्यवस्था याठिकाणी केली जाणार आहे.  या इमारतीच्या डिझाईनला आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.      १६ जानेवारी, २०१० - संपदा जोगळेकर कुलकर्णीचा ’अशो सुशिक्षित’ हा विचार करायला लावणारा लेख दैनिक सामनाच्या फुलोरात आज आहे.  छोट्या पडद्दावर नृत्याच्या स्पर्धेत नऊ वर्षाचि मुलगी आधुनिक निर्लज्जतेने लावणी, तर दुसरी चिमुकली "बिडी जलायले...." वर नृत्य सादर करते, तर आठ वर्षाचा मुलगा पॅण्ट्च्या पट्ट्याला मध्यभागी धरून मायकेल जॅक्सनसारखा प्रणयी शब्दांवर शरीराला हिसके देत नाचतो. जसं बोन्सायला आपण मुक्त दाद देऊ शकतं नाही तसंच या मुलांच कौतुक करताच येतं नाही ते का?  असा प्रश्न संपदाला पडलेला आहे.   संपुर्ण लेख वाचण्यासाठी लॉगऑन करा: http://saamna.com/ 

खरचं एक विचार करायला भाग पाडणारा लेख आहे, जरूर वाचा.

१४ जानेवारी, २०१० - कविता महाजनांची भेट झाली. Open mind आणि स्ट्रॉंग विचार असलेली व्यक्ति. बऱ्याच विषयांवर मनापासुन बोलणं झालं (कविताच्या भाषेत ’उरकलं’ नाही!) ’ग्राफिटी वॉल’ हे त्यांच पुस्तक त्यांनी भेट दिलं, वाचायचा निर्धार तर केला आहे! खरचं वाचणार आहे.

1 comment:

Ap____M said...

Few weeks back, there was an exhibition of aerial photographs of earth from all over the world. Its theme was sustainable development. http://www.yannarthusbertrand.org/v2/yab_us.htm

I wrote about it in Loksatta. http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=36521:2010-01-01-09-59-05&catid=194:2009-08-14-02-31-30&Itemid=194

But response to the article was very poor. Paryaawaranaa chya baabtit aapan ajoon udaasin aahot hech khare!