Friday, August 13, 2010

माझं tweet...देश विकणारे तुपाशी, आणि झेंडा विकणारे उपाशी.


१५ ऑगस्ट २०१०:   आधी आयपीयल नावाच्या क्रिकेट वर करोडोंची बोली लागली आणि मग ते पैसे वसुल करण्यासाठी तेवढ्याच पैशाचा सट्टा झाला.  त्यातील गुन्हेगार शोधण्याआधी दिल्लीश्वरांनी कॉमन वेल्थ गेम्सच्या नावखाली काही हजार कोटींचा पुण्याच्या पिस्तुलने सहज गेम केला.   देश विकणारे तुपाशी आणि देशाची खरी "वेल्थ" असणारी चाचा नेहरूंची मुलं मात्र  झेंडा विकून सुद्दा उपाशी!

एकीकडे हा असा बेसुमार भ्रष्टाचार!  तर दुसरीकडे गेल्या वर्षी शिर्डीच्या साईबाबांना आपण काही करोड रुपयांच्या सोन्याच्या आसनावर बसविले, आता पंढरपुरात विठोबाच घर सोन्याचं होणार आहे!  त्या आधी आमच्या प्रभादेवीच्या सिद्दिविनायकाच्या देवळावर सोन्याचा कळस लोकांनी चढविला!  देवालाही जर करोडोंचा भोग लागणार असेल तर सामान्यांनी काय करावं?  कुणाकडे जावं?  आपण कुठे निघालो आहोत हेच कळतं नाही.  डोक बधिर होतं. 
गेल्या २५ जानेवारी रोजी लिहीलेल माझं tweet पुन्हा खाली देत आहे कारण परिस्थितीत काहीही बदल झालेला नाही!

माझं tweet...एक लढाई अभी बाकी है!  झेंडा उंचा रहे हमारा.

२५ जानेवारी २०१०: आज आणि उद्द्याच्या २६ जानेवारीला रस्त्याच्या सिग्नल्सवर लहान लहान मुले फाटक्या कपडय़ांनी तिरंगा झेंडा विकताना दिसतील। इतर दिवशी ही मुले मोठमोठय़ा गाडय़ांतून प्रवास करणाऱ्या आपल्या सुशिक्षित समाजाला पुस्तक विकताना बघितल्यावर आपण सर्व निर्लज्ज आणि स्वार्थी आहोत ह्याची खात्री पटते!

त्यांच्या चिमुकल्या हातात तिरंगा बघून मनात असंख्य विचार येतात, मन उद्विग्न होतं, मान शरमेने खाली जाते!! मग पटतं की एक लढाई अजुन बाकी आहे!  ........तो पर्यंत निदान तोंडाने म्हणुया झेंडा उंचा रहे हमारा!!!  जय हिंद.

1 comment:

नरेंद्र प्रभू (Narendra Prabhu) said...

सध्यस्थिती अतिशय समर्पक शब्दात मांडली आहे. खरच काय करावं काळात नाही. ही लढाई कुणी लढायची?