Saturday, February 27, 2010

प्रणवचंद्राच्या फॅक्टरीतला साचेबंद अर्थसंकल्प!

जागतिक आर्थिक मंदीचे सावट, देशातली भडकलेली महागाई आणि त्यात दहशतीची टांगती तलवार! असे तीन ज्वलंत प्रश्न असताना केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांचा २०१०-२०११ सालाचा अर्थसंकल्प म्हणजे नेहमीच्या फॅक्टरीतला साचेबंद अर्थसंकल्प आहे, असे म्हणायला काही हरकत नाही. या वर्षी अर्थसंकल्पाविषयी लोकांमध्ये असलेली उदासीनता गेल्या ६० वर्षांत कधीच दिसली नव्हती!
सरकार काही करू शकतं यावर कुणालाही विश्वासच राहिलेला नाही! हे सत्तेत असलेल्या काँग्रेस पार्टीचे आणि अर्थमंत्र्यांचं मोठे अपयश म्हणावे लागेल! जास्त वाईट नसल्यामुळे चांगला असे साधे सोपे गणित मांडून शेअर बाजाराने त्याचे स्वागत केले. अर्थसंकल्पात नवीन उद्योग निर्माण व्हावेत, असे कुठलेही धोरण नाही; आजारी उद्योगांविषयी काही धोरणात्मक निर्णय नाहीत; नवीन परदेशी गुंतवणुकीसंबंधी कुठलाही निर्णय नाही,  बॅकिंग, पेन्शन व इशुअरन्स बिलाचा अजुन पत्ताच नाही; कंपनी कायदा आणि वित्तीय सेवा क्षेत्रासाठी कायदे करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आलेली आहे; पण आश्वासन देऊनही कामगारांच्या कायद्यात बदल करण्याचे सरकारने यावेळेसदेखील टाळलेले आहे.  म्हणुन एकूणच कॉर्पोरेट जगतात संमिश्र प्रतिक्रिया उमटलेल्या दिसत आहेत.

(टीप: हा लेख लिहिल्या नंतर प्रणव मुखर्जींची मुलाखत काल म्हणजे २८ फेब्रुवारीला Economic Times मधे प्रसिद्ध झाली त्यात अर्थसंल्पा विषयी ते स्वत: म्हणाले की "Not that it’s a spectacular Budget. I won’t say so." http://economictimes.indiatimes.com/features/the-sunday-et/special-feature/Not-a-day-without-ET-says-Pranab-Mukherjee/articleshow/5626047.cms )

(संपुर्ण लेख वाचण्यासाठी शिर्षकावर क्लिक करा)

Tuesday, February 23, 2010

माझं tweet ......The World Leader!

२३ फेब्रुवारी,२०१०: जर्मन कंपनी मर्सिडिज-बेंझ ने भारतात त्यांची सगळ्यत महागडी लिमोझिन कार "S-Guard" विकायला आणली. किंमत ६ कोटी! कुठलाही प्रकारच आक्रमणाला ती तोंड देऊ शकते. ही जगातली सर्वात सुरक्षित कार म्हणुन ओळखली जाते. आता ह्या गाडी शेजारी असलेली व्यक्ति ओळखा? तमाम मराठी माणसांना अभिमान वाटावा असं हे नाव आहे श्री. सुहास कडल्सकर! मर्सिडिज-बेंझ कंपनीचे ते कॉर्पोरेट डायरेक्टर आहेत! त्यांच आपण त्रिवार अभिनंदन करुया!!


टीप: नेहमी पेक्षा आज फोटो जरा मोठा दिला आहे. अहो ह्या माणसाचं कर्तृत्व मोठं आहे! आपला माणुस आहे!! मराठी माणसांची अशी झेप बघितल्यावर खात्री पटते की स्वकर्तृवावर मराठी समाज सुद्दा कुठल्याही आक्रमणाला तोंड देऊ शकतो आणि वरील दिलेल्या मर्सिडिज S-Guard कार सारखा सुरक्षित ही राहू शकतो!

Sunday, February 21, 2010

माझं tweet .....मुंबई बर्डस रेस! हा काय नविन प्रकार आहे?

२१ फेब्रुवारी, २०१०: एखाद्या समुद्र किनारी सुर्यास्त बघताना सुर्याने मावळायची मुळीच घाई करू नये असं आपल्याला वाटतं असतं! तसचं पहाटे पक्षांची किलबिल ऎकताना सुर्याने उगवायची घाई करु नये असही वाटतं. कारणं आपल्या मनात कुठलीही "रेस" नसते. म्हणजे निसर्गाने शांत रहावं! पण इथंही काही लोकांनी रेस आणलेली आहे. होय पक्षीनिरीक्षकांची रेस म्हणजे "बर्डरेस"! आज रविवारी, २१ फेब्रुवारीला सकाळी ६ ते संध्याकाळी ६ अशा १२ तासांमध्ये पक्ष्यांचं निरीक्षण आणि नोंद होणार आहे. यामध्ये, मुंबई व आजूबाजूच्या परिसरात (माथेरान, अलिबाग, उरण, इ.) हिंडून १२ तासांत किती प्रकारचे पक्षी आढळतात ते नोंदवायचं.चार जणांच्या टीम मघे एक अनुभवी बर्डवॉचर घेऊन चौघांनीही तो पक्षी पाहिल्याशिवाय त्याची नोंद दिलेल्या लॉगबुक मधे करायची नाही. त्यामध्ये वेळ, जागा, ऐकला/बघितला लिहायचं असतं. संध्याकाळी मीटिंग पॉइंट ठरलेला असतो. मग टॅली करायचं. जास्त माहिती हवी आहे का? क्लिक http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5589961.cms.  हा एक चांगला छंद म्हणुन जोपासला पाहिजे, त्याला "रेस" करण्याची काय गरज?

ही बातमी वाचल्या पासुन माझं मन थोडं अस्वस्थ झालं. कारण जर आपल्या प्रत्येक कृतीची आपण "रेस" करणार असू तर शांतपणा कशात आणि कुठे शोधायचा?

Friday, February 19, 2010

माझं tweet .......Turning Points!

१९ फॆब्रूवारी, २०१०: काल मी आणि मुख्यमंत्री अशोक चव्हाण दोघेही वेगवेगळ्या कामासाठी वसईत होतो! गैरसमज करू नका अहो आम्ही एकत्र गेलो नव्हतो! त्यांच्या बरोबर अर्थातच त्यांचा फौज फाटा होता, मी माझी गाडी स्वत: चालवत गेलो! जाताना मी रस्ता चुकलो. मुख्यंत्र्यांनी वसई-विरार परिसराच्या विकासासाठी MMRDA च्या माध्यमातुन १५० कोटी रुपयांचा स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्यात येणार असल्याची घोषणा केली. लोकांनी टाळ्यावाजवल्या! माझी त्यांना एकच विनंती आहे की ह्या आराखड्या मधे मुंबई-अहमदाबाद हाय वे वरून नायगाव संपल्यावर एका उतारानंतर डावीकडे पहिल्याच वळणावर वसई (पुर्व) प्रवेशद्वार! असा एक चांगला साईन बोर्ड लावा म्हणजे झालं! वसईची ऎन्ट्रीच लक्षात येत नाही! तिथं उभा असलेल्या पोलिसाला विचारलं तर तो म्हणाला हे वळणं इथल्या सर्व लोकांना माहीत आहे! मी म्हटलं म्हणजे बाहेरच्यांनी वसईत येऊच नये का?


महाराष्ट्रात असे कित्येक महत्वाचे रस्ते आणि अगदी महत्वाची वळणं (Turning Points) अशी आहेत जिथं साईन बोर्डचं नाहीत, तर काही चुकीच्या ठिकाणी आहेत! महाराष्ट्राच्या यशाचा रस्ता शोधायचा कसा?

Wednesday, February 17, 2010

माझं tweet ......महाराष्ट्र शिल्पकारचरित्रकोश प्रकल्प!

१७ फेब्रुवारी, २०१०: संध्या लिमयेंचा इमेल आला, तो तसाच तुम्हाला वाचायला देत आहे. आपण सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात त्यात सहभागी व्हावं ही नम्र विनंती!

 "महाराष्ट्र स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून साप्ताहिक विवेकने आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण शिल्पकार चरित्रकोश महात्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. भूतकाळातील कर्तृत्वाच्या स्मरणाबरोबरच वर्तमानकाळातील संधींचा शोध घेऊ पाहणारा आणि भविष्यातील आकांक्षाचा त्यांच्याशी समन्वय साधू पाहणारा प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने http://www.maharashtranayak.com/ ही वेबसाइट सुरु केली आहे. कृपया आपण ही वेबसाईट पाहून या प्रकल्पा बद्दल जाणून घ्यावे ही विनंती.तसेच आम्हाला या वेबसाईट बद्दलची आपली मते जाणून घ्यायची आहेत. तरी कृपया आपण ही वेबसाइट अधिकाधीक लोकांपर्यत पोहोचवण्यासाठी कोणत्या गोष्टी करणे गरजेचे आहे हे सुचवावे.

संध्या लिमये.

शिल्पकारचरित्रकोश प्रकल्प "

Tuesday, February 16, 2010

माझं tweet ..... रुईया! कॉलेजच नावं घेतल्याबरोबर मी कट्यावर जातो!!

१६ फेब्रुवारी, २०१०: रामनारायण रुईया कॉलेज, माटुंगा. माझं कॉलेज! रुईया हे नाव घेतलं तरी मी एका फ्र्कशन मधे कॉलेज समोर असलेल्या कट्यावर जातो (मनाने)! तुम्ही सुद्दा तुमच्या कॉलेजचं नाव काढल की जाता ना कॉलेज कॅंन्टीन, कट्टा, स्पोर्टस ग्राउंड, रोज डे, व्हॅलेंन्टाईन डे, कॉलेज फ्कंशनस, ऍन्युअल डे! पिकनिक्स! मग कट्टिंग चहा, बन-ऑम्लेट, तासं-तास रंगणाऱ्या गप्पा, गाण्याच्या भेंड्या, दे धम्माल!!


आज अचानक लोकसत्ता मधे रुईया संबधी दोन बातम्या वाचल्या (१) रुईया मराठी वाङमय मंडळातर्फे नुकतीच विष्णूशास्त्री चिपळूणकर व्याख्यानमाला उत्साहात संपन्न, आणि दुसरी (२) महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये राजकारण आणि एकूणच लोकशाही व्यवस्थेबद्दल जागरूकता निर्माण व्हावी यासाठी रुईया महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागातफे नुकतेच ‘मॉक पार्लमेन्ट’ या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

माझ्या वेळेस असं काही होत नव्हतं! म्हणजे कॉलेज सुधारलं म्हणायला काही हरकत नसावी. इतर कॉलेजस काय करीत आहेत? तुमच्या कॉलेजमधे हल्ली काय चालयं?

Wednesday, February 10, 2010

माझं tweet .....मराठी पाऊलं पडणारचं पुढे! Fantastic उपक्रम

१० फ्रेब्रुवारी, २०१०:  मुबंईतील साठ्ये कॉलेजातील मराठी विभागाने १५ फेब्रुवारीला मराठी विषयात पदवी प्राप्त करून यशस्वी झालेल्या व्यक्तींकडून मार्गदर्शनपर चर्चासत्र आयोजित केले आहे. मराठी विषय पदवीला घेतल्यानंतर चांगल करिअर करता येते का असा प्रश्न अनेक विद्याथीर् व पालकांना पडतो. म्हणून मराठी विषय घेतल्यानंतर कोणत्या क्षेत्रात करिअर करता येते याची माहिती चर्चासत्रात देण्यात येईल. विद्यार्थ्यांकडून १०० रु. आणि पालकांकडून १५० रु. शुल्क आहे. संपर्क: प्राची शिंत्रे, ९८२०८२६८७१, समीर जाधव ९२२०५६०५६५. साठे कॉलेजच्या प्रिंन्सिपल डॉ. कविता रेगे यांच अभिनंदन! आणि धन्यवाद!!


मला वाटतं अशा प्रकारचा करिअर मार्गदर्शनाची कार्यशाळा प्रथमच होत असावी. असे कार्यक्रम प्रत्येक मराठी शाळा आणि कॉलेजमधे व्हायलाच पाहिजे. कार्यक्रमाला मनापासुन शुभेच्छा!!

निदान संपुर्ण बातमी तरी वाचा: http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5553474.cms

Saturday, February 6, 2010

माझं tweet .....The World Winner!

२६ फेब्रुवारी २०१०: तब्बल २० वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळल्यावर जवळ जवळ सगळेच विश्वविक्रम आपल्या सचिनच्या नावावर आहेत! काल ग्वाल्हेरला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २०० धावांची नाबाद खेळी करून एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावण्याचा विश्वविक्रम सुद्दा त्यांनी केला.

मर्सिडिज-बेंझची S-Guard जर World Leader असेल, तर मला वाटतं सचिन खऱ्या अर्थाने "World Winner" आहेत! जास्त काय लिहू? मला आवडलेला त्यांचा एक छान फोटो देत आहे. We are proud of you Sachin!! Congratulations Sir!