Friday, February 19, 2010

माझं tweet .......Turning Points!

१९ फॆब्रूवारी, २०१०: काल मी आणि मुख्यमंत्री अशोक चव्हाण दोघेही वेगवेगळ्या कामासाठी वसईत होतो! गैरसमज करू नका अहो आम्ही एकत्र गेलो नव्हतो! त्यांच्या बरोबर अर्थातच त्यांचा फौज फाटा होता, मी माझी गाडी स्वत: चालवत गेलो! जाताना मी रस्ता चुकलो. मुख्यंत्र्यांनी वसई-विरार परिसराच्या विकासासाठी MMRDA च्या माध्यमातुन १५० कोटी रुपयांचा स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्यात येणार असल्याची घोषणा केली. लोकांनी टाळ्यावाजवल्या! माझी त्यांना एकच विनंती आहे की ह्या आराखड्या मधे मुंबई-अहमदाबाद हाय वे वरून नायगाव संपल्यावर एका उतारानंतर डावीकडे पहिल्याच वळणावर वसई (पुर्व) प्रवेशद्वार! असा एक चांगला साईन बोर्ड लावा म्हणजे झालं! वसईची ऎन्ट्रीच लक्षात येत नाही! तिथं उभा असलेल्या पोलिसाला विचारलं तर तो म्हणाला हे वळणं इथल्या सर्व लोकांना माहीत आहे! मी म्हटलं म्हणजे बाहेरच्यांनी वसईत येऊच नये का?


महाराष्ट्रात असे कित्येक महत्वाचे रस्ते आणि अगदी महत्वाची वळणं (Turning Points) अशी आहेत जिथं साईन बोर्डचं नाहीत, तर काही चुकीच्या ठिकाणी आहेत! महाराष्ट्राच्या यशाचा रस्ता शोधायचा कसा?

No comments: