Saturday, February 6, 2010

माझं tweet .....The World Winner!

२६ फेब्रुवारी २०१०: तब्बल २० वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळल्यावर जवळ जवळ सगळेच विश्वविक्रम आपल्या सचिनच्या नावावर आहेत! काल ग्वाल्हेरला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २०० धावांची नाबाद खेळी करून एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावण्याचा विश्वविक्रम सुद्दा त्यांनी केला.

मर्सिडिज-बेंझची S-Guard जर World Leader असेल, तर मला वाटतं सचिन खऱ्या अर्थाने "World Winner" आहेत! जास्त काय लिहू? मला आवडलेला त्यांचा एक छान फोटो देत आहे. We are proud of you Sachin!! Congratulations Sir!

Page 3 वर Marathi Film Industry!! Wow!!!

८ फॆब्रुवारी २०१०: आज Times of India Page 3 चा ताबा चक्क मराठी सिनेतारकांनी घेतला! ब्रेकिंग न्युज!! त्या पेजच URL खाली दिलेलं आहे. जरुर बघा! मला माहित आहे तुमच्या पैकी काही लोकांना ह्या गोष्टीच मुळीच कौतुक नसणार! नाकं मुरडली जातील!! पण, मला आपल्या मराठी कलावंतांच खुप कौतुक करावसं वाटलं म्हणुन आज माझ्या ट्विट वरू हे मांडलं. आवडतं नसलेल्या गोष्टींकडे सुद्दा एक व्यपक दृष्टीने बघता आलं पाहिजे नाही का?

http://epaper.timesofindia.com/Daily/skins/TOINEW/navigator.asp?Daily=TOIM&showST=true&login=default&pub=TOI&AW=1265600525031**********************************************
मराठी माणूस हरवला नाही, तर त्यातील आत्मविश्वास हरवला आहे! नाना पाटेकर.

६ फेब्रुवारी २०१०:  ‘‘मराठी माणूस हरवला नाही, तर त्यातील आत्मविश्वास हरवला आहे. आपण सातत्याने गप्प बसतो. घाबरतो व रोज मरतो. त्यामुळे षंढ झालो आहोत. ते लपविण्यासाठी पुरुषार्थ असलेल्या माणसांचा सन्मान करतो. आपण कुठेतरी विझतो आहोत. समाजाच्या परिवर्तनाचा नव्हे, तर स्वत:च्या परिवर्तनाचा विचार झाला, तरी आपोआपच समाज सुधारेल.’’   ही कळकळ व्यक्त केली आहे आपल्या लाडक्या नाना पाटेकर यांनी;  सध्या मराठीच्या मुद्दय़ावर चाललेल्या वादाच्या पाश्र्वभूमीवर काल पुण्यात महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार सोहळ्यात त्यांनी वरील विधानं केले!. 

थॅक यु नाना!  मला वाटतं  मराठी माणसं हुशार आहेत, मेहनती आहेत; त्यांनी पुढे येऊन स्वकर्तृत्वाने यश मिळवलं पाहिजे, म्हणजे रोज होत असलेला आपला तमाशा बंद होईल.  वेळ हाताने काम करण्याची आहे, तोंडाने नव्हे!!


**********************************************
Indian Standard Time कधी बदलणार का?


४ फेब्रुवारी, २०१०: "वॉच फेडरेशन"च्या वतीने "समय भारती २०१०" हे आंतर्राष्ट्रीय घड्याळांच प्रदर्शन आज पासुन ७ फेब्रुवारी पर्यंत वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये भरलेलं आहे. १०० कंपन्यांची १००,००० घड्याळं मांडलेली आहेत! Fantastic and superb watches are displayed!! घड्याळांच कलेक्शन बघुन मला Switzerland च्या एखाद्यां मोठ्या शोरुम मधे असल्या सारखं वाटलं! मनं भरलं. एकही घड्याळं घ्याच नाही ठरवलं तरी ७ घड्याळ पसंत केली, पण घेतली दोनचं. पैसे विचारू नका. "वेळ" काढुन प्रत्येकानं ते प्रदर्शन बघावं.


तिथुनं आल्या पासुन सारखा विचार करतो आहे की जगातली सगळी घड्याळं जरी भारतात मिळायला लागली तरी प्रश्न असा आहे की आपण भारतीयांच Indian Standard Time बदलणारं आहे का? मला काय म्हणायचं आहे कळलं ना तुम्हांला?


***************************************************************


मराठी: भाषणं आणि चर्चेची फॅक्टरी जोरात सुरु आहे!


२ फेब्रुवारी, २०१०: मुंबईसह महाराष्ट्र, मराठीच्या पाट्या, मराठी भाषा, मराठी शाळा, मराठी नाटकं, मराठी सिनेमा, मराठी तरुणांना नोकऱ्या, टॅकसी, मंत्रालयात मराठीचा वापर, मराठी माणसाला मुंबईतच घरं, .............................. भाषणं, वाद, आरोप आणि चर्चेची फॅक्टरी जोरात सुरु आहे.