Friday, March 26, 2010

माझं tweet ......Live-in? जाहीर चर्चेपेक्षा आपल्या मुलांशी चर्चा करुया!

२६ मार्च, २०१०: काल भारताच्या सुप्रीम कोर्टाने Live-in Relationship हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि अशी Relationship ठेवायला आपल्या देशात कायदेशीर अडचण नाही असा निर्वाळा दिला. देशात त्यावरून बरीच उलट सुलट चर्चा सुरु झालेली आहे. Live-In Relationshipला विरोध करण्यापुर्वी आपल्या पारंपारिक पद्दतीत आपण सुधारणा केली का? हे पहिले तपासुन पाहावे लागेल उदा. (१) देशात अजुनही बालविवाह होतात! त्याच्या विरोधात आपण काय केलं? (२) आपण मुलांना अजुनही त्यांचा जोडीदार निवडण्याची पुर्ण मुभा देतो का? (३) लग्ना आधी एकमेकांना ओळखण्याची पुरेशी संधी मिळते का? (४) लग्ना नंतर पटत नसेल तरीही आपण नवरा-बायकोला त्यांच्या मर्जी विरुद्ध जुळवुन घ्यायला भाग पाडतो;(५) घटस्फोटानंतर मुलांच्या मनाचा विचार दुर्दैवाने होत नाही. आता हे जरी खरं असलं तरी लगेच लग्न ही संस्था मोडता येणार नाही हे त्रिकाल सत्य आहे?

Wednesday, March 24, 2010

माझं tweet.....महाराष्ट्रात विचारांच्या पारिजातकाचा सडा पडो!

 २४ मार्च, २०१०:  गेल्याच बुधवारी म्हणजे १६ मार्च रोजी, मी ........चला विचारांच तोरणं (नेटवर्क) बांधुया! गुढी उभारुया! या शिर्षकाखाली मराठी समाजात लगेच करण्यासारखी गोष्ट म्हणजे, निदान साकारात्मक विचारांच तोरण (नेटवर्क) तयार होणं गरजेच आहे, तरचं यशाची गुढी आपण उभारता येईल! असा विचार मांडला.

चांगल्या विचारांची ताकत काय असते हे आपल्याला पुण्यातील ८३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी "माणिक्चंद" या गुटखा निर्मात्यांनी प्रायोजकत्व करावं किंवा नाही ह्या वादा मुळे अनुभवायला मिळाली. ह्याच सर्व श्रेय "तंबाखुच्या पैशांवर संमेलन नकोत" असा स्वच्छ पण बाणेदारपणे विचार मांडणाऱ्या जेष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांच आहे! हे यश त्यांच्या विचारांच आहे! महाराष्ट्राच्या नीतीमुल्यांच आहे! काल खऱ्या अर्थाने जय महाराष्ट्र झाला!!

टीप: मी लहान असताना गणपती साठी रोज सकाळी पारिजातकांची फुल वेचण्यासाठी जातं असे. झाडाखाली त्या सफेद सुगंधी फुलांचा सडा बघितल्यावर मन प्रसन्न व्हायचं. तसचं काहीस मला काल डॉ. बंग यांचे विचार ऐकल्यावर वाटलं. महाराष्ट्राच्या अराध्यदैवताला प्रार्थना करतो की महाराष्ट्रात आता असाच अखंड फुलांचा सडा पडु दे!

Sunday, March 21, 2010

माझं tweet.....महाराष्ट्राची जगाला नव्याने ओळखं व्हावी!

२१ मार्च, २०१०: आज रविवार सुट्टीचा दिवस! म्हटलं आज गुगल वरून कुठलाही विषय न ठरवता मराठीतुन वेवेगळ्या विषयांवर सर्च कसं होत असेल ह्याचा मागोवा घेऊया. गुगल सर्च वरुन काही मराठी शब्द टाकुन सर्च करायचा प्रयत्न केला. आश्चर्य म्हणजे मला मराठी कितीतरी चांगल्या वेब साईटस सापडल्या. पण मला सगळ्यात उपयुक्त आणि चांगली वेब आवडली आणि ती म्हणजे http://blogkatta.netbhet.com/ ईंटरनेटवर मराठीत आणि इतर भाषेत ब्लॉग्स कसे बनवायचे ह्याची खुपच चांगली सोप्या शब्दात माहीती त्यांनी दिली आहे.


"..........तरच मराठी पाउलं पडतील पुढे" ह्या माझ्या लेखात मी म्हटलं की आपल्या समाजातील थोर व्यक्तींचा आणि त्यांच्या विचारांचा परिचय करून देणाऱ्या अनेक वेबसाईट मराठीत आहेत. पण इंग्लीश व हिंदीमध्ये अशा वेगवेगळ्या वेबसाईटस् सुरू करून आपल्या समाजातील प्रत्येक माणसाचे कर्तृत्व जगासमोर इतर भाषेत येणं हे अत्यंत आवश्यक आणि महत्वाच आहे. मला अस वाटत की प्रत्येक शाळा, कॉलेज, खासगी संस्था किंवा आगदी तुम्ही सुद्दा, जर प्रत्येकाने महाराष्ट्रातला कुठलाही एक विषय किंवा मराठी व्यक्ती घेउन त्याची माहीती जर इतर भाषेत ब्लॉग द्वारे प्रसिद्द केली तर महाराष्ट्राला आपण चांगल्या प्रकारे जगासमोर आणु शकू! मग चला करताय न सुरुवात......................

Tuesday, March 16, 2010

माझं tweet.....चला विचारांच तोरणं (नेटवर्क) बांधुया! यशाची गुढी उभारुया!

१६ मार्च २०१०: मित्रांनो "..........तरचं मराठी पाऊलं पडतील पुढे" या माझ्या लेखाला भरभरुन प्रतिसाद दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद! पुष्कळ SMS, फोन आणि इमेल्स आले. लोकांना खुप काही बोलायचं होतं, पण वेळेअभावी मी त्यांच्याशी बोलू शकलो नाही. आनंदाची गोष्ट म्हणजे प्रतिक्रिया देणारे २० वर्षातील तरूण होते तसेच ८० वर्षांची मंडळी देखील होती. आपल्या समाजात मोठ्या प्रमाणात जागरुकता आहे. लोकांना त्यांचे प्रश्न समजतात, काही तरी केलं पाहिजे हे सुद्दा वाटतं, पण प्रश्न असा आहे की नेमकं काय करावं, आणि ते कुणी करावं? ह्या विषयी सविस्तर पणे कधीतरी लिहीनं, पण लगेच करण्यासारखी गोष्ट म्हणजे, निदान मराठी समाजात साकारात्मक विचारांच तोरण (नेटवर्क) तयार होणं गरजेच आहे, तरचं यशाची गुढी आपण उभारता येईल! आपल्या प्रश्नासंबधी जे कुणी चांगले विचार मांडतील, अशा प्रत्येक विचारांना जास्तित जास्त लोकांपर्यंत तरी आपण पोहोचवू शकतो! तर चला आज पासुन विचारांच नेटवर्क तरी सुरु करुया!!

Monday, March 15, 2010

........तरच मराठी पाऊलं पडतील पुढे!

नुकत्याच झालेल्या दुबईतील विश्व मराठी साहित्य संमेलनात व्यवसाय ही कोणा एका समाजाची मक्तेदारी नाही, मराठी माणसाने संकोच सोडावा व व्यवसायात उडी मारावी असे आवाहन करण्यात आले. साहित्य संमलेनासारख्या सांस्कृतिक व्यासपीठावरून मराठी माणसाला उद्योजकतेचे आवाहन करण्यात आले. हे स्वागतार्हच आहे, पण माझ्या मते हा एक मूलगामी बदल आहे. त्याचे मनापासून स्वागत. मराठी संस्कृती टिकविण्यासाठी आतापर्यंत केवळ भाषेच्या अंगाने विचार झाला. आता संस्कृती व आर्थिक समृद्धी यांचा परस्पर संबंध आहे हे आपल्या लक्षात येत आहे त्याचेच हे द्योतक. एकीकडे मुंबईचे मराठीपण हरवत आहे, नव्हे नष्ट होत आहे, तर दुसरीकडे मराठी माणूस आर्थिकदृष्टय़ा मागे पडत चाललेला आहे. या दोन्ही विषयांची चर्चा एकत्रितपणे होताना दिसते, त्यासंबंधी नीट विचार करण्याची गरज आहे.

Wednesday, March 10, 2010

माझं tweet.....किर्लोसकर साम्राज्याचे १०० वर्ष!

१० मार्च, २०१०: किर्लोसकर उद्योगसमूहाच्या स्थापनेस आज, १० मार्च २०१० रोजी शंभर वर्षे होत आहेत. शंभर वर्षांपूर्वी कै. लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी अक्षरश: उजाड माळरानावर या उद्योजकतेचे बीज पेरले आणि महाराष्ट्राला उद्योजकता शिकविली! किर्लोसकरांनी मुंबईला जे. जे. स्कूलमध्ये ड्रॉइंग मास्तर म्हणून करिअर करायचा प्रयत्न केला, नंतर बेळगावला सायकल रिपेअरिंगचा व्यवसाय पण केला; आणि कालांतराने स्वत:च्या मेहनतीने ८ ते १० हजार जणांना रोजगार देणारा हजारो कोटींचा "किर्लोसकर उद्दोग समुह" उभा केला. त्यांना त्यांच्या चारही चिरंजीवांनी उद्योगात त्यांना साथ दिली व त्यांचा उद्योजकतेचा वसा पुढे चालवला, त्यात आघाडीवर होते शंतनुराव किर्लोसकर! शंतनुरावांनी त्यांच्या ‘जेटयुगातील मराठी माणूस’ या चार दशकांपूर्वी लिहिलेल्या पुस्तकात उपयुक्त व उद्बोधक माहिती आहे, सगळ्यांनी वाचलीच पाहिजे.


किर्लोसकर कुटूंबियांनी दाखविलेल्या उद्दोजगते विषयी चांगली माहिती आज डॉ. सुधीर राशिंगकरांनी लोकसत्तात प्रसिद्द केली आहे, त्यांचे आभार - http://loksatta.com/index.php option=com_content&view=article&id=53448:2010-03-09-15-38-04&catid=32:2009-07-09-02-02-48&Itemid=10

Sunday, March 7, 2010

माझं tweet.....मराठी केलं तुम्ही मला!

७ मार्च, २०१०: दुबईच्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दुबई आणि आसपासची मराठी माणसं एकत्र आली. मराठी भाषा आणि साहित्याची चर्चा जगभर झाली हे पहिलं यश; वाळवंटातील सगळी मराठी माणसं एकत्र आलीत हे दुसरं यश! आणि साहित्य संमेलनाच्या व्यसपीठवरून पहिल्याच दिवशी मराठी माणसांनी उद्दोजक व्हावं अशी साद घालण्यात आली, हे माझ्या मते त्यापेक्षा मोठं यश! संमेलन यशस्वी करणाऱ्यांचे अभिनंदन!!


समारोप करताना संमेलन अध्यक्ष मंगेश पाडगावकर म्हणाले माझे पाय लटपटत असले तरी माझी कविता कधीच थरथरणार नाही, आणि "इंतक दिलं तुम्ही मला खरं सांगतो माणूस केलं तुम्ही मला". ह्या सुंदर सोहळ्याला उपस्थित असलेल्या प्रत्येक मराठी माणसाच्या मुखातुन सुद्दा हेच निघालं असेल की ह्या माय देशापासुन हजारो मैल दुर वाळवंटात आमचे पाय लटपटत असले तरी आम्ही कधीच थरथरणार नाही, आणी "संमेलनातुन इंतक दिलं तुम्ही मला, की खरं सांगतो मराठी केलं तुम्ही मला.............

Wednesday, March 3, 2010

माझं tweet .....सर रतन टाटा! देशातील सर्वात विश्वासू उद्दोजक.

3 मार्च, २०१०: रिडर्स डायजेस्टने प्रसिद्ध केलेल्या १०० विश्वासू व्यक्तींच्या यादीत सर. रतन टाटा हे देशातील सर्वात विश्वासू उद्योजक असल्याचा कौल अनेक भारतीयांनी दिला आहे. तर उद्योग जगतातील सर्वात श्रीमंत म्हणून ओळखले जाणारे मुकेश आणि अनिल अंबानी हे अनुक्रमे ७४व्या आणि ७७व्या स्थानावर आहेत. उद्योग जगतातील नारायण मुर्ती हे (४), तर विप्रोचे अझीम प्रेमजी (१०), कुमार मंगलम बिर्ला (२०) यांच्यासह अनेक उद्योजक या यादीत अंबानी बंधुंच्या पुढे आहेत. यात लक्ष्मी मित्तल यांचाही समावेश आहे.


तर पत्रकार, राजकारणी, उद्योजक, खेळाडू, सिनेतारे अशा अनेक क्षेत्रांतील प्रभावशाली व्यक्तींचा समावेश असलेल्या या यादीत माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे नाव प्रथम क्रमांकावर आहे, तर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग ७व्या स्थानावर, तर राहूल गांधी २९व्या स्थानावर आहेत.

विश्वासाहर्ता ही पैशाने विकत घेता येत नाही, हे पुन्हा एकदा सिद्द झालं!! We salute you Sir!!