Friday, March 26, 2010

माझं tweet ......Live-in? जाहीर चर्चेपेक्षा आपल्या मुलांशी चर्चा करुया!

२६ मार्च, २०१०: काल भारताच्या सुप्रीम कोर्टाने Live-in Relationship हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि अशी Relationship ठेवायला आपल्या देशात कायदेशीर अडचण नाही असा निर्वाळा दिला. देशात त्यावरून बरीच उलट सुलट चर्चा सुरु झालेली आहे. Live-In Relationshipला विरोध करण्यापुर्वी आपल्या पारंपारिक पद्दतीत आपण सुधारणा केली का? हे पहिले तपासुन पाहावे लागेल उदा. (१) देशात अजुनही बालविवाह होतात! त्याच्या विरोधात आपण काय केलं? (२) आपण मुलांना अजुनही त्यांचा जोडीदार निवडण्याची पुर्ण मुभा देतो का? (३) लग्ना आधी एकमेकांना ओळखण्याची पुरेशी संधी मिळते का? (४) लग्ना नंतर पटत नसेल तरीही आपण नवरा-बायकोला त्यांच्या मर्जी विरुद्ध जुळवुन घ्यायला भाग पाडतो;(५) घटस्फोटानंतर मुलांच्या मनाचा विचार दुर्दैवाने होत नाही. आता हे जरी खरं असलं तरी लगेच लग्न ही संस्था मोडता येणार नाही हे त्रिकाल सत्य आहे?
त्याच बरोबर वरील प्रश्नांचे उत्तर Live-In Relationship हे होऊ शकत नाही! कारण Live-In Relationship मधे असताना किंवा ते काही काराणास्तव तुटल्यानंतर त्यांना किंवा त्यांच्या पासुन झालेल्या मुलांच्या प्रश्नांची सामाजिक किंवा कायदेशीर समाधानकारक उत्तर आज तरी आपल्या कडे नाहीयं. पारंपारिक लग्नानंतर झालेल्या घटस्टफोता पेक्षा Live-In Relationship तुटल्यावर होणारी मुलांची फरफट जास्त क्लेशदायक असु शकते.

म्हणुन Live-in Relationship का आणि कशासाठी होतात हे पहिल्यांदा नीट समजुन घेणं गरजेच आहे. आज प्रत्येक तरूण तरूणीला आपल्या घरा पासुन दुर शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी घरा बाहेर पडावचं लागतं, मग अशा परिस्थितीत त्यांनी जर आपला साथीदार निवडला तर त्यांच चुकलं कुठे? लहानपणा पासुन मुलांना जर आपण पाळणाघरात वाढवणार असु तर त्यांनी मोठेपणी त्यांच्या पाळण्याची दोरी स्वत: शोधली तर त्यांच चुकलं कुठे? त्याच बरोबर Live-in हे "फॅड" किंवा "फॅशन" होता कामा नये? मला वाटतं ह्या प्रश्नासंबंधी खुल्या मनाने समाजात चर्चा होणं गरजेच आहे, पण त्या आधी आपण आपल्या मुलांशी त्याबाबत मोकळेपणानी चर्चा करणं जास्त गरजेच नाही का?

No comments: