Friday, April 9, 2010

मराठी उद्योजकांनी पुस्तकी नियमांच्या बाहेर पडावे!

बॉर्न२विन चा ‘लक्ष्यसिद्धी सोहळा’ -  रिपोर्ट

अपुरे भांडवल, तंत्रज्ञानात होणारे बदल, ब्रॅण्ड पोझिशनसाठी मार्केटिंगची जीवघेणी स्पर्धा, मनुष्यबळाचा अभाव अशा अनेक समस्यांना भारतातच नव्हे तर जगातील सगळ्याच उद्योजकांना तोंड द्यावे लागते. तरीही अशा उणीवांनी न डगमगता ते व्यवसाय करीत असतात. मराठी उद्योजकांनीही इतरत्र उद्योजक त्यांच्यापुढील समस्यांवर कशी मात करतात याचा नीट अभ्यास करणे गरजेचे आहे. गरज पडल्यास पुस्तकी नियमांच्या बाहेर पडून समस्यांचा सामना करण्याची त्यांनी तयारी ठेवली पाहिजे, असे प्रतिपादन नामवंत कॉर्पोरेट लॉ नितीन पोतदार यांनी केले.

कर्नाटक संघ सभागृह, माटुंगा येथे आयोजित ‘लक्ष्यसिद्धी सोहळ्या’त प्रमुख पाहुणे या नात्याने पोतदार बोलत होते. ‘बॉर्न टू विन’ या अतुल राजोळी आणि अमेय आमरे या दोन मराठी तरुणांनी स्थापलेल्या संस्थेच्या वतीने व्यावसायिक आणि उद्योजकांसाठी ध्येयनिश्चिती ते ध्येयसिद्धी अशा सहा पायऱ्या असणारा ११ आठवडय़ांचा प्रशिक्षण कार्यक्रम ‘लक्ष्यवेध’ या नावाने राबविला जातो. या प्रशिक्षण कार्यक्रमातील सर्व सहभागींसाठी आयोजित ‘लक्ष्यसिद्धी’ सोहळयात पोतदार यांच्या हस्ते ठरवून दिलेले लक्ष्य साधण्यात यशस्वी झालेल्या निवडक प्रशिक्षणार्थीचा पुरस्कार देऊन गौरवही करण्यात आला.
(संपुर्ण लेख वाचण्यासाठी शिर्षकावर क्लिक करा)
आजच्या जागतिकीकरणाच्या युगात भांडवल, तंत्रज्ञान, ब्रॅण्ड, उत्पादन यासाठी इतरांशी सहकार्य, समन्वय किंवा विविध प्रकारच्या भागीदाऱ्या करायला मराठी उद्योजकांना मोकळ्या मनाने पुढे यायला हवे, असे आव्हानही पोतदार यांनी पुढे बोलताना केले. छोटय़ा उद्योजकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांचा मागोवा घेताना ते म्हणाले की, कुठल्याही व्यवसायाच्या यशाची पहिली पायरी ही ‘योग्य प्लॅनिंग’ आणि यशाचा पासवर्ड हा सहकार्य असायला हवा.

ग्लोबलायझेशनच्या युगात सोशल नेटवर्किंगबरोबरच बिझनेस नेटवर्किंगही फार महत्त्वाचे झाले आहे. ‘ग्राहक हेच पहिले लक्ष्य’ हा मंत्र अनुसरल्यामुळेच टीव्ही आणि फ्रीजच्या स्पर्धेत भारतीय कंपन्यांना एलजी आणि सॅमसंग या कोरियन कंपन्यांनी मागे टाकल्याचे त्यांनी सांगितले. सतत नवनवीन प्रॉडक्ट्स बाजारात आणणे, त्यांचे आक्रमकतेने मार्केटिंग करणे, नवीन बाजारपेठा शोधणे आज म्हणून गरजेचे बनले आहे, असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, सरकारी धोरणे, बाजारातील नवीन उत्पादने, गुंतवणूकदारांच्या अपेक्षा आणि आपल्या स्पर्धकांविषयी महत्त्वाची माहिती म्हणजे ‘मार्केट इंटेलिजन्स’चे कसब मराठी उद्योजकांनीही शिकायला हवे. बाजारात आपले उत्पादन यशस्वी ठरण्यासाठी चांगल्या ‘ब्रॅण्ड’चे जसे महत्त्व आहे, तसेच आपल्या उद्योगाची बाजू जगापुढे समर्थपणे मांडण्यासाठी प्रत्येक उद्योगाकडे एक सक्षम प्रवक्ता असावयास हवा, असे त्यांनी सांगितले.

कार्यकमास लक्षवेध कार्यक्रमात सहभागी झालेले प्रक्षिक्षर्थी व त्यांच्ये आप्तमित्र,  श्री. संजय गोविलकर, श्री. विकास गायतोंडे, "अर्थक्षेत्रातील तारे" या पुस्तकाचे लेखक श्री. उदय कुलकर्णी, अशा अनेक नामावंत व्यक्ती उपस्थित होत्या.   कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अस्मिता पांडे यांनी केलं.  कार्यक्रम यशश्वी करण्यासाठी बॉर्न२विन च्या पुर्ण टीमने पुष्कळ परिश्रम घेतले.

सौजन्य लोकसत्ता (व्यापार उद्दोग - रिपोर्ट) दि. ९ एप्रिल २०१०:

1 comment:

Anonymous said...

Nitin ,
what you say is right,
but for that,rather than,
CHATRAPATEE SHIVAAJEE MAAHARAJ KEE JAI WILL HAVE TO BRING DOWN FROM LIPS TO MOVING ACTION.