Saturday, May 1, 2010

माझं Tweet.....खरा जय महाराष्ट्र केंव्हा होणार?

१ मे २०१०:   मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचे ५० वर्ष पुर्ण होत आहे!  मुंबईत सध्या बॅनर वॉर सुरु आहे! जितका मोठा बॅनर तितका मोठा नेता, तितकं मोठं त्याच कर्तृत्व!   ढोल, ताशा, फटाके आणि लेझर बीम शो बरोबर स्टीरिओ सिस्टीमवर जय महाराष्ट्राचा आरोळीने आणि दोन चार मराठी माणसांच्या गौरवाने मराठी माणसांचे प्रश्न सुटणार आहेत का?  मुंबईत घसरलेला मराठी टक्का वाढणार आहे का?  आज हा खरा सवाल आहे.

मुंबई म्हणजे "Land of Opportunities" अनेकांना संधी देणारे शहर!  पण वस्तुस्थिती अशी आहे की, खुद्द इथल्या मुळ मराठी माणसाला मात्र आपण मेनस्ट्रीमपासून बाजूला फेकलो गेलो आहोत असे वाटते.  त्यात मराठी माणसांच चुकलं असेल तरी त्यासंबंधीच्या प्रश्नांची आज उकल करण्यासाठी कोणी पुढे येणार आहे का?  पुढील ५० वर्षांत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र जर टिकवायचा असेल तर मुंबईतल्या मराठी माणसांच्या हातात चांगल्या प्रमाणात आर्थिक सत्ता, अधिकार आणि हक्काचे घर येणे महत्त्वाचे आहे.  त्या दृष्टीने तीन गोष्टी करण्याची नितांत गरज आहे आणि ही जवाबदारी आपल्या सगळ्यांचीच आहे:
(१)   मराठी तरुण- तरुणींना चांगल्या करियरसाठी लागणाऱ्या योग्य मार्गदर्शनासाठी प्रत्येक शाळा आणि कॉलेजमधे कायमस्वरूपी व्यवस्था करणे.   मी तर म्हणेन की आपल्या अभ्यासक्रमातच इयत्ता आठवीपासून करियरसंबंधीची उपयुक्त माहिती देणे सक्तिचं करायला काय हरकत आहे.

(२)   नोकऱ्या किंवा किरकोळ व्यवसायापलीकडे जाऊन मराठी माणसांना मोठय़ा प्रमाणात उद्योगात कसे आणता येईल व जे आज उद्योगात आहेत त्यांना आणखी मोठे कसे करता येईल याचा गांभीर्याने विचार करणे. करिअर मार्गदर्शन किंवा उद्योजकांना लागणारी मदत ही आंबा महोत्सवासारखी हंगामी स्वरूपाची असून चालणार नाही, ती कायमस्वरूपाचीच असायला हवी आणि शेवटी,

(३)   मुंबईत अजूनही चाळीचाळीत, दहा बाय दहाच्या खोलीत गेल्या ५० ते ६० वर्षांपासून राहणाऱ्या मराठी बांधवांना चांगले घर देऊन त्यांच्या पुढच्या पिढीला त्याच ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत राहता येईल अशी व्यवस्था होणे.   पारसी समाजाने जर १९३४ साली कुलाबा येथे ‘खुसरो बाग’, भायखळा येथे ‘रुस्तम बाग’, नेपियन्सी रोडवरील ‘गोदरेज बाग’ व ताडदेव आणि दादरला ‘पारसी कॉलनीज्’च्या नावाने हजारो पारसी लोकांसाठीच घरांच्या कॉलनीज् बांधल्या, तर मराठी म्हणजे फक्त मराठी माणसांसाठीच मुंबईमध्ये राहायला कॉलनीज् महाराष्ट्र सरकार का बांधू शकत नाही?  कदाचित १९५० ते १९६५ सालापर्यंत असे करण्याची गरज नव्हती, पण आज जेव्हा मराठी माणसांना साधे वन रूम किचन घेण्यासाठीसुद्धा जर कर्जत, कसारा आणि वसई, विरारला जावे लागत असेल, तर अशा वेळी मुंबईतील ठराविक चटई क्षेत्र फक्त मराठी माणसांसाठीच राखून ठेवायला काय हरकत आहे?   मुंबईशी काडीचाही संबंध नसताना परप्रांतीयांना मुंबईतील सर्व फूटपाथ व मोठमोठय़ा सरकारी जमिनीवर अनधिकृत झोपडपट्टय़ां बांधुन गिळल्या आणि त्याच्या बदल्यात फुकट जागा जर त्यांना मिळणार असेल तर तर चार पिढय़ा इथं राहिलेल्या मराठी माणसांना हक्काने जागा का मिळु नये?   म्हाडा किंवा MMRDA ने बांधलेल्या प्रत्येक घरात फक्त मराठी माणसांचेच १०० टक्के रिझव्‍‌र्हेशन असायला पाहिजे.  

आज वजनदार मोठे मराठी नेते सर्वच पक्षांमध्ये आहेत व त्यांना मुंबईतल्या मराठी माणसांचे प्रश्न चांगलेच माहीत आहेत; त्यांनी वरील प्रश्न राजकारणापलीकडे जाऊन एकदा तरी पाहावे.  खरे तर या प्रश्नावर पहिले आंदोलन हे प्रत्येक मराठी माणसाच्या मनात होणे गरजेचे आहे, रसत्यावर नव्हे!   आणि खरी गरज आहे ती एका जबरदस्त राजकीय इच्छाशक्तीची!  ती आपल्या बॅनरवरील हिरोंना येवो हीच प्रार्थना!  नाहीतर वाळूवरील जय महाराष्ट्र पुसायला वेळ लागणार नाही!!

6 comments:

नरेंद्र प्रभू (Narendra Prabhu) said...

किती समर्पक आणि मुद्देसूतपणे विचार मांडले आहेत. प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आंदोलन झाले पाहिजे हे खरच खुप महत्वाचं आहे.

HAREKRISHNAJI said...

नरेंद्र प्रभुंसारखेच माझे मत आहे. मुळ प्रश्नांना कोणीही हात घालत नाहीयं, एक तर या नेत्यांची ती कुवत नसावी, राजकीय इच्छाशक्ती नसावी, त्यातुन होणारा आर्थिक लाभ मोहवीत नसावा, मग त्यामधुन हे सारे ’शो" होतात. लोकांना केवळ भुलवीत रहावयाचे. बस्स.

आणि लोकांची देखिल तेवढी विचारशक्ती नसते. जो दिखावा असतो त्यात ते समाधानी असतात. वास्तवीक पहाता या नेत्यांपाशी केवढी ताकद असते, पण.

आपण खुप चांगल्या सुचना केलेल्या आहेत.

THANTHANPAL said...

एक मे महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सव .मोठ्या शहरात जोरात साजरा होत आहे. आम्ही सुद्धा आजच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होतो. कारण सरकारी उत्सवाला साजरा करण्या करता वीज बंद केली जात नाही. पण हाय घड्याळात सकाळचे ६ वाजले आणि लाईट गेली ती ११ वाजे ला आली त्या मुळे सकाळची देशभक्तीपर गाणे मेरे देश की धरती वगेरे ऐकण्याची संधी गेली. यामुळे उत्सव आहे असे वाटलेच नाही. आजकाल कोंबड ओरडण्याची वाट पहावी लागत नाही आमचे घड्याळ वीज जाणे येणे यावरच लावली जातात.
यापुढची सत्य घटना सांगतो.मुलाचा पुण्यातील IT कंपनीत काम करणारा मित्र आई-वडिलांना भेटण्यास बऱ्याच दिवसांनी गावाकडे आला होता. सकाळी गुल झालेली लाईट ११ वाजता आली. गप्पा मरत असताना लगेच घंट्या भरात वीज गुल. घामाच्या धारा सुरु. त्याने थोडा वेळ सहन केले. नंतर माझ्या कडे तावातावाने आला. काका , आता लाईट कधी येणार मी शांतपणे सांगितले ५.३ वाजता. तो चिडला , काका तुम्ही लोक इतके शांत कसे बसू शकता, लोक धिंगाणा करत नाही का? नेत्यांना , MSEB च्या लोकांना मारत का नाही. या ४५ डिग्री तापमानात पंख्या, कुलर शिवाय कसे राहतात . आमच्या कडे लाईट जात नाही. गेली तर अधिकाऱ्यांची खेर नाही. लोक ठोकून काढतात. ४ दिवसा साठी आलेला त्याने आजच्या रात्रीचे वातानुकुल बस चे परतीचे तिकीट काढले.
यावर मी जास्त टीका टिप्पणी करू इच्छित नाही. हे काम आपल्यावरच सोपवतो. अखंड महाराष्ट्रात सर्वाना समान कायदा,सेवा सुविधा सारख्या प्रमाणात मिळाव्यात अशी मागणी केली तर तो परत बटबटीत पणा भडक पणा वाटेल .

Nitin Potdar said...

जिथं हजारो शेतकरी आत्मह्त्या करतात, जिथं हजारो लहान मुलं कुपोषणाने रोज मरतात, जिथं लाखो माणसं अर्ध पोटी राहून दिवस ढकलतात, बायका एक हंडा पाण्यासाठी कित्येक मैल रोज पायपीट करतात, त्या राज्यात आपण वातानुकुलीत बस मधुन प्रवास करु शकतो! मला वाटतं आपण खुपच भाग्यवान आहोत!!

Anonymous said...

For the help please use http://www.google.com

Anonymous said...

History of Accutane
[url=http://www.clearskin.net/viewtopic.php?t=6299&highlight=accutane ]cost of accutane [/url]
[url=http://www.clearskin.net/viewtopic.php?t=4838&highlight=accutane ]accutane roller coaster [/url]
http://www.clearskin.net/viewtopic.php?t=521&highlight=accutane
http://www.clearskin.net/viewtopic.php?t=4838&highlight=accutane
http://www.clearskin.net/viewtopic.php?t=651&highlight=accutane