Thursday, May 27, 2010

माझं tweet.....मराठी ब्लॉगर्स एक गोल्ड माईन (भाग-२)

 २७ मे, २०१०:  मराठी ब्लॉगर्स एक गोल्ड माईन! ह्या माझ्या मागच्या ट्वीटमध्ये टेक्निकल  गोष्टींपेक्षा ब्लॉगिंगचा "विषय" महत्वाचा आहे असं मी लिहिलं.  त्यावर Swapnil  नावाच्या १८ वर्षीय अगदी जवळच्या मित्राशी फोनवरून ब्लॉगिंगचे विविध विषय कोणकोणते असू शकतात या बद्दल खुप “फोन्टिंग” (म्हणजे फोन वरुन बोलणे) झालं ते असं:

आमच्या चर्चेचा खरा विषय होता दहावी आणि बारावीत ९० टक्क्यांवर गुण मिळविणाऱ्या मुलांनी काय   करावं?  मी म्हंटल की अशा मुलांनी काय कराव हे त्यांना सांगायची गरज नसते, पण ६०‍% आणि ८५% च्या मधे ज्यांना मार्क्स मिळतात त्यांनी नेमक काय करावं या विषयी किमान ५ तरी चांगल्या वेब साईटस असू शकतात; ज्यांना जेमतेम ३५% मिळतात त्यांनी काय करावं? फेल झालेल्यांनी काय कराव त्यांना तर खऱ्या मार्गदर्शनाची गरज आहे! त्यांच्या साठी एखादी http://www.successfulfailure.com/  असायला काय हरकत आहे.   अशी वेबसाईट खरोखरच आहे!  हे मी सांगताच Swapnil उडालाच!  आणि ज्यांना शाळाच दिसली नाही त्यांनी काय कराव?  या माझ्या प्रश्नावर मात्र तो एकदम गंभीर झाला!  नर्व्हस झाला.  मी म्हटलं तु बनव अशा मुलांसाठी एक वेबसाईट.

Sunday, May 23, 2010

माझं tweet.....एक चित्र एक विचार!


२३ मे, २०१०:   आज रविवार लोकसत्ता मधे ’अमेरिकॅनो" ह्या शिर्षकाखाली श्री. विनायक परब यांनी "हे रविवर्मा, तू आहेस तरी कुठे?"  ह्या लेखात जागतिक चित्रकलेच्या विश्वाची एक वेगळी व्यथा मांडलेली आहे.  त्यांनी अमेरीकेतल्या  "केली कलेकशन" हे वॉशिंग्टन्पासुन दीड-पावणेदोन तासावर असलेल्या संग्रहालयाची पार्श्वभुमी दिली आहे.  संग्रहालयातील भारतासंदर्भात गाजलेल एक चित्र दिलेल आहे, ते मला खुपच आवडलं म्हणुन इथ देत आहे.  लेखात असं म्हंटल आहे की पूर्वीच्या काळी युद्धावर जाताना सोबत चित्रकारांना नेले जात असे.  आणि प्रत्यक्ष युद्धभूमीवर ते चित्रण करत असत. हे अतिशय जिकीरीचे आणि जीवावर बेतणारे असे काम होते.  म्हणजे एका बाजूला युद्ध सुरू आहे आणि त्याच ठिकाणी एक सुरक्षित कोपरा शोधायचा आणि त्या घटनेचे चित्रण करायचे.  युद्धाच्या वेळेस चित्रणासाठी तेवढा वेळ मिळत नसे. मग ती घटना दृश्यात्मक नोंदवायची आणि प्रत्यक्ष परत आल्यानंतर चित्रण करायचे, अशाप्रकारे चित्रण केले जात असे. काही महत्त्वाच्या युद्धांमधील अशी प्रत्यक्ष चित्रेही केली यांच्या या संग्रहामध्ये आहेत.  हे झालं एका चित्राबद्दल...........

Thursday, May 20, 2010

माझं tweet.....मराठी ब्लॉगर्स एक गोल्ड माईन!

२० मे, २०१०:   मुंबईत गेल्या रविवारी सुमारे ७५ वेगवेगळ्या वयोगटातील आणि विविध विषयांवर लिखाणं करणारे मराठी ब्लॉगर्स एकत्र आले होते.   काही दिवसांपुर्वी पुण्यालाही असाच मेळावा भरला होता.   अयोजक आणि त्याला प्रतिसाद देणाऱ्या सगळ्यांचे प्रथम मना पासुन अभिनंदन करुया.   खरं तर हे फार आधी व्ह्यायला पाहिजे होतं!   ब्लॉगच विश्व हे फार झपाट्याने मोठं होत आहे, त्याला कुठल्याच विषयाच्या मर्यादा नाहीत की टेक्निकल ज्ञानाचा अडसर नाही.   आज जवळपास एक हजारापेक्षा जास्त मराठी ब्लॉग्स आहेत,  खर तर ही संख्या किमान एक लाख तरी असायला हवी!   ह्याच कारण म्हणजे मराठी समाजात क्रियेटिव्हिटी खुप आहे!  म्हणुन प्रत्येक क्रियेटिव्ह मराठी माणसाने स्वत:चा एक तरी ब्लॉग सुरु करावा अशी माझी विनंती असेल.   या विषयी कधीतरी जास्त विस्ताराने लिहीन.

कालच्या मेळाव्यात फॉण्टचे पर्याय, मराठी किबोर्डस, ब्लॉगचे स्वामित्वहक्क,  ब्लॉगवर पैसे कसे मिळवावेत, Ad-Revenue, अशा बऱ्याच गोष्टींची चर्चा झाली अस मला http://www.netbhet.com/ चे माझे मित्र सलिल चौधरींनी सांगितलं.  मला वाटतं जास्त टेक्निकल गोष्टींच्या खोलात न जाता जास्ति जास्त मराठी ब्लॉगर्स कसे निर्माण होतील असा प्रयत्न झाला पाहिजे. 

Monday, May 17, 2010

‘ह्युमन रिसोर्स’ एक आव्हान!

‘डेलिगेशन’ म्हणजे आपण आपलं काम सोडणं नव्हे! तर आपण करीत असलेल्या कामासाठी निर्माण केलेली ‘सपोर्ट सिस्टिम’ असं मी १९ एप्रिलच्या लेखात म्हटलं होतं.   पण डेलिगेशनसाठी चांगली माणसं आणायची कुठून? आणि ती टिकवायची कशी? आज तरुणांकडे डिगऱ्या आहेत तर ज्ञान नाही, ज्ञान आहे तर अनुभव नाही. अनुभव असेल तर पगाराची अपेक्षा जास्त. जास्त पैसे देऊनसुद्धा कर्मचारी राहतील का याची खात्री नाही. अस्थिर वातावरण. आज कुठल्याही कामासाठी नेमकी माणसं मिळणं आणि ते टिकवणं हे मोठं आव्हान होऊन बसलेलं आहे.

Friday, May 14, 2010

माझं tweet.....प्रशासकीय सेवेत मराठी मुलं मागे का?

१४ मे, २०१०:  मागच्या   आठवड्यात आपण हार्वडच्या नितीन नोहरीयाच कौतुक केलं, तितकच कौतुक मला आपल्या मालेगावच्या नितीन येवलाच आहे!   तो नुकत्याच झालेल्या यूपीएससीच्या निकालांमध्ये महाराष्ट्र राज्यातून दुसरा तर राष्ट्रीय पातळीवर १०६वा क्रमांकाने उत्तीर्ण झाला, त्याच्या बरोबर प्रेरणा देशभ्रतार राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आली  तिचं ही कौतुक व्हायला पाहिजे.  दोघांचही मनापासुन अभिनंदन!  

कौतुक करत असताना केंद्र आणि राज्य सरकारच्या अशा सर्व प्रशासकीय सेवेच्या परिक्षांमधून मराठी मुलांची कमी होत चाललेली संख्या एक चिंताजनक आणि गंभीर विषय आहे हे विसरून चालणार नाही.   या परिस्थितीला आपल्या मराठी शाळा आणि त्याहुन जास्त आपल्या मुलांचे पालकच जबाबदार आहे अस मला वाटतं.  आज किती मराठी शांळा आपल्या मुलांनी चांगल करिअर करावं म्हणुन प्रयत्न करताना दिसतात?   किती मराठी शाळांमधे मुलांसाठी करिअर गाईडन्सचे वर्ग चालतात?  कित्येक शांळाचे ट्रस्टीज फक्त चहा-कॅफी पिण्यासाठीच मिटिंग्स घेतात का? असा प्रश्न पडतो.  त्यांना न शाळेची चिंता ना मुलांची.   त्याच बरोबर किती पालक आपल्या मुलांच्या करिअरचा नीट विचार करतात?  आपण रिझल्टची मार्कशीट आल्या नंतर करिअर बाबत थोडीशी चर्चा करतो.  आणि शेजारची मुलं काय करतात यावर आपल्या मुलाच भवितव्य ठरवितो.  आपण प्रत्येक गोष्टींसाठी ’सरकार’च्या पुढाकाराची अपेक्षा करतो.  मला सरकारची मुळीच बाजु घ्यायची नाहीयं.  महाराष्ट्र सरकारने मराठी भाषेसाठी स्वतंत्र खातं निर्माण केल, मराठी मुलांच्या करिअरसाठी केल असतं तर भाषेची काळजी मुलांनी आपोआपच घेतली असती. 

Sunday, May 9, 2010

माझं tweet.....अग्निहोत्र!! पत्रकार ते मालिका लेखन - अभय परांजपे

९ मे २०१०:  ‘अग्निहोत्र’ ही स्टार प्रवाहवरील मराठी मालिका ४५० भागानंतर ३० एप्रिल २०१०ला संपली.   पुर्वी काही रटाळ कंटावाण्या मालिकांनी माझा अंत बघितल्यामुळे मला आता मालिका हा प्रकारच आवडेनासा झाला आहे.  तरी पण अग्निहोत्र मालिकेचे सुरुवातीचे काही भाग माझ्या १८ वर्षाय मुलाच्या आग्रहाखातर मी पाहिले आणि मग अधुन मधुन माझी बायको मला कथानकाविषयी update करत होती.   ‘अग्निहोत्र’ खूपच लोकप्रिय झाली, अगदी ऑर्कुटवर अग्निहोत्रची ३५०० सदस्यांची कम्युनिटी निर्माण झाली.   इतर सुमार मराठी मालिकांच्या पिकात ती उठून दिसली हे मात्र नक्की.   याच श्रेय मालिकेचे निर्माते श्रीरंग गोडबोले यांना जास्त जातं.  मझे ते आवडते निर्माता दिगदर्शक आहेत.

Friday, May 7, 2010

माझं tweet.....पुढच्या शतकासाठीच्या उद्योगसाठी नेतृत्व तयार करू - नितीन नोहरीया

७ मे, २०१०:  नितीन नोहरीया ह्या भारतीय व्यक्तीची नुकतीच (Harward Business School) ‘हार्वड बिझनेस स्कूल’ ह्या अत्यंत प्रतिष्ठीत संस्थेच्या डीन पदावर नेमणूक झाली.  सर्व भारतीयांसाठी ही अभिमानाची बाब!  म्हणुन त्यांचे प्रथम अभिनंदन करुया!!  आज अनेक भारतीय (इंग्लीश) वृत्तपत्रातून त्यांच्या मुलाखती प्रसिद्ध झाल्या. त्यांत मांडलेले त्यांचे काही विचार इथं देत आहे.   

ते म्हणतात, भारतीय कंपन्यांकडून शिकण्यासारखे खूपच आहे.  भारतीय कंपन्यांवर हार्वड विद्यापीठाने ५० केस स्टडी लिहल्या असून वर्गात शिकवताना त्याचा उपयोग होतो. ह्या कंपन्यांनी वितरण व्यवस्थेचे जाळे खूप मोठ्या प्रमाणात कसे ऊभे केले, नोकरीसाठी माणसे निवडताना, जास्तीत जास्त लोकांमधून त्यांची निवड कशी करायची व संस्थात्मक स्तरावर निर्माण झालेली पोकळी कशी भरून काढायची, हे शिकण्यासाठी भारतीय कंपन्यांचा अभ्यास उपयोगी पडतो. ते पुढे म्हणाता की शिक्षणक्षेत्रातील दीपस्तंभ म्हणून आम्ही काम करू व पुढच्या शतकासाठीच्या उद्योगसाठी नेतृत्व तयार करू.

Tuesday, May 4, 2010

मला उद्दोजकचं व्हायचंय.........

२ मे, २०१०:  १ मे रोजी संजीवनी परिवार, उमराळे नालासोपारा (प) तर्फे आयोजित केलेल्या संजीवनी व्यख्यानमालेत "मला उद्दोजकचं व्हायचंय......" ह्या विषयावर बोलायला गेलो होतो.  उद्दोजकतेशी निगडीत विषयांवर मी उद्दोजकांच्या परिषदांमधून  किंवा Management Institutions मधून माझे विचार मांडत असतो. पण मोकळ्या मैदानात लोकांच्या समोर बोलण्याची माझी पहिलीच वेळ. "मला उद्दोजकचं व्हायचयं........" यात असलेल्या "च" मुळे लोकांच्या मनातला प्रश्न चिन्ह मला स्पष्ट दिसतं होता.  म्हणुन एक वेगळी सुरुवात करायची अस मनात ठरवून सुरुवातीलाच लोकांना तीन प्रश्न विचारले; (१) की तुमच्यापैकी किती लोकांना उद्दोजक व्हायला आवडल असतं? - बहुतेकांनी हात वर केले, (२) तुमच्या पैकी किती लोकांना अंबानी, टाटा आणि नारायण मुर्ती व्हायला आवडेल? - घाबरत घाबरत लोकांनी हात वर केले, आणि शेवटचा प्रश्न (३) तुमच्यापैकी नोकरी करणाऱ्या किती लोकांना एखादा छोटासा व्यवसाय सुरु करायला आवडेल? - जवळपास सगळ्यांनीच हात वर केले.  म्हणजे सगळ्यांनाच उद्दोजक व्हायचं आहे तर! अस म्हणत मी बोलायला सुरुवात केली. नुसता विचार करुन तुम्ही उद्दोजक होऊ शकता का? असा थेट प्रश्नावर विचारल्यावर मी निवडलेल्या विषयांत "च" का लावला हे सगळ्यांना एव्हाना कळलं.

Saturday, May 1, 2010

माझं Tweet.....खरा जय महाराष्ट्र केंव्हा होणार?

१ मे २०१०:   मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचे ५० वर्ष पुर्ण होत आहे!  मुंबईत सध्या बॅनर वॉर सुरु आहे! जितका मोठा बॅनर तितका मोठा नेता, तितकं मोठं त्याच कर्तृत्व!   ढोल, ताशा, फटाके आणि लेझर बीम शो बरोबर स्टीरिओ सिस्टीमवर जय महाराष्ट्राचा आरोळीने आणि दोन चार मराठी माणसांच्या गौरवाने मराठी माणसांचे प्रश्न सुटणार आहेत का?  मुंबईत घसरलेला मराठी टक्का वाढणार आहे का?  आज हा खरा सवाल आहे.

मुंबई म्हणजे "Land of Opportunities" अनेकांना संधी देणारे शहर!  पण वस्तुस्थिती अशी आहे की, खुद्द इथल्या मुळ मराठी माणसाला मात्र आपण मेनस्ट्रीमपासून बाजूला फेकलो गेलो आहोत असे वाटते.  त्यात मराठी माणसांच चुकलं असेल तरी त्यासंबंधीच्या प्रश्नांची आज उकल करण्यासाठी कोणी पुढे येणार आहे का?  पुढील ५० वर्षांत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र जर टिकवायचा असेल तर मुंबईतल्या मराठी माणसांच्या हातात चांगल्या प्रमाणात आर्थिक सत्ता, अधिकार आणि हक्काचे घर येणे महत्त्वाचे आहे.  त्या दृष्टीने तीन गोष्टी करण्याची नितांत गरज आहे आणि ही जवाबदारी आपल्या सगळ्यांचीच आहे: