Tuesday, May 4, 2010

मला उद्दोजकचं व्हायचंय.........

२ मे, २०१०:  १ मे रोजी संजीवनी परिवार, उमराळे नालासोपारा (प) तर्फे आयोजित केलेल्या संजीवनी व्यख्यानमालेत "मला उद्दोजकचं व्हायचंय......" ह्या विषयावर बोलायला गेलो होतो.  उद्दोजकतेशी निगडीत विषयांवर मी उद्दोजकांच्या परिषदांमधून  किंवा Management Institutions मधून माझे विचार मांडत असतो. पण मोकळ्या मैदानात लोकांच्या समोर बोलण्याची माझी पहिलीच वेळ. "मला उद्दोजकचं व्हायचयं........" यात असलेल्या "च" मुळे लोकांच्या मनातला प्रश्न चिन्ह मला स्पष्ट दिसतं होता.  म्हणुन एक वेगळी सुरुवात करायची अस मनात ठरवून सुरुवातीलाच लोकांना तीन प्रश्न विचारले; (१) की तुमच्यापैकी किती लोकांना उद्दोजक व्हायला आवडल असतं? - बहुतेकांनी हात वर केले, (२) तुमच्या पैकी किती लोकांना अंबानी, टाटा आणि नारायण मुर्ती व्हायला आवडेल? - घाबरत घाबरत लोकांनी हात वर केले, आणि शेवटचा प्रश्न (३) तुमच्यापैकी नोकरी करणाऱ्या किती लोकांना एखादा छोटासा व्यवसाय सुरु करायला आवडेल? - जवळपास सगळ्यांनीच हात वर केले.  म्हणजे सगळ्यांनाच उद्दोजक व्हायचं आहे तर! अस म्हणत मी बोलायला सुरुवात केली. नुसता विचार करुन तुम्ही उद्दोजक होऊ शकता का? असा थेट प्रश्नावर विचारल्यावर मी निवडलेल्या विषयांत "च" का लावला हे सगळ्यांना एव्हाना कळलं.
देशातला कुठल्याही समाज हा १००% उद्दोजकांचा नाही, प्रत्येक समाजात नोकरी करणारा श्रमिक वर्ग मोठया संख्येने आहे, मग आपणच आपल्या मराठी समाजाला ’चाकरमानी’ का ठरवतो? देशातील २५ अग्रगण्य उद्दोगसमुह हे विविध समाजातील लोकांचे आहेत, कुठल्याही एका समाजाची त्यात मक्त्तेदारी दिसत नाही. मग आपणच आपल्याला समाजाला चाकरमानी का म्हणतो हे समजत नाही?  गेली काही वर्ष आपण भुमीपुत्रांसाठी नोकऱ्यात ८० टक्के रिझर्वेशन मागतो, ते अगदी योग्य आहे, पण त्या मागणीचा आपण इतका पुकारा केला की आपल्या समाज हा फक्त नोकरीच मागणारा समाज आहे अशी काहीशी प्रतिमा आपली निर्माण झाल्यासारखी वाटते.   ती मुळीच खरी नाही, कारण आज तरूणांमधे स्वत:चा उद्दोग सुरु करुन मोठं यश मिळविण्याची जिद्द सर्वत्र दिसत आहे. त्यांची मानसिकता संपुर्णपणे बदललेली आहे, म्हणून त्यांना घरातून मदत आणि समाजतून प्रोत्साहन मिळणं गरजेच आहे.   तसेच अपार मेहनत करायची क्षमता असणाऱ्या मराठी माणसांनी पैसे कमावणे म्हणजे अधोगती, भ्रष्टाचार, अनैतिकता असे समजण्याची मानसिकता बदलायलाच पाहिजे.
आजच्या आघाडीच्या उद्दोगांपैकी, रिलायंन्सचे स्व. धिरुभाई अंबानी, इनफोसिसचे श्री. नारायण मुर्ती, किंवा एअरटेल कंपनीचे श्री. सुनिल मित्तल सगळ्यंची आयुष्याची सुरुवात जवळ जवळ शुन्यातून केलेली आहे. मग त्यांनी असं काय केलं की ते इतक मोठं यश मिळवू शकले? ह्याचा अभ्यास होणं गरजेच आहे. आज इन्टरनेटच्या युगात माहितीचा पुर आलेला आहे, कुठल्याही विषयाचं ज्ञान एका क्लिक वर मिळू शकतं, सोशल आणि बिझिनेस नेटवर्किंगच्या साईटसमुळे जगभरातील लोकांशी आपण संपर्क करू शकतो. मनात आणल्या बरोबर आपल कुठलही प्रोडक्ट, आपण आज जगभर लोकांना दाखवू शकतो! काम करणाऱ्यासाठी आजच्या इतकं पोषक वातावरण कधीच नव्हतं.  प्रश्न असा आहे की आपल्याला काय करायच आहे? आणि ते आपण करत आहोत का?

मी अस कधीच म्हणणार नाही की मराठी समाजातल्या सगळ्यांनीच उद्दोजक व्हावे! नोकऱ्या सोडाव्या!! असं असतं तर मी माझ्या भाषणाचा विषय "प्रत्येकानं उद्दोजकचं व्हायला हवं" असा निवडला असता.  माझा आजचा विषय आहे "मला उद्दोजकचं व्हायचंय........" ह्याचा अर्थ जर तुम्हाला उद्दोजक व्हायच असेल तर, जो पर्यंत तुम्ही मला उद्दोजकचं व्हायचं आहे, अशी मनाशी खूणगाठ मारणार नाही, तो पर्यंत तुम्ही उद्दोजक होणार नाही.   Determination is the only way towards Destination!

त्याच बरोबर मनाला आवडला म्हणून कुठलाही उद्दोग किंवा व्यवसाय़ करू नका. त्याचा नीट अभ्यास करुन, तो आर्थिकदृष्ट्या फायद्याचा (Financially Viable) आहे का, तपासून बघा. त्या विषयात किती उद्दोजक कार्यरत आहेत, त्यांच्या उद्दोगाची क्रिटिकल माहीती काढा. जमल्यास अशा एखाद्या उद्दोगात, तुम्हाला आवडणाऱ्या क्षेत्रात म्हणजे मार्केटिंग, फायनांस किंवा मॅन्युफॅक्चरिंगमध्ये उमेदवारी करणं केंव्हाही चांगल.   एक गोष्ट लक्षात ठेवा Rome was not built in a day! पण एकदा ठरविल्यावर माघार नाही! म्हणून मनाशी ठरवणं महत्वाच आहे म्हणूनच आजचा विषय "मला उद्दोजकचं व्हायचंय.......

भल्या पहाटे उठून पायपीट करीत आणि उंच इमारतीच्या पायऱ्या चढ उतार करून वृत्तपत्राची लाइन टाकणा-या मराठी तरूणांपेक्षा गल्लीच्या कोपऱ्यात बसून संध्याकाळी रद्दी म्हणून वृत्तपत्रे घेऊन विकणारे गुजराती/ मारवाडी अधिक पैसे कमावतात.  तसेच त्याच रद्दीपासून 'पेपर पिशव्या' रस्त्यावरच बनवून एखादा 'भैय्या' विकतो,  आणि तो त्या मराठी आणि 'मारवाडी' या दोघापेक्षा जास्त पैसे कमावतो.  चेन्नई मधल्या काही तरूण वृतपत्रात विविध विषयांवर आणि सेलिब्रेट्रिज विषयी येणारा मजकूर एकत्र गोळा करून विकतात त्यांना सगळ्यात जास्त पैसे मिळतात.   गोळा झालेली रद्दी पुन्हा  recycle  होऊन त्याचा कोट्यावधी रुपयांचा स्वच्छ पेपर बनतो.  म्हणजे वृतपत्र विकण्यापेक्षा त्याच्या रद्दीतुन कितीतरी अधिक पटीने पैसा मिळविता येतो.   मराठी माणसाकडे कष्ट उपसण्याची तयारी आहे, परंतु व्यावसायिक दृष्टी नसल्याने तो मागे पडतो.   घरा घरात सकाळी कष्टाने वृतपत्राच्या रुपाने विचार वाटणाऱ्या आपल्या मुलांनी आपल्या भविष्याचा विचार करणं फार गरजेच आहे.  

उद्योजक व्हायचे असेल तर तसा विचार आधी करणं गरजेच आहे!  आपल भवितव्य हे आपल्याच हातात असतं. आपण जे काही असतो ते म्हणजे आपल्याच विचारांचा परिणाम असतो. आपल्या स्वत:च्या विचारातून आपल्या भविष्यातूआपण कसे असणार आहोत हे ठरतं जातं. भाविष्याचा ताबा मिळविण्यापेक्षा आपण आपल्या प्रत्येक कृतीवर, तोंडातुन निघणाऱ्या प्रत्येक शब्दांवर, आणि आपल्या प्रत्येक प्रतिक्रियांवर ताबा मिळविणं गरजेच आहे. यश तिथंच आहे.  मराठी माणसाचे इतिहासावर खुप प्रेम आहे,  पण आपण हे विसरतो की इतिहासावर जगणारे लोक इतिहास जमा होतात!

त्या नंतर मी दीड तास बोलत होतो आणि समोर बसलेली माणसं शांतपणे एकत होती.  उद्योगासंबधी विषयावर इतका वेळ बोललेलं, लोक शांतपणे, मन लावून ऐकतात, हा माझ्यासाठीसुद्धा एक सुखद अनुभव होता, हे नक्की. त्यांची ही दाद म्हणजे समाजाची मानसिकता बदललेली आहे याचे निदर्शकच होय. इतकेच नाही तर, साडेसात वाजता मी लोकांना सांगितले की तुम्ही दिलेल्या वेळेनुसार मी माझ बोलणं थांबवितो.  आश्चर्य म्हणजे लोकांनी मी आणखी ह्या विषयी बोलावं म्हणून आग्रह धरला. मी अर्धा तास अजून बोललो, लोक अंतर्मुख होताना मी बघतं होतो!   मला स्वत:ला फार मोठे समाधान मिळाले!  मराठी समाज हा विचार करणारा समाज आहे, त्याला योग्य कृतीची जोड मिळाली तर आपला भविष्यकाळ नक्कीच उज्वल असेल!  जय हिंद! जय महाराष्ट्र!!

3 comments:

नरेंद्र प्रभू (Narendra Prabhu) said...

इतकी वर्ष डोळसपणे या विषयाकडे कुणीच पाहिलं नव्हतं. आपण डोळ्यात अंजन घालायचं काम करताअहात. धन्यवाद.

rajendra said...

उद्योजकतेविषयी आपलं लेखन खरच प्रेरणादायी आहे. मराठी माणसांनी उद्योजकतेकडे वळण ही आजची गरज आहे परंतु उद्योग व्यवसाय करु ईच्छित मराठी तरुणांना मार्गदर्शन आणि मदत करु शकणार्‍या व्यक्‍ती, संस्था, संघटनांचा फारच अभाव दिसतो. शासनाची स्वयंरोजगारावर मार्गदर्शन करणारी वेब पोर्टल अद्ययावत नाही तसेच जिल्हा उद्योग केंद्रांतून कितपत तरुणांना मार्गदर्शन आणि मदत मिळते या बद्दल शंकाच वाटते. अशा परिस्थितीत मराठी तरुणांनी काय करावं?

Nitin Potdar, Corporate Lawyer, Mumbai. said...

राजेंद्र, धन्यवाद. तुम्ही म्हणता तसं परिस्थिती गंभीर आहे; परंतु मला वाटतं इतरांच्या मदतीवर आपल्या भविष्याचे स्वप्न बघणं योग्य नाही. प्रश्न असा आहे की आपल्याला काय करायचं आहे? आणि ते करण्यासाठी आपण आपली मदत करणार आहोत का?