Friday, May 14, 2010

माझं tweet.....प्रशासकीय सेवेत मराठी मुलं मागे का?

१४ मे, २०१०:  मागच्या   आठवड्यात आपण हार्वडच्या नितीन नोहरीयाच कौतुक केलं, तितकच कौतुक मला आपल्या मालेगावच्या नितीन येवलाच आहे!   तो नुकत्याच झालेल्या यूपीएससीच्या निकालांमध्ये महाराष्ट्र राज्यातून दुसरा तर राष्ट्रीय पातळीवर १०६वा क्रमांकाने उत्तीर्ण झाला, त्याच्या बरोबर प्रेरणा देशभ्रतार राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आली  तिचं ही कौतुक व्हायला पाहिजे.  दोघांचही मनापासुन अभिनंदन!  

कौतुक करत असताना केंद्र आणि राज्य सरकारच्या अशा सर्व प्रशासकीय सेवेच्या परिक्षांमधून मराठी मुलांची कमी होत चाललेली संख्या एक चिंताजनक आणि गंभीर विषय आहे हे विसरून चालणार नाही.   या परिस्थितीला आपल्या मराठी शाळा आणि त्याहुन जास्त आपल्या मुलांचे पालकच जबाबदार आहे अस मला वाटतं.  आज किती मराठी शांळा आपल्या मुलांनी चांगल करिअर करावं म्हणुन प्रयत्न करताना दिसतात?   किती मराठी शाळांमधे मुलांसाठी करिअर गाईडन्सचे वर्ग चालतात?  कित्येक शांळाचे ट्रस्टीज फक्त चहा-कॅफी पिण्यासाठीच मिटिंग्स घेतात का? असा प्रश्न पडतो.  त्यांना न शाळेची चिंता ना मुलांची.   त्याच बरोबर किती पालक आपल्या मुलांच्या करिअरचा नीट विचार करतात?  आपण रिझल्टची मार्कशीट आल्या नंतर करिअर बाबत थोडीशी चर्चा करतो.  आणि शेजारची मुलं काय करतात यावर आपल्या मुलाच भवितव्य ठरवितो.  आपण प्रत्येक गोष्टींसाठी ’सरकार’च्या पुढाकाराची अपेक्षा करतो.  मला सरकारची मुळीच बाजु घ्यायची नाहीयं.  महाराष्ट्र सरकारने मराठी भाषेसाठी स्वतंत्र खातं निर्माण केल, मराठी मुलांच्या करिअरसाठी केल असतं तर भाषेची काळजी मुलांनी आपोआपच घेतली असती. 
अशा परिक्षांची माहिती आणि एकुणच करिअर संबंधीची माहिती लोकांपर्यत मोठ्याप्रमाणात पोहोचविण्यासाठी मराठी टिव्ही चॅनेल्सवरुन एक खास प्रयत्न झाला पाहिजे.  निदान १ तास तरी करिअर संबंधी कार्यक्रम करण्याची सक्ती त्यांच्यावर सरकारने करायला पाहिजे.  सध्या प्रत्येक चॅनेल्सवरून फक्त गायक आणि नर्तकच निर्माण करायची जणु स्पर्धाच सुरु आहे?  मला वाटतं जसा मुलांना चित्रकलेचा आणि आर्टचा विषय असतो, तसा करिअर गाईन्सचा इयता आठवी, नववी आणि दहावीसाठी एक विषयच असायला हवा.    प्रत्येक शाळांनी आपल्या लायब्ररीत करिअर संबंधीची पुस्तकं, किंवा निदान वृतपत्राबरोबर येणाऱ्या करिअर पुरवण्याजरी ठेवल्या तरी मुलांच्या पुष्कळ माहिती मिळु शकेल.   आणि खरं तर मुलांच्या आधी प्रत्येक पालकांनीच करिअर गाईडन्सचा क्रॅश कोर्स करण्याची गरज आहे!  जोपर्यंत आपण जमिनीत बिजंच लावणार नाही तो पर्यंत त्याला अंकुर फुटणार कसं?

2 comments:

allinfo said...

तुमचे सर्व लेख छान असतात.तुम्ही सांगितलेले मुद्दे ख़रच खूप महत्वाचे आहेत

Anonymous said...

Nitin,
I only hope said persons if alloted to Maharashtra cader,will stay loyal to Maharashtra and Marath's,and not only for their gains,and even if they are not for Maharashtra,they could still do their best to act as bridge betwwen their cader and home state,for common good of everybody,
Mr.YL Rajwade from Himachal,
GR Patwardhan,from Bihar,
Vishwanath Shegaonkar from Tamil Nadu,
Mrs.Latika Padalikar,from Tamil Nadu,
Mr. Sonavne from Haryana,
are few who tried ther best to support Maharashtra and Maharashtrians in their states of posting,
young people must follow their line as far as they can.