Thursday, May 20, 2010

माझं tweet.....मराठी ब्लॉगर्स एक गोल्ड माईन!

२० मे, २०१०:   मुंबईत गेल्या रविवारी सुमारे ७५ वेगवेगळ्या वयोगटातील आणि विविध विषयांवर लिखाणं करणारे मराठी ब्लॉगर्स एकत्र आले होते.   काही दिवसांपुर्वी पुण्यालाही असाच मेळावा भरला होता.   अयोजक आणि त्याला प्रतिसाद देणाऱ्या सगळ्यांचे प्रथम मना पासुन अभिनंदन करुया.   खरं तर हे फार आधी व्ह्यायला पाहिजे होतं!   ब्लॉगच विश्व हे फार झपाट्याने मोठं होत आहे, त्याला कुठल्याच विषयाच्या मर्यादा नाहीत की टेक्निकल ज्ञानाचा अडसर नाही.   आज जवळपास एक हजारापेक्षा जास्त मराठी ब्लॉग्स आहेत,  खर तर ही संख्या किमान एक लाख तरी असायला हवी!   ह्याच कारण म्हणजे मराठी समाजात क्रियेटिव्हिटी खुप आहे!  म्हणुन प्रत्येक क्रियेटिव्ह मराठी माणसाने स्वत:चा एक तरी ब्लॉग सुरु करावा अशी माझी विनंती असेल.   या विषयी कधीतरी जास्त विस्ताराने लिहीन.

कालच्या मेळाव्यात फॉण्टचे पर्याय, मराठी किबोर्डस, ब्लॉगचे स्वामित्वहक्क,  ब्लॉगवर पैसे कसे मिळवावेत, Ad-Revenue, अशा बऱ्याच गोष्टींची चर्चा झाली अस मला http://www.netbhet.com/ चे माझे मित्र सलिल चौधरींनी सांगितलं.  मला वाटतं जास्त टेक्निकल गोष्टींच्या खोलात न जाता जास्ति जास्त मराठी ब्लॉगर्स कसे निर्माण होतील असा प्रयत्न झाला पाहिजे. 
टेक्निकल गोष्टींपेक्षा माझ्या मते आज सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे ब्लॉगचे विषय कुठले असावे?   ब्लॉगच्या प्लॅटफॉर्म वर जरी विषयाचे बंधन नसले, तरी मराठी ब्लॉग विश्व हे  अजुनही सिरिअस आहे अस म्हणता येणार नाही.  चारोळ्या,  विनोद (जोक्स), फुटकळ कार्टुनस, अर्थहीन गप्पा, थिल्लर गाणी अशा विषयांकडे लोक जास्त जाताना दिसतात.   तुलनेने  आर्टस व त्यातील विविध फॉर्म्स, कॉमर्स आणि   विज्ञानातील  विविध शाखा,  साहित्य, तंत्रज्ञान, उद्दोग, व्यवसाय किंवा सेवाक्षेत्र या विषयांची साधी माहिती पुरविणारे ब्लॉगस सुद्दा आज तरी मराठीत नाहीत.   विषयांच्या निवडीबद्दल माझा मुळीच आक्षेप नाही, प्रत्येकाची एक आवड असु असते, एक नॅचरल कल असतो.   पण  प्रश्न असा आहे की तुम्ही निवडलेल्या विषयी बद्दल  आणि एकुणच ब्लॉगिंविषयी तुम्ही किती गंभीर  आहात?  विनोदी लेखन करायच असेल तरी ते सिरियसली करावं लागतं!  चारोळ्या लिहिल्या तरी त्याच उद्या पुस्तकं झाल पाहीजे, लोकांना आवडलं पाहिजे, आणि ते त्यांनी विकत घेतलं पाहिजे.  थोडक्यात तुम्हाला कॉलेजच्या क्ट्यावर आपण करतो तसा टाईम-पास करायचा आहे की त्यातुन तुम्हाला दोन पैसे कमवायचे आहेत?  If you want to earn money, then you will have to be serious!  आणि पैसे जरी कमावायचे नसले तरी कुठलाही विषय हा चांगल्या प्रकारे हाताळला गेला पाहिजे.      सुरुवातीला  विषय सुचत नसतील तर निदान चांगले वाचक होणं केंव्हाही चांगल.  पण उगीच टाईम-पास म्हणून मुळीच ब्लॉग सुरु करु नका.   कारण टाईम-पास  करणाऱ्यांचे दिवस मोजलेले असतात हे लक्षात असु द्या!  इतका मोठा प्लॅटफॉर्म, टेक्निकली सोपा आणि जवळ जवळ मोफत आज आपल्याला   मिळालेला आहे, त्याचा मोठ्या प्रमाणात चांगला उपयोग झाला पाहिजे.  

मराठी समाजत प्रतिभावंताची कधीच कमी नव्हती, आणि उद्या ही नसणार आहे, ही एक गोल्ड माईन आहे!  तुमच्यातल्या सुप्त गुणांना, कल्पकतेला आणि प्रतिभेला जगापुढे आणण्यासाठी ज्या संधीची आपण वाट पहात होता, ती संधी आज टेकनॉलॉजीने एका क्लिकवर उपलब्द केलेली आहे, प्रश्न असा आहे की आपल्याला ती घ्यायची आहे का?  चॉईस आपला आहे!

3 comments:

HAREKRISHNAJI said...

खुप चांगले आणि योग्य तेच लिहिले आहेत. आपण थोड्या वेळासाठी का होईना मेळाव्याला यायला हवे होते, आपले मार्गदर्शन मिळाले असते.

glocal guru said...

Thats true Sir!

Now we should think about something innovative to grab attention of entire world.

Instead of talking about font and keypad we should concentrate on future technologies arriving today via e-readers like I-Pad

We should think like entrepreneur so that people will follow you.

Maithili said...

Khoop chaan lihiley...patale..aani aawadale sudha...