Sunday, May 23, 2010

माझं tweet.....एक चित्र एक विचार!


२३ मे, २०१०:   आज रविवार लोकसत्ता मधे ’अमेरिकॅनो" ह्या शिर्षकाखाली श्री. विनायक परब यांनी "हे रविवर्मा, तू आहेस तरी कुठे?"  ह्या लेखात जागतिक चित्रकलेच्या विश्वाची एक वेगळी व्यथा मांडलेली आहे.  त्यांनी अमेरीकेतल्या  "केली कलेकशन" हे वॉशिंग्टन्पासुन दीड-पावणेदोन तासावर असलेल्या संग्रहालयाची पार्श्वभुमी दिली आहे.  संग्रहालयातील भारतासंदर्भात गाजलेल एक चित्र दिलेल आहे, ते मला खुपच आवडलं म्हणुन इथ देत आहे.  लेखात असं म्हंटल आहे की पूर्वीच्या काळी युद्धावर जाताना सोबत चित्रकारांना नेले जात असे.  आणि प्रत्यक्ष युद्धभूमीवर ते चित्रण करत असत. हे अतिशय जिकीरीचे आणि जीवावर बेतणारे असे काम होते.  म्हणजे एका बाजूला युद्ध सुरू आहे आणि त्याच ठिकाणी एक सुरक्षित कोपरा शोधायचा आणि त्या घटनेचे चित्रण करायचे.  युद्धाच्या वेळेस चित्रणासाठी तेवढा वेळ मिळत नसे. मग ती घटना दृश्यात्मक नोंदवायची आणि प्रत्यक्ष परत आल्यानंतर चित्रण करायचे, अशाप्रकारे चित्रण केले जात असे. काही महत्त्वाच्या युद्धांमधील अशी प्रत्यक्ष चित्रेही केली यांच्या या संग्रहामध्ये आहेत.  हे झालं एका चित्राबद्दल...........
दुसरीकडे प्रहार दैनिकाच्या कोलाज (रविवार पुर्वणी) मधे "विचारनिष्ठा वाहणारा माणूस" या शिर्षकाखाली डॉ. श्रीराम लागूंच्या तीन वर्षा पुर्वी घेतलेल्या मुलाखतीचे काही भाग दिलेलेले आहेत.  त्यात डॉ. लागूं म्हणतात - ‘जन्माला येणा-या प्रत्येकाला कमी-अधिक प्रमाणात बुद्धी असते. कलावंताला तर बुद्धीची जास्तच गरज लागते. पण कलावंताकडे नुस्ती बुद्धी असून चालत नाही. कलावंत हा अ‍ॅरिस्टॉटलने म्हटल्याप्रमाणे- ही शुड बी ए अ‍ॅथलिट अँड फिलॉसॉफर- असा असला पाहिजे. म्हणजे शारीरिकदृष्ट्या तो अ‍ॅथलिट असला पाहिजे आणि बौद्धिकदृष्ट्या तो फिलॉसॉफर असला पाहिजे. त्याच्याकडे अंगाची लवचिकता हवीच. पण जोडीला बुद्धीला वाकवणारी एखाद्या तत्त्वज्ञासारखी विचारक्षमताही हवी. त्याची ही प्रखर विचारनिष्ठा उठून दिसली पाहिजे. कारण अभिनय म्हणजे केवळ आंगिक किंवा केवळ वाचिक भावप्रदर्शन नव्हे; तर अभिनय म्हणजे भूमिकेसंबंधीच्या विचारांचंही प्रदर्शन असतं. एखादा कलाकार भूमिकेचा कसा विचार करतो, तेही त्याच्या अभिनयातून दिसत असतं. दिसायला हवं.’ 

आज मला आवडलेलं एक चित्र आणि एक विचार माझ्या वाचकांना देत आहे.    I hope you all will like it.  Have a nice Sunday!

4 comments:

Salil Chaudhary said...

रविवर्मा..... हा लेख आताच वाचला. छान आणि खुप माहितीपुर्ण आहे. मात्र दिलेले चित्र कळले नाही त्यात विदुषक आणि माकड सुद्धा दिसत आहेत, हे नक्की युद्धाचं चित्र आहे का?

Nitin Potdar, Corporate Lawyer, Mumbai. said...

थॅंक्स सलिल. मला वाटतं हे एक चित्र नसावं, दोन तीन चित्र एकत्रितपणे publish केलं असेल. मला त्यातील दागिन्यांनी सजवलेला हत्ती खुपच आवडला!

Siddhi Bipin Angolkar. said...

Thank you so much sir... That you just think about some thing different which give us so much encouragement & we all youth also do something as like you... not 100% but we will try & yes we will succeed 1 day...

Nitin Potdar said...

You all 'shall' succeed! one day!! Even I am confident.