Thursday, May 27, 2010

माझं tweet.....मराठी ब्लॉगर्स एक गोल्ड माईन (भाग-२)

 २७ मे, २०१०:  मराठी ब्लॉगर्स एक गोल्ड माईन! ह्या माझ्या मागच्या ट्वीटमध्ये टेक्निकल  गोष्टींपेक्षा ब्लॉगिंगचा "विषय" महत्वाचा आहे असं मी लिहिलं.  त्यावर Swapnil  नावाच्या १८ वर्षीय अगदी जवळच्या मित्राशी फोनवरून ब्लॉगिंगचे विविध विषय कोणकोणते असू शकतात या बद्दल खुप “फोन्टिंग” (म्हणजे फोन वरुन बोलणे) झालं ते असं:

आमच्या चर्चेचा खरा विषय होता दहावी आणि बारावीत ९० टक्क्यांवर गुण मिळविणाऱ्या मुलांनी काय   करावं?  मी म्हंटल की अशा मुलांनी काय कराव हे त्यांना सांगायची गरज नसते, पण ६०‍% आणि ८५% च्या मधे ज्यांना मार्क्स मिळतात त्यांनी नेमक काय करावं या विषयी किमान ५ तरी चांगल्या वेब साईटस असू शकतात; ज्यांना जेमतेम ३५% मिळतात त्यांनी काय करावं? फेल झालेल्यांनी काय कराव त्यांना तर खऱ्या मार्गदर्शनाची गरज आहे! त्यांच्या साठी एखादी http://www.successfulfailure.com/  असायला काय हरकत आहे.   अशी वेबसाईट खरोखरच आहे!  हे मी सांगताच Swapnil उडालाच!  आणि ज्यांना शाळाच दिसली नाही त्यांनी काय कराव?  या माझ्या प्रश्नावर मात्र तो एकदम गंभीर झाला!  नर्व्हस झाला.  मी म्हटलं तु बनव अशा मुलांसाठी एक वेबसाईट.
आज प्रत्येक शाळा आणि कॉलेजचे माजी विद्यार्थी, विविध प्रकारचे समाजोपयोगी कामं करीत असतात,  त्यांचे ट्रेकिंग ग्रुप्स असतात, संगीत, पेंटिंग, नाट्य, फोटोग्राफीचे ग्रुप्स असतात, ती मुलं ट्युशन्स घेतात; त्यांच्या प्रत्येकाच्या कामाची एक चांगली वेबसाईट असु शकते. आपण आपल्या सोसायटीत ग्रुप्स करुन बरीच समाज उपयोगी कामं करीत असतो. त्या प्रत्येक कामाची एक वेबसाईट होऊ शकते, म्हणजे इतर लोकांनी काय करावं ह्याच चांगल मार्गदर्शन होईल. ठाण्याला काही महिला गेल्या एक वर्षापासून RTI-KATTA चालवतात (RTI = Right to Information Act). त्यांच्या कामाची एक चांगली वेबसाईट होऊ शकते. रेन हार्वेस्टिंग हा विषय सध्या जोरात आहे, विविध स्तरातील लोक वेगवेगळ्या पद्दतीने या विषयावर काम करीत आहेत त्यांच्या कामासंबंधी किमान १० वेबसाईट्स होऊ शकतात. बाल्कनीत लावता येणारी फुलांची झाडं कोणती, त्याची काळजी कशी घ्यावी यावर दोन तीन वेबसाईट्स होऊ शकतात.   तसेच आज प्रत्येक गोष्टीत रोजच टेकनॉलॉजी बदलत आहे  कामाचं स्वरुप बदलत आहे, उदा. बॅंकेचे व्यवहार हे आता ATM वरून जास्त होतात, तसेच आज प्रत्येक गोष्ट ही  Online उपलब्द आहे उदा. विम्याच्या पॉलिसिचे पैसे भरणे, फोन बिल, क्रेडिट कार्डस, मोबाईल बिल इत्यादी ह्या सगळ्यांची आपल्या आजी आणि आजोबांना समजेल अशा भाषेत सोपं करून सांगणाऱ्या किमान ५ वेब साईट्स सहज होऊ शकतात.   संगणक, फ्रीज, वॉशिंग मशीन, डिश वॉशर, एसी,  मोबाईल्स, अशा वस्तू विकत घेताना त्यात काय काळजी घ्यावी, काय निकष असावेत, किमती किती असतात,  याची सर्व्हिस कशी करावी ह्याची अनेकांना माहिती नसते.  आपले नाते-संबंध (आई-बाबा, मुलं, आजी-आजोबा, शेजारी, नातेवाईक आणि मित्र परिवार)  आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांचे अभ्यासपुर्ण ब्लॉगस होऊ शकतात.  परदेशी गेलेल्या लोकांचे यश, अपयश, त्यांचे विविध अनुभव हा तर विषयांचा महासागर आहे! आपल्या देशात ३६ कोटी देव आणि मला वाटतं तितकेच सामाजिक प्रश्न!  आपला देश असा विषयांनी श्रीमंत देश आहे! अगदी लोकांना कुठल्या विषयांवर वेबसाईट करावी याची यादी आणि त्या विषयासंबंधी थोडी माहिती देण्यासाठी सुद्दा १० वेबसाईटस कमी पडतील.

इतर आणखी विषय बरेच आहेत, त्यातील काही:

(१) परदेशी शिक्षणाविषयी मार्गदर्शन, (२) क्रिकेटवर बरोबर इतर भारतीय खेळांची आणि त्यातील खेळाडूंबद्दलची माहीती, (३) खाद्यपदार्थांच्या रेसिपी, जगभारात असलेली चांगली हॉटेल (मराठी हॉटेल)ची माहिती, (४)  सिनेमा आणि नाटकांची माहिती देणारी, त्यांचे समीक्षण करणारे ब्लॉग्स, (५) सिने संगीता बरोबर त्यातील गायक, संगीतकार, गीतकार यांच्या समिक्षा करणाऱ्या साईट्स, (६) गुंतवणूकीविषयी मार्गदर्शन, (७) प्रत्येक वयोगटाप्रमाणे आरोग्याविषयी मार्गदर्शन, (८) अनेक समाजसेवी संस्था उपयुक्त काम करत असतात, त्यांची व त्यांच्या कामाची माहिती.  अशा अनेक विषयावरच्या साईट किंवा ब्लॉग्स असू शकतात.

विषय एकदा पक्का झाला तरीही थेट स्वत:चा ब्लॉग सुरु करण्याआधी काय करावं या बद्दल three steps: 

Step 1:   आपल्या आवडीच्या विषयांची एक यादी तयार करून त्या विषयांवरील असणाऱ्या विविध ब्लॉग्सचा अभ्यास करणे.

Step 2:   ब्लॉगशी संबंधित टेक्निकल ज्ञान आत्मसात करणे.  मराठीत आपल्या सलिल चौधरींची  http://www.netbhet.com/. ही साईट खुपच सोपी आणि माहिती पुर्ण आहे.

Step 3:   विविध विषयांच्या ब्लॉग वरुन आपली प्रतिक्रिया देत सतत नेटवर्क वाढवणे, आणि रोज अर्धा पान तरी लिहायची सवय करणे. 

वरील सुचविलेल्या विषयांवर किमान १०० ते २०० वेबसाईट्स किंवा ब्लॉग्स नक्कीच होतील.  All the best for blogging!  मला कळवायला विसरू नका.

3 comments:

Mahendra said...

लोकांना काय करायचं हे सांगणारे लोकं नक्कीच पुर्ण पणे त्या विषयावरचे अभ्यासू असावे. नाहीतर विनाकारण लोकांना चुकीचे सल्ले दिले जाण्याची पण शक्यता आहे.
तुमचे बाकीचे ब्लॉग पण वाचले. आवडले.

Nitin Potdar, Corporate Lawyer, Mumbai. said...

Mahendra - I totally agree with you. Thanks for ur comment.

Salil Chaudhary said...

Sir,
Nice article.
I think your guidance will be really helpful for people who wants to be professional bloggers.
Thanks a lot for appriciating Netbhet. This is really encouraging.