Sunday, June 27, 2010

माझं tweet.....हर्बेरियम

२६ जुन २०१०:  माझा आवडता गझल गायक मेहदी हसनची एक खुपच सुंदर गझल आहे - "अबके हम बिछडे तो शायद कभी ख्याबों मे मिले;  जिस तरहा सुखे हुये फुल किताबों मे मिले".  गझलची आठवण होण्याच कारणं सुनील बर्वे एक परिपुर्ण कलाकार "हर्बेरिअम" नावाचा एक प्रयोग करतोय!  पिंपळाचे किंवा कोणत्याही झाडाचे सुकलेले पान जपून ठेवण्याच्या पद्धतीला ‘हर्बेरिअम’ म्हणतात.  श्वास आणि हरिश्चंद्राच्या फॅक्टरी नंतर मराठी सिनेमाची फॅक्टरी जोरात चालु झाली!  मात्र मराठी रंगभुमी अजुनही टीव्ही चॅनेल्सच्या आव्हानाला उत्तर देऊ शकतं नाही हे कटू सत्य आहे.   रंगभुमीचे शंभर प्रश्न!  तरी हताश न होता सुनील बर्वे - "सुबक" या त्याच्या संस्थेद्वारे जुन्या नाटकांना पुन्हा एकदा ’हर्बेरिअम’च्या धर्तीवर रंगमंचावर घेउन येत आहे.     म्हणुन येणाऱ्या एक वर्षात पाच जुनी नाटके नवीन कलाकारांसह तो लोकांसमोर सादर करणार आहे.  त्याच्या या उपक्रमाला लोकांची भरभरुन साथ मिळेल अशी अपेक्षा करतो.

Monday, June 21, 2010

भांडवल उभारणी! एक यक्षप्रश्न?उद्योजक लहान असो की मोठा, मॅन्युफॅक्चरिंग युनिट असो की सव्‍‌र्हिस सेक्टर, उद्योगाचा सुरुवातीचा काळ असो की ५० वर्षांनंतरचा, कुणाच्याही पोटात गोळा आणणारा असा एकच शब्द आहे आणि तो म्हणजे भांडवल! अगदी साध्या अगरबत्ती किंवा केळी विकणाऱ्याला लागणारं २०० रुपयांचंसुद्धा भांडवल असो की टाटा, बिर्ला किंवा अंबानी ग्रुपचा विस्तार असो! कितीही मोठा ग्रुप असला तरी त्यांना भांडवल उभारताना प्रत्येक वेळी घाम फुटतोच!

भांडवल उभारणीचे विविध मार्ग म्हणजे प्रायव्हेट इक्विटी, पब्लिक इश्यू, बँक फायनान्स आणि सरकारी योजना. प्रत्येक मार्ग एक स्वतंत्र विषय आहे. त्याचबरोबर सुरुवातीच्या भांडवल उभारणीपासून ते विस्ताराच्या योजना आखेपर्यंत उद्योजकाची मानसिकताही प्रसंगानुरूप बदलत जाते. त्यात सुरुवातीचा काळ हा ‘राहू’ काळ समजला जातो, म्हणून त्याबद्दल आज विचार करूया.

सुरुवातीला प्रत्येकालाच असं वाटत असतं की, त्याचा प्रोजेक्ट फायदेशीर आहे. एकदम हिट आणि म्हणून कुठल्या तरी बँकेने, नातेवाईक, मित्र, ज्ञातीसंस्थेने किंवा इतर कुणी तरी पुढे येऊन लागणारं भांडवल पुरवलं पाहिजे. पण बऱ्याच वेळा असं होत नाही. अगदी सुरुवातीला लागणारे लाख-दोन लाखच काय, काही हजारसुद्धा कुणी देत नाही. मग हे पैसे आपले आपल्यालाच उभे करावे लागतात. कुणी आपले दागिने विकतो, घर गहाण ठेवतो, जास्त व्याजाने पैसे उधार घेतो आणि उद्योगाची सुरुवात होते. आपल्याला नको नको त्या लोकांपुढे हात पसरावे लागतात. लोकांची मदत करायची ताकद असते, पण मानसिकता नसते. आपल्या शब्दाची खरी किंमत आपल्याला तेव्हा कळते आणि म्हणून बऱ्याच वेळा ‘स्वाभिमान’ गहाण ठेवावा लागतो. शंभर प्रश्न तेही तिरकस. उत्तर देणारे फक्त तुम्ही एकटे. या कसोटीच्या काळात प्रत्येक दिवस एक नवीन परीक्षा असते. पण अशा अग्निपरीक्षेतून सगळ्यांनाच जावं लागतं, त्यात नवीन असं काहीही नाही. आज हा लेख वाचतानासुद्धा कित्येकांना पहिलं ‘भांडवल’ उभारताना त्यांनी काय ‘यातना’ भोगल्या असतील हे आठवून नकळतपणे त्यांचे डोळे पाणावतील यात शंका नाही. होय ‘यातना’ हाच शब्द बरोबर आहे!

Saturday, June 19, 2010

माझं tweet.....देशाला विचार करायला लावणाऱ्या दोन ओळी!

१९ जुन २०१०:  संपुर्ण मुंबईला विद्रुप करणाऱ्या राजकारण्यांच्या हजारो कुरुप बॅनर्स पेक्षा  नाना चुडासामा यांचे दोन ओळींच बॅनर संपुर्ण देशाला विचार करायला लावतात!  नानांच्या बॅनर्स वरून त्यांनी काहीतरी शिकावं हे मला मुळीच सुचवायच नाही - कारणं चांगल काय आणि वाईट काय याचा फरक लोकांना कळायला पाहिजे!   Twitterचे खऱ्या अर्थाने जनक कोण असेल तर ते आहेत मुंबईचे माजी नगरपाल नाना चुडासामा!  गेली ४० वर्ष विविध विषयांवर दोन ते तीन ओळींचे मार्मिक बॅनर्स ते मरीन लाईन्स येथुन प्रसिद्द करीत आहेत.   त्यांनी आजवर लिहिलेल्या साधारणं 2000  बॅनर्सपैकी ७५० बॅनर्सवरील भाष्याचे संकलन ‘हिस्टरी ऑन ए बॅनर’ या पुस्तकरुपात, श्री. लालकृष्ण अडवाणी यांच्या हस्ते मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात नुकतचं प्रकाशित झालं.  प्रत्येकाने संग्रही ठेवावं असं हे पुस्तक आहे. 

Wednesday, June 16, 2010

माझं tweet.....Is there a ray of hope?

१६ जुन २९१०:  भोपाळ गॅस दुर्घटनेला २५ वर्षे उलटून गेल्यावर या विषारी हत्याकांडाबद्दल भोपाळच्या कोर्टाने ७ जुन रोजी ‘युनियन कार्बाईड’ या कंपनीला फक्त पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला.  आणि गेले आठ दिवस देशापुढे एकच प्रश्न आहे की जगातील सर्वात भीषण अशा हत्याकांडाला जबाबदार कोण?  माझ्या पुढे प्रश्न असा आहे जो जाहिर झाला त्याला निकालाला "न्याय" म्हणता येईल का?  एक वकील म्हणुन माझी मान तर शरमेने पुर्णपणे  खाली गेलेली आहे, कारण या ज्युडिशियल सिस्टीमचा दुर्दैवाने मी सुद्दा एक भाग आहे.   दोष कुणाचा याचा शोध घेतलाच पाहिजे, पण त्या पेक्षा महत्वाचा प्रश्न असा आहे की या पुढे तरी आपण शहाणे होणार आहोत का?  काही ठोस करणार आहोत का? की  फक्त चर्चा, चर्चा आणि परत चर्चा?  काल पर्यंत आपण IPL च्या ललित मोदींची चर्चा केली, नंतर पवार आणि आता युनियन कार्बाईड? उद्द्या अभिषेक बच्चनचा रावणची चर्चा करू? या रावण राज्यात आपण कुठे चाललो आहोत हेच कळतं नाही!

Sunday, June 13, 2010

माझं tweet.....खूप काही मागतो आहे - अब्राहम लिंकन

१३ जुन २०१०:  काल अब्राहम लिंकन यांच त्यांच्या मुलाच्या शाळा   मास्तरांना   लिहीलेल पत्र दिलं होत ते इंग्रजीत होतं.  त्याचा मराठी अनुवाद कवीश्रेष्ठ वसंत बापटांनी केला तो आज सुदैवाने मिळाला - तो सुद्दा खाली देत आहे आपण ते पत्र जरुर वाचावं अशी नम्र विनंती.........

प्रिय गुरूजी,

सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात; नसतात सगळीच सत्यनिष्ठ


हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी
मात्र त्याला हे देखील शिकवा -
जगात प्रत्येक बदमाशागणिक, असतो एक साधुचरित पुरूषोत्तमही.
स्वार्थी राजकारणी असतात जगात,
तसे असतात अवघं आयष्य समर्पित करणारे नेतेही.
असतात टपलेले वैरी तसे जपणारे मित्रही.
 मला माहीत आहे;
सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत…
तरीही जमलं तर त्याच्या मनावर ठसवा ,
घाम गाळून कमावलेला एकच छदाम
आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा मौल्यवान आहे.

Saturday, June 12, 2010

माझं tweet.....Big Order! Abraham Lincoln

 १२ जुन २०१०:  जुनचा पहिला आठवडा आला की मी आजुनही माझ्या मानात शाळेत जाउन येतो!  खुप हळवा होतो!  काल अचानक मला माझं दैवतं Abraham Lincoln याने त्याच्या मुलाच्या शाळा मास्तरांना लिहीलेल पत्र मिळालं.  ते खाली देत  आहे.    आज  आपल्या   मुलांना आपण महागड्या शाळेत दाखल करतो, महाग दप्तरं,  नवीन स्कुल ड्रेस,  पुस्तकं, स्टेशनरी अशा गोष्टींची खरेदी करुन त्याला शाळेत पाठवितो.   त्याच्या बरोबर हे छोटसं पत्र देखिल मुलाच्या शिक्षकांना पाठवणं गरजेच  आहे अस मला वाटतं.  निदान ज्यांना आपली मुलं मोठी व्हावी अस वाटत असेल त्यांनी हे पत्र एकदा तरी जरुर वाचावं अशी नम्र विनंती.........

Lincoln’s Letter to his Son’s Teacher ..........

Thursday, June 10, 2010

माझं tweet.....नव्हे माझा प्रश्न?

१० जुन २०१०: मित्रांनो आज माझं tweet नाही तर माझा प्रश्न आहे?  काही तांत्रिक कारणामुळे मी http://www.nitinpotdar.com/ हे संकेत स्थळ वापरु शकणार नाही, जरी ते माझं असलं तरी.  म्हणुन मला एखादं दुसरं नाव माझ्या ब्लॉग साठी घ्यावं लागणार आहे.   गेली आठ दिवस मी पुष्कळ नावांचा विचार केला पण मला अजुन अस काही सुचत नाहीय.  म्हणुन इथं मला थोडी तुमच्या मदतीची गरज आहे, म्हणुन आजचं हे tweet नसून माझा प्रश्न आहे, विनंती आहे.  गेली २ वर्ष मी माझ्या ब्लॉग वरून तुमच्याशी संवाद साधलेला आहे,  मी काय लिहीतो, कस लिहीतो, माझ्या ब्लॉगचा उद्देश काय आहे या बद्दल आता जास्त सांगत नाही.   म्हणुन माझ्या साठी थोडा विचार करा आणि मला पटकन लिहुन कळवा की मी माझ्या ब्लॉग कुठल्या नाव घेउन मी या पुढे लिहाव?  म्हणजे माझ्या संकेत स्थळाच नाव काय असाव?  आता बघा हे लिहीत असतानाच मला एक नाव सुचल आणि ते म्हणजे "विचार करा.कॅम" (http://www.vicharkara.com/) कस वाटतं?  नको पण मला तुमचं मत हवं आहे!  बघा परत एक नाव सुचल "तुमच मत काय आहे.कॉम" (http://www.tumchmatkaayaahe.com/).  

खरं तर नावात काय आहे हे आपण नेहमी म्हणतो, पण हा क्रायसिसचा प्रश्न झालेला आहे! तेंव्हा विचार करुन मला खालिल दिलेल्या कॉमेन्ट बॉक्स मधुन किंवा माझ्या फेस बुक वरुन कळवा.  थॅंक यु.  तुमच्या उत्तराची वाट बघतो.

Monday, June 7, 2010

माझं tweet.....खरा स्पर्धक ओळखा.

७ जुन २०१०:   २०१०च दशक हे Competitive Collaborationsचे दशक  असणार आहे! पण प्रश्न असा आहे की आपला competitor कोण?  हेच पहिल्यांदा आपल्याला शोधणं कठीण होणार आहे.  आता हेच बघा.  कॅमेरा उद्दोगात सगळ्यात जास्त कॅमेरे कोण विकतो? कॅनन, निकोन की कोडॅक?  उत्तर आहे नोकिया!  संगीत क्षेत्रात जास्त कॅसेट्स आणि  सीडी कोण विकतो HMV की S-Re-Ga-Ma?  उत्तर आहे Airtel!  कारण गाण्याच्या  ट्युन्स Airtel कंपनी जास्त विकते.  भारतात ब्रिटिश एअरवेजला कोणाशी जास्त स्पर्धा करावी लागते?  सिंगापुर एअरलाईन्स की एअर इंडिया?  उत्तर आहे व्हिडिओ कॉन्फरन्स पुरविणारी HP किंवा CISCO  कंपनी.  आज कुठला  खान  बॉलिवूड  च्या नंबर वन वर आहे शाहरुख, सलमान की  आमिर? उत्तर आहे सचिन आणि सेहवाग!  कारण IPLची ३ तासांची मॅच सिनेमा पेक्षा जास्त गर्दी खेचते आणि ती दाखवणं सिनेमा पेक्षा खुप फायदेशीर आहे.  विविध टुर कंपन्यांना आज Online Bookingsचं मोठं चॅलेन्ज आहे!   Rotary आणि Lions Clubला Linkedin आणि Facebookच चॅलेन्ज आहे!  पोस्टाच्या पत्राची जागा कुरिअरने घेतली, कुरिअरची जागा इमेलने आणि इमेलची जागा SMSने केंव्हा  घेतली  आपल्याला  समजल  देखिल नाही.  खरं तर आज कित्येक उदोजकांना त्यांचे खरे स्पर्धक कोण हेच समजत नाही?  म्हणुन कुठल्याही उद्दोगात आपले स्थान टिकवायचे  असेल तर आपला खरा स्पर्धक कोण?  हे आपल्याला सगळ्यात आधी कळणं फार महत्वाच आहे असा विचार मी शनिवार दि. ५ जुन रोजी कलर सोसायटी ऑफ इंडियाच्या इण्टरनॅशनल सेमिनार २०१०  मधे "Competitive Collaboration" या विषयावर बोलाताना मांडला.

Friday, June 4, 2010

माझं tweet.....गोव्याची शान द लिला!!

४ जुन, २०१०:  या वर्षी कामाच्या व्यापामुळे मोठी वर्षिक सुट्टी घेता आली नाही, तरी एक आठवडा आम्ही गोव्याला जाऊन आलो.   गोवा म्हटंल की आपल्या डोळ्या समोर येतात तेथील सुंदर समुद्र किनारे, टेन्शन फ्री वातावरण, हॉलिडे मुड, तरूणाई, पर्यटक, हॉटेल्स-बार-रेस्टॉरंट्स!  त्याच बरोबर आहेत मोठ-मोठे विदेशी फाईव्ह स्टार हॉटेल्स!  आणि अशा हॉटेल्सच्या सृंखलेत एक भारतीय नाव दिमाखात उभं आहे ते म्हणजे हॉटेल "द लिला".  पदम् भूषण कॅप्टन सी.पी.कृष्णन नायर हे हॉटेल लिलाचे संस्थापक आणि चेअरमन.   द लिलात राहिलेले लोक त्याच्या कुठल्याही गोष्टीच कौतुक करताना थकत नाहीत हे मी पाहिलेल आहे!   आज त्याची आठवण व्हायचं कारण म्हणजे Economic Timesच्या Corporate Dossier मधे आज कॅ. नायर यांची एक मुलाखत आलेली आहे;   द लिला बरोबरच कॅ. नायर यांच्या नेतृत्वगुणाचं देखील कौतुक व्हायला पाहिजे म्हणुन त्यांचा मुलाखतीचा काही भाग इथं देत आहे.