Friday, June 4, 2010

माझं tweet.....गोव्याची शान द लिला!!

४ जुन, २०१०:  या वर्षी कामाच्या व्यापामुळे मोठी वर्षिक सुट्टी घेता आली नाही, तरी एक आठवडा आम्ही गोव्याला जाऊन आलो.   गोवा म्हटंल की आपल्या डोळ्या समोर येतात तेथील सुंदर समुद्र किनारे, टेन्शन फ्री वातावरण, हॉलिडे मुड, तरूणाई, पर्यटक, हॉटेल्स-बार-रेस्टॉरंट्स!  त्याच बरोबर आहेत मोठ-मोठे विदेशी फाईव्ह स्टार हॉटेल्स!  आणि अशा हॉटेल्सच्या सृंखलेत एक भारतीय नाव दिमाखात उभं आहे ते म्हणजे हॉटेल "द लिला".  पदम् भूषण कॅप्टन सी.पी.कृष्णन नायर हे हॉटेल लिलाचे संस्थापक आणि चेअरमन.   द लिलात राहिलेले लोक त्याच्या कुठल्याही गोष्टीच कौतुक करताना थकत नाहीत हे मी पाहिलेल आहे!   आज त्याची आठवण व्हायचं कारण म्हणजे Economic Timesच्या Corporate Dossier मधे आज कॅ. नायर यांची एक मुलाखत आलेली आहे;   द लिला बरोबरच कॅ. नायर यांच्या नेतृत्वगुणाचं देखील कौतुक व्हायला पाहिजे म्हणुन त्यांचा मुलाखतीचा काही भाग इथं देत आहे. 
कॅ. नायर यांनी खुद्द नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखालील इंडियन नॅशनल लिगमध्ये सामील होऊन त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला.  नेतृत्वगुणांचे धडे त्यांनी नेतांजीकडून घेतले तसेच खान अब्दुल गफारखान व महात्मा गांधीकडून घेतले.  साबरमती आश्रमात एकदा त्यांनी महात्मा गांधींना विचारले, मलाही स्वातंत्र्यलढ्यातील नेता व्हायचे आहे, काय करू? गांधीजींनी सांगितले, सध्या सेवा कर. एकदम नेता होऊ नये.   कॅ. नायर यांना आयुष्याकरता एक धडा मिळाला, नेतृत्व करायचे असेल तर तळापासून काम करायला हवे.   कापडाच्या व्यवसायासाठी त्यांना जगभर फिरावे लागयचे. त्यावेळेस भारतात आंतरराष्ट्रीय दर्जाचे आलीशान हॉटेल सुरू करणे आवश्यक आहे त्यांच्या लक्षात आले व ह्या उद्योगात त्यांनी १९८७साली प्रवेश केला.  आज हॉटेल लिला हे अतिशय उच्च श्रेणीचे हॉटेल म्हणून प्रसिद्ध आहे. 

प्र:     नेतृत्व म्हटल्यावर तुमच्या मनात प्रथम काय येते?

उ:     जो कोणी आजूबाजूच्या लोकांना प्रेरीत करू शकेल, तो नेता होय. माझ्यामते नेताजी सुभाषचंद्र बोस हे महान नेता होते.

प्र:     तुम्ही व्यवस्थापनाशास्त्राची पुस्तके वाचता का?

उ:     नाही. व्यवस्थापनाशास्त्राची पुस्तके म्हणजे केवळ थिअरी.  व्यवस्थापन म्हणजे माणसांना कसे हाताळायचे, त्यांच्याकडून कसे काम करून घ्यायचे आणि माणसे सांभाळायची असतील तर त्याकरता, दयाळूपणा व शिस्त एकाचवेळी आवश्यक आहे.  तसेच झोकून देऊन काम करणे.

प्र:     व्यवस्थापनाशास्त्राचे जे लोकप्रिय सिद्धांत आहेत, त्यावर तुमचा विश्वास आहे का?
उ:     त्यातील बहुतेक मला मान्य नाहीत. दर क्षण, प्रती क्षण ही माझी व्यवस्थापनाची पद्धत आहे, जसा प्रसंग असेल त्याप्रमाणे स्वत:ला त्या आव्हानाचा मुलबला करण्यासाठी सिद्ध करणे. स्वत:ची पातळी उंचावणे.

प्र:     तुमच्या हॉटेलचे एक घोषवाक्य आहे, आम्ही माणसांवर प्रेम करतो! हे तुम्ही किती गंभीरपणे घेता?

उ:     हे आम्ही अतिशय गंभीरपणे घेतो. मी माणसांवर प्रेम करतो आणि त्यांच्या माझ्याकडून ज्या अपेक्षा आहेत, त्या मी पूर्ण करेन. लोकांच्या काय अपेक्षा आहेत, ह्याच दृष्टीकोनातून मी सतत विचार करतो. माझ्या कर्मचार्‍यानांही माझे सांगणे असते, पाहुण्यांनी काही मागायच्या आधीच, ते तुम्ही त्यांना द्या.

प्र:     संदिग्धतेचा तुम्ही सामना कसा करता?

उ:     थेट. शक्याशक्यतेवर माझा विश्वास नाही. मी समस्यांना थेट सामोरे जातो.

प्र:     मंदीमुळे तुमच्या विचारसरणीत काही बदल झाला का?

उ:     नाही.  भारताकडे मंदीवर मात करण्याची ताकद आहे मला माहीत होते. आपली अर्थव्यवस्था मजबूत आहे व असे धक्के ती पचवू शकते. मला आणखी उद्योग वाढवायचा होता, त्यामुळे मी मंदीतसुद्धा माझी गुंतवणूक वाढवली व उद्योगविस्ताराकडे लक्ष दिले.

प्र:     तरूणांना तुम्ही काय संदेश द्याल?

उ:     मी सांगेन, कठोर परिश्रम करा व भारताला उच्च स्थानावर नेण्याच्या प्रेरणेने काम करा.   भारत जगात प्रथम क्रमांकांचे स्थान मिळवू शकतो, ह्यावर माझा दृढ विश्वास आहे. पण दुर्दैवाने माझ्या हयातीत ते होणार नाही.

प्र:     आयुष्यातील एखादा अदभूत, साक्षात्कारी क्षण?

उ:     तसेच कधीच होत नसते. मी ८९ वर्षांचा आहे आणि माझी अजूनही आकांक्षा आहे १८ हॉटेल निर्माण करण्याची. त्या क्षणाची मी अजूनही वाट बघत आहे.

प्र:     तुम्ही लोकांच्या मुलाखती घेता, तेव्हा त्यांच्यात कोणते गुण शोधता?

उ:     काल मी एकाची मुलाखत घेतली तेव्हा त्याला विचारले, ज्या कंपनीवर इतके कर्ज आहे, त्या कंपनीत तो का रुजू होऊ इच्छितो? त्याचे उत्तर होते, पुढील पाच वर्षात कंपनीला कर्जमुक्त करणे ह्याकडे तो एक आव्हान म्हणून बघतो. ह्या प्रश्नावर मात करण्यासाठी त्याच्याकडे एक अभिनव योजना होती. मला त्याचे उत्तर आवडले आणि त्याची अभिनव योजनाही. अशा गोष्टी मला आवडतात.

प्र:     आध्यात्म व व्यवहारवाद यांचा तोल तुम्ही कसा सांभाळता?

उ:     मला माझ्या गुरूंकडून संन्यास हवा होता आणि त्यांनी सांगितले, तुम्ही जे काही कराल त्याला आध्यात्माचे अधिष्ठान असू द्या. मी भ्रष्ट मार्गांचा कधीही अंवलंब करणार नाही व माझ्या जीवनमूल्यांच्या विपरीत काही करणार नाही.

प्र:     तुम्ही सैन्यात होता, त्या अनुभवाचा उद्योगक्षेत्रात काम करताना काय लाभ झाला?

उ:     मला वाटते, भारतातील प्रत्येक मुलाला, दोन वर्षे सैन्यात पाठवायला हवे. त्यांच्या अंगात शिस्त येईल व आत्मविश्वास येईल. भ्रष्टाचाराचा त्याला तिरस्कार वाटेल व नीतीमूल्यांना धरून वागेल.

प्र:     तुमची चुक झाली तर तुम्ही ते मान्य करता का?

उ:     होय. मी आधी सोनिया गांधींचा द्वेष करायचो. एक इटालियन भारताची पंतप्रधान कशी होऊ शकते असे मला वाटायचे. पण आज मी त्यांचा प्रशंसक आहे कारण त्या भारतीय जनतेची एकात्मता साधत आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे भारत प्रगती करत आहे, सुपरपॉवर होत आहे. विशेषत: भारतीय स्त्रियांना तर त्या खूप सक्षम बनवत आहेत.

प्र:     वयाच्या ८९व्या वर्षी, सोमवारी सकाळी, तुम्ही स्वत:ला काय सांगता?

उ:     माझ्या सर्व हॉटेलचे प्रकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी माझे तब्येत चांगली असू दे. दोन वर्षांपूर्वी मला पक्षाघाताचा झटका येऊन गेला व केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर आज मी ऑफीसात परत आलो.

प्र:     कोणत्या गोष्टीबद्दल तुम्हाला सर्वात जास्त खेद होतो?

उ:     मी १९४०मध्ये नोकरी स्वीकारण्याऐवजी तुरूगांत जायला हवे होते. पण माझ्या आध्यात्मिक गुरूंनी मला तुरुंगात जाण्यास मनाई केली. तुरुंगात मी कष्ट सहन करायला हवे होते.

सौजन्य इकॉनॉमिक टाइम्समधील दि. ४ जुन २०१०.

1 comment:

Gopal Amlekar said...

All this at the age of 89!!!! Its really inspiring and motivating to know that he has ambitions for 18 more hotels at this age.
Thank you for posing this article...