Monday, June 7, 2010

माझं tweet.....खरा स्पर्धक ओळखा.

७ जुन २०१०:   २०१०च दशक हे Competitive Collaborationsचे दशक  असणार आहे! पण प्रश्न असा आहे की आपला competitor कोण?  हेच पहिल्यांदा आपल्याला शोधणं कठीण होणार आहे.  आता हेच बघा.  कॅमेरा उद्दोगात सगळ्यात जास्त कॅमेरे कोण विकतो? कॅनन, निकोन की कोडॅक?  उत्तर आहे नोकिया!  संगीत क्षेत्रात जास्त कॅसेट्स आणि  सीडी कोण विकतो HMV की S-Re-Ga-Ma?  उत्तर आहे Airtel!  कारण गाण्याच्या  ट्युन्स Airtel कंपनी जास्त विकते.  भारतात ब्रिटिश एअरवेजला कोणाशी जास्त स्पर्धा करावी लागते?  सिंगापुर एअरलाईन्स की एअर इंडिया?  उत्तर आहे व्हिडिओ कॉन्फरन्स पुरविणारी HP किंवा CISCO  कंपनी.  आज कुठला  खान  बॉलिवूड  च्या नंबर वन वर आहे शाहरुख, सलमान की  आमिर? उत्तर आहे सचिन आणि सेहवाग!  कारण IPLची ३ तासांची मॅच सिनेमा पेक्षा जास्त गर्दी खेचते आणि ती दाखवणं सिनेमा पेक्षा खुप फायदेशीर आहे.  विविध टुर कंपन्यांना आज Online Bookingsचं मोठं चॅलेन्ज आहे!   Rotary आणि Lions Clubला Linkedin आणि Facebookच चॅलेन्ज आहे!  पोस्टाच्या पत्राची जागा कुरिअरने घेतली, कुरिअरची जागा इमेलने आणि इमेलची जागा SMSने केंव्हा  घेतली  आपल्याला  समजल  देखिल नाही.  खरं तर आज कित्येक उदोजकांना त्यांचे खरे स्पर्धक कोण हेच समजत नाही?  म्हणुन कुठल्याही उद्दोगात आपले स्थान टिकवायचे  असेल तर आपला खरा स्पर्धक कोण?  हे आपल्याला सगळ्यात आधी कळणं फार महत्वाच आहे असा विचार मी शनिवार दि. ५ जुन रोजी कलर सोसायटी ऑफ इंडियाच्या इण्टरनॅशनल सेमिनार २०१०  मधे "Competitive Collaboration" या विषयावर बोलाताना मांडला.
आज ग्राहकांची आवड रोज बदलत आहे, त्याच्या गरजा बदलत आहेत, त्याची खरेदी शक्ति बदलत आहे,  त्याच्या भोवतीच वातावरण बदलत आहे.  माहितीचा पुर आलेला आहे.  पुर्वी वर्तमानपत्राचा ग्राहकांवर प्रभाव असायचा, नंतर टीव्ही चॅनेल्सचा आला, आता इन्टर्नेटचा आहे.   रोज नव नविन प्रोडक्टस बाजारात येत आहेत,  रोज मार्केटिंगची स्ट्राटेजी बदलत आहे, डिलिव्हरी चेन बदलत आहे.  म्हणुन आपला खरा स्पर्धक  शोधण्यासाठी  आपल्या ग्राहकाला जास्त समजुन घेण गरजेच आहे!  त्याची खरी गरज काय आहे?  तो आज कुठला प्रोडक्ट घेतो आहे आणि उद्या कुठला घेणार आहे याच गणित बांधता आलं पाहिजे, कारण Customer is the King!!

PS:  प्रिय सलिल - (सलिल चौधरी - Netbhet.Com) तु केलेल्या हक्काच्या सुचनेनुसार वरील विषय  मी जरा विस्ताराने मांडण्याचा प्रयत्न करणार आहे.  पण थोडा वेळ लागेल.        

No comments: