Saturday, June 19, 2010

माझं tweet.....देशाला विचार करायला लावणाऱ्या दोन ओळी!

१९ जुन २०१०:  संपुर्ण मुंबईला विद्रुप करणाऱ्या राजकारण्यांच्या हजारो कुरुप बॅनर्स पेक्षा  नाना चुडासामा यांचे दोन ओळींच बॅनर संपुर्ण देशाला विचार करायला लावतात!  नानांच्या बॅनर्स वरून त्यांनी काहीतरी शिकावं हे मला मुळीच सुचवायच नाही - कारणं चांगल काय आणि वाईट काय याचा फरक लोकांना कळायला पाहिजे!   Twitterचे खऱ्या अर्थाने जनक कोण असेल तर ते आहेत मुंबईचे माजी नगरपाल नाना चुडासामा!  गेली ४० वर्ष विविध विषयांवर दोन ते तीन ओळींचे मार्मिक बॅनर्स ते मरीन लाईन्स येथुन प्रसिद्द करीत आहेत.   त्यांनी आजवर लिहिलेल्या साधारणं 2000  बॅनर्सपैकी ७५० बॅनर्सवरील भाष्याचे संकलन ‘हिस्टरी ऑन ए बॅनर’ या पुस्तकरुपात, श्री. लालकृष्ण अडवाणी यांच्या हस्ते मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात नुकतचं प्रकाशित झालं.  प्रत्येकाने संग्रही ठेवावं असं हे पुस्तक आहे. 
लोकशाहीचा मुख्य आधार आहे "जन मत" म्हणजे - Public Opinion!  नाना म्हणतात की जेंव्हा त्यांच्या पहिल्या बॅनरला लोकांना प्रचंड प्रतिसाद मिळाला तेंव्हाच त्यांनी ठरवलं की लोकांना विचार करायला लावणं गरजेच आहे आणि या करीता बॅनरचा चांगला उपयोग करुन घेता येईल.   विषय कुठलाही असो, सामाजिक, राजकीय, क्रीडा, आरोग्य-शिक्षणं, उद्दोग-व्यापार, शेती, व्यक्ति, चळवळ, गरीब-श्रीमंत, दुर्घटना, इलेक्शन्स नानांनी त्यांच्या बॅनर वरून जस जाहिर कौतुक केलं तस कुणाचाही मुलाहिजा न बाळगता नेमक्या शब्दात वार देखील केले!  लोकांना विचार करायला भाग पाडलं.  स्व. इंदिरा गांधीनी १९७५ साली लागु केलेली emergency ला त्यांनी कडाडुन विरोध केला, पण त्यांच्या इतर कित्येक निर्णयाचे मनापासुन स्वागत देखील केले.  भारताने मिळवलेला १९८३ चा विश्वक्रिकेट कप असो की सचिनने केलेले शतक असो नाना कौतुक करायला कधीही विसरले नाहीत.   तुम्हाला विषय सुचतात कसे? या एम. जे. अकबर यांनी विचारल्यावर नाना हसत म्हणाले की भारतीय राजकारणी माझ्या बॅनरसाठी खुप मेहनत घेतात!   May I ask your age Nana?  या श्री अडवाणींच्या प्रश्नाला बगल देत नानांनी प्रति प्रश्न केला की physical or mental?  प्रत्येक इलेक्शन आधी त्यांच आवडत बॅनर असतं "'The Greek dictionary meaning of an idiot — a man who does not vote'.  अत्यंत मृदु स्वभावाच्या या माणसाच्या नावात "नाना" असलं तरी कुणालाही ते नाही म्हणत नाही.  गुजरातीत "नाना" म्हणजे छोटा - पण नानांच्या Giants International  ह्या सामाजिक संस्थाने प्रचंड काम केलेल आहे.  Giantsच्या आज जगभर ५०० च्या वर शाखा कार्यरत आहेत!


या कार्यक्रमास उद्योगपती मुकेश अंबानी म्हणाले की Twitter जे खरे जनक नाना चुडासामाच आहेत!  नाना जे त्यांच्या दोन ओळीत सांगु शकतात ते जगातील कुठलाही लेखक कित्येक कॉलम्स खरडून सुद्दा सांगु शकत नाहीत.  Twitterने खरं तर नानांना रॅयल्टि दिली पाहिजे!  या कार्यक्रमाला समाजातील सगळ्या थरातील लोक आलेले होते;  मुख्य म्हणजे पैसे देउन लोकांना आणलेलं नव्हतं यातच त्यांच्या दोन ओळींच सामर्थ कळतं!
 
ता.क:  या सुदंर कार्यक्रमाच निमंत्रण श्री. चुडासामांचा मुलगा अक्षय चुडासामा जो माझा व्यावसायिक पार्टनर देखील आहे, त्याने दिल्यामुळे मलाही या जाता आलं. त्याचे मनापासुन धन्यवाद.  हे पुस्तक काही निवडक भारतीय भाषेत अनुवाद करायला मी अक्षयला विनंती केलेली आहे.  बघुया.

2 comments:

उमेश said...

राजकारण्यांच्या वाढदिवसाचे बॅनर्सजरी काढले तरी मुंबईकर म्हणतील देव पावला.

Mahendra said...

पुर्वी जेंव्हा टाउन साईडला ऑफिस होतं, तेंव्हा बरेचदा आवर्जुन मरीना हॉटेलच्या बाजुला केवळ हे बॅनर बघायला पण जाणे व्हायचे. त्या कोपऱ्यावर गेलो की आपसूकच नजर वर जायची त्या बॅनर च्या जागेकडे. कुठल्यातरी पोलिटीकल घटनेवरचे एका लहानशा ओळीत भाष्य वाचायला मजा यायची.
हल्ली तिकडे जाणं कमी झालंय, आता पुन्हा एकदा आवर्जुन जावे लागेल बघायला. सध्या कुठलं बॅनर आहे ते.