Sunday, June 27, 2010

माझं tweet.....हर्बेरियम

२६ जुन २०१०:  माझा आवडता गझल गायक मेहदी हसनची एक खुपच सुंदर गझल आहे - "अबके हम बिछडे तो शायद कभी ख्याबों मे मिले;  जिस तरहा सुखे हुये फुल किताबों मे मिले".  गझलची आठवण होण्याच कारणं सुनील बर्वे एक परिपुर्ण कलाकार "हर्बेरिअम" नावाचा एक प्रयोग करतोय!  पिंपळाचे किंवा कोणत्याही झाडाचे सुकलेले पान जपून ठेवण्याच्या पद्धतीला ‘हर्बेरिअम’ म्हणतात.  श्वास आणि हरिश्चंद्राच्या फॅक्टरी नंतर मराठी सिनेमाची फॅक्टरी जोरात चालु झाली!  मात्र मराठी रंगभुमी अजुनही टीव्ही चॅनेल्सच्या आव्हानाला उत्तर देऊ शकतं नाही हे कटू सत्य आहे.   रंगभुमीचे शंभर प्रश्न!  तरी हताश न होता सुनील बर्वे - "सुबक" या त्याच्या संस्थेद्वारे जुन्या नाटकांना पुन्हा एकदा ’हर्बेरिअम’च्या धर्तीवर रंगमंचावर घेउन येत आहे.     म्हणुन येणाऱ्या एक वर्षात पाच जुनी नाटके नवीन कलाकारांसह तो लोकांसमोर सादर करणार आहे.  त्याच्या या उपक्रमाला लोकांची भरभरुन साथ मिळेल अशी अपेक्षा करतो.
सुनील या अशा प्रत्येक नाटकांचे केवळ २५ प्रयोग करणार आहे - १३ मुंबईत आणि १२ मुंबईबाहेर.   प्रतिमा कुलकर्णी, चंद्रकांत कुलकर्णी, विजय केंकरे, मंगेश कदम आणि गिरीश जोशी हे दिग्दर्शक नाटके दिग्दर्शित करतील आणि मुख्य म्हणजे नाटक कोणते असावे याचा निर्णय दिग्दर्शकांचाच असणार आहे.  सुरुवातीला प्रतिमा कुलकर्णी यांच्या दिग्दर्शनाखाली वसंत कानेटकरलिखित ‘सूर्याची पिल्ले’ या नाटकाच्या तालमी सुरू झाल्या आहेत व जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात ते आपल्याला पहायला मिळणार आहे.

रंगभुमी टिकवायची असेल तर कुणीतरी पुढाकार घ्यावाच लागेल, असे नव नवीन प्रयोग करावेच लागतील;  मी नेहमी म्हणतो की प्रश्न आहे तिथं उत्तर हे असणारच, फक्त ते शोधता आलं पाहिजे!    नाटय़क्षेत्रातील आर्थिक गणित  का सुटत नाही?  याचं कारण आपण जरी विषय, दिग्दर्शक, आणि कलावंत नवीन आणले तरी "नाटक" या प्रोडक्टसाठी लागणारा म्यॅन्युफॅचरिंग ते मार्केटिंगचा फॉर्म्युला तोच ठेवला.   आज रोज बदलणाऱ्या जगात "नाटकं"ह्या प्रोडक्टला एकुणच नव्याने  बांधण्याची गरज आहे.  त्यासाठी आजच्या प्रेक्षकांचाच नव्याने विचार करावा लागेल;  कदाचित नवीन बाजारपेठ म्हणजे नवीन  "प्रेक्षक"  देखील शोधावे लागतील;  त्यांच्या आवडीचा विचार करावा लागेल;  त्यांच्या भाषेत नाटकांची स्क्रिप्ट लिहावी लागेल;  नाटकांचे विषय, दिग्दर्शन, कलाकृती, मार्केटिंग, सेलिंग, सगळ्याच गोष्टींचा नव्याने विचार करावा लागेल.  पुर्वी "कॅफे मद्रास" मधे मिळणारी कॉफी आज "Cafe' Coffee Day" मधे मिळते,  स्टीलच्या वाटीची जागा आज प्रिंटेड कपने घेतली, स्वाद तोच, पण कॉफी घेणारे लोक बदलले!  दहा मिनिटात कॉफी पिणारे आज तासं तास तिथं जाऊन बसु लागले?  हे नक्की काय आहे?  याचा आपण कधी विचार केलाय?  कॉफी तर तीच आहे ना!!  नाटक या प्रोडक्ट विषयीचं Out of the box विचार झाला पाहिजे.  सुनील बर्वेला पुन्हा शुभेच्छा देतो.

ता.क: सुनील बर्वेंचा थोडा serious snap देत आहे, कारण तो हर्बेरिअम विषयी serious आहे.  त्याच्या प्रयत्नानाला आपण seriously साथ देणं गरजेच आहे.

No comments: