Wednesday, June 16, 2010

माझं tweet.....Is there a ray of hope?

१६ जुन २९१०:  भोपाळ गॅस दुर्घटनेला २५ वर्षे उलटून गेल्यावर या विषारी हत्याकांडाबद्दल भोपाळच्या कोर्टाने ७ जुन रोजी ‘युनियन कार्बाईड’ या कंपनीला फक्त पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला.  आणि गेले आठ दिवस देशापुढे एकच प्रश्न आहे की जगातील सर्वात भीषण अशा हत्याकांडाला जबाबदार कोण?  माझ्या पुढे प्रश्न असा आहे जो जाहिर झाला त्याला निकालाला "न्याय" म्हणता येईल का?  एक वकील म्हणुन माझी मान तर शरमेने पुर्णपणे  खाली गेलेली आहे, कारण या ज्युडिशियल सिस्टीमचा दुर्दैवाने मी सुद्दा एक भाग आहे.   दोष कुणाचा याचा शोध घेतलाच पाहिजे, पण त्या पेक्षा महत्वाचा प्रश्न असा आहे की या पुढे तरी आपण शहाणे होणार आहोत का?  काही ठोस करणार आहोत का? की  फक्त चर्चा, चर्चा आणि परत चर्चा?  काल पर्यंत आपण IPL च्या ललित मोदींची चर्चा केली, नंतर पवार आणि आता युनियन कार्बाईड? उद्द्या अभिषेक बच्चनचा रावणची चर्चा करू? या रावण राज्यात आपण कुठे चाललो आहोत हेच कळतं नाही!
गेली ६० वर्षात लाखो बालमजुरांचं आयुष्य रोज उधवस्त होत आहेत त्यांनी कुठल्या कोर्टात दाद मागायची?   कुपोषणामुळे हजारो बालक मृत्युमुखी पडले त्यांना तर कुठल्याही कोर्टा जाताच आलं नाही.   लाखो बाल-विवाह करून आपण आपल्या चिमुरड्या मुलांना जिवंतपणे थाटाने फासावर लटकवतो?  त्या बद्दल कुठल्याही कोर्टाने आपल्याला साधा समन्स देखील धाडला नाही.   देशात अर्ध्याच्या जास्त लोकांना अन्न नाही, अन्न आहे तर शिक्षण नाही, शिक्षणं आहे नोकरी नाही, नोकरी आहे तर घर नाही?  घर आहे तर उद्द्याच्या भविष्याची खात्री नाही.  या देशात अशी लाखो लोक मरणप्राय दु:ख भोगत फक्त श्वास घेत आहेत, ज्याला आपण जगणं म्हणतो?   माझ्या tweet वरुन आपल्या भोवती जे चांगल घडतय तेच मांडायच ठरवलं होतं.  पण आज मन खुपच खिन्न झालं.  उदास झालो.   म्हणुन मन मोकळं केलं.  मला निगेटिव्ह् बोलायला मुळीच आवडत नाही कारणं मी निगेटिव्ह विचारच करू शकत नाही.   तरी आज माझ्या पुढे प्रश्न आहे की have I lost hope in my Country?  Is there a ray of hope?  Lets think hard...........वो सुबह कभी तो आयेगी!!

4 comments:

यशवंत कुलकर्णी said...

या देशात मरणार्‍यांना काही किंमत नाही. जर वीस हजार लोक मरूनही एक तप उलटल्यावर असला न्याय मिळत असेल आणि आपण या महान देशाचे असले माणसं मारणारे आंधळे कायदे पाळत असू तर एक गोष्ट पक्की आहे - हा गांडूंचा देश आहे (माफ करा - पण दुसरा शब्द नाही भावना व्यक्त करायला).
तुम्ही हे लिहून मोकळे झालात, आम्ही असल्या निरर्थक प्रतिक्रिया देऊन मोकळे होऊ..पुढे काय?

rohit said...

yashwant kulkarni, tumachi प्रतिक्रिया mala manapasun aavdali

priyadarshan said...

आपणाच जर आशा सोडली तर मग मात्र खरच कठिण आहे

प्रकाश अकोलकर said...

कुठल्याही विषयांवरील विचार किंवा त्यावरील प्रतिक्रिया निरर्थक कशी असु शकते? १९४२ साली गांधीजींनी इंग्रजांना "चले जाव"चा नारा दिला, त्या रात्रीच सर्व नेत्यांना अटक झाली. जे बाहेर राहिले, त्यांना गांधीजी म्हणाले "स्वस्थ बसू नका, जे सुचेल त्या प्रमाणे काम करा. चळवळ चालू ठेवा. या चळवळीत मरण आले तरी चालेल; पण स्वस्थ बसू नका." हा देश गांडूचा असता तर देशाला स्वतंत्र्या मिळालं नसतं. एक लढाई अजुन बाकी आहे एवढचं!