Friday, July 2, 2010

माझं tweet.....काय डेंजर वारा सुटलाय!

 २ जुलै २०१०:   शिर्षकावरून तुम्हाला वाटेल की मी मुंबईतल्या पावसाबरोबर येणाऱ्या वाऱ्याबद्दल बोलतोय.  पण तसं नाही.  "काय डेंजर वारा सुटलाय!"  हे  लेखक श्री. जयंत पवारांच मुंबईतील सद्य:स्थितीवर अत्यंत भेदक भाष्य करणारं नवं नाटक येत आहे.  हे नाटक काय असणार आहे याची तुमच्या इतकीच मला सुद्दा उत्सुकता आहे.  असो.   सांगायचं म्हणजे काल श्री. जयंत पवारांची आणि माझी काही कामानिमित्ताने भेट झाली.   त्यांच्या "लालबाग परळ"चं कौतुक केल्या शिवाय मला बोलायला सुरुवात करता येणंच शक्य नव्हतं.   गिरणी कामगारांची फरफट तुम्ही प्रभावीपणे मांडली या वाक्याने मी बोलायला सुरुवात केली.   पवार तुमचं लिखाणं खुपच पावरफुल असतं!  माझं पहिलं वाक्य.  तुम्ही एका वाक्यात खुप मोठा विषय मांडता.  दुसरं वाक्य.  पवारांच्या चेहऱ्यावर शांत स्मित.   दोघांच हस्तांदोलन.  माझ्या विषयांच्या बाहेर कुणाशीतरी बोलायला मिळालं की मी संधी सोडतच नाही.  कॉफी घेणार की चहा, ते म्हणाले कॉफी.
साधारण दोन तास आम्ही त्यांच्या कामासंबंधी बोलत होतो, पण त्यांच्या डोक्यात सतत विचार होता तो फक्त काय डेंजर वारा सुटलाय!  याचा.  नाटकाच्या नावातच मुंबईतला एखाद्या जव्लंत प्रश्न असणार हे नक्की!  हे त्यांच्या बोलण्यावरून जाणवलं तरीपण मी नाटकाच्या विषयी जास्त विचारणं योग्य नव्हतं.  मी म्हटलं लोकांच्या खुप अपेक्षा असणार तुमच्याकडुन.  ते किंचित हसले.  बघुया.   त्यांच्या  कुठल्याही  शब्दात  कमर्शियल  अप्रोच नव्हता.  बोलताना प्रत्येक विषयाची नीट माहिती घेताना ते दिसले,  माझा कुठलाही विचार ते खोडत नव्हते,  मोकळ्या मनाने आम्ही चर्चा केली.   मी म्हटंल मी लॉयर आहे, म्हणुन बऱ्याच वेळा माझ्या बोलण्यात एक अनाहुत "सल्ला" असतो!  माझा दोष नाही माझ्या प्रोफेशनचा आहे.  ते मना पासुन हसले.  काम संपल.  मी नाटकासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.  निरोप घेतला.  

ता.क:   सामान्य माणसांचे प्रश्न मांडताना त्यांच्याच ताकतीवर पवारांची भिस्त आहे असं मला त्यांच्या बोलण्यावरून  सतत जाणवतं  होत.  

No comments: