Friday, July 23, 2010

माझं tweet.....'तेंडुलकर ओपस' - लक्षम्ण रेषा?

२3 जुलै २०१०:   'तेंडुलकर ओपस' या मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या चरित्राची 'ब्लड एडिशन' बाजारात येतेय.   या चरित्राचे एक पान तयार करताना कागदाच्या लगद्यासोबत सचिनच्या रक्ताचे काही थेंबही वापरण्यात आले आहेत!    ८५२ पानांच्या ३७ किलो वजनाच्या आणि अर्धा चौ. मीटर क्षेत्रफळाच्या या चरित्राची किंमत आहे ७५ हजार अमेरिकन डॉलर्स!  केवळ १० प्रतींच्या या मर्यादित आवृत्तीमध्ये सचिनचे अप्रकाशित फॅमिली फोटों व त्याचे करिअर विषयी त्याचे विचार असतील.  सचिनचे डीएनए प्रोफाइलही पुस्तकात छापण्यात येणार असून त्यासाठी सचिनच्या लाळेचे नमुनेही मागवण्यात आले आहेत असे प्रकाशक क्रेकन मीडियाचे कार्ल फोव्लरने सांगितलं.  या अशा रक्तरंजीत पुस्तकाच्या दहाही प्रतींची नोंदणी झालेली आहे.  या दहा प्रतींच्या विक्रीतून येणारी रक्कम मुंबईत शाळा बांधण्यासाठी सचिनच्या संस्थेला देण्यात येणार आहे.   या चरित्राची प्रत्येकी दोन ते तीन हजार डॉलर्स किमतीची एक हजार प्रतींची आणि  त्याशिवाय २०० ते ३०० डॉलर्स किमतीची स्वस्त आवृत्तीही छावण्यात येणार आहे.   अशी बातमी मटात वाचली.  आणि परवा IBN7 Lokamat वर या विषयीच्या चर्चेत नाराजीचा सुर देखिल बघितला.  काल Economic Times मधे सुद्दा या अशा मार्केटिंगबद्दल काही मान्यवरांच्या नकारात्मक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.  थोडक्यात सचिनने चरित्रछापताना रक्त वापरण्याची गरज नव्हती.  ही Cheap publicity  आहे.
खरं सांगू क्षणभर या विषयी काय बोलावं हेच सुचलं नाही.   सचिन अस खरचं करतोय का? की त्याचा मार्केटिंगवाले वापर करुन घेत आहेत? हे सचिनसाठी चांगल की वाईट?  असे असंख्य विचार मनात आले.  पुन्हा असा विचार आला की आपण सचिनवर खुप अधिकार गाजवतोय का?  स्वत:च चरित्र कस छापाव आणि ते कस मार्केट कराव हा सचिनचा पुर्ण वैयक्तिक प्रश्न आहे त्याच त्याला स्वातंत्र्य असलंच पाहिजे.  आपण सचिनवर खुप प्रेम करतो, पण सचिनवर मर्यादा घालणारे आपण कोण?  समाजात चांगल काय आणि वाईट काय हे ठरविण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला?  आपल्या तोंडातुन निघालेला प्रत्येक शब्द खरा, आणि आपण केलेली प्रत्येक कृती ही चांगली!  पण तीच कृती इतरांनी केली तर वाईट.  नाही मी सचिनची बाजु घेत नाहीय, पण आपण त्याला किंवा आणखी इतर सेलिब्रेटिजना स्पेस देतो का?  समजा चुकला असेल सचिन तर त्याला त्याच्या चुकीची शिक्षा मिळेल.  प्रत्येक गोष्टीत आपण समाजाचे ठेकेदार का बनतो?  आता तुम्ही म्हणाल की सचिनला जर वागायची मुभा असेल तर आम्हाला त्यावर आमचे मत मांडायची सुद्दा मुभा असली पाहिजे.  ही लोकशाही आहे.  हो तुमच म्हणण रास्त आहे.   लोकशाही आहे कबुल पण त्यात सुद्दा लक्षम्ण रेषा ओढायला नको का?

ता.क:  २४ जुलै २०१०:  आज Times of India मधे सचिन ने खुलासा केलाय की वरील बातमी खोटी आहे, आणि त्याच्या पुस्तकात त्याच रक्त वगैरे काहीही असणार नाही.  त्याच्या पुस्तकाचे प्रकाशक क्रेकन मीडियाचे कार्ल फोव्लरने सुद्दा सांगितल की मी माझ्या पत्रकार परिषदेत जे बोललो त्याचा गैर अर्थ काढण्यात आला आणि वरील बातमी चुकीची आहे.   तेव्हां सचिनच्या चाहत्यांनी काळजी करू नये.   

1 comment:

अमित said...

सर १००% खरे आहे. अनुभवापेक्षा मोठा गुरु असुच शकत नाही.