Tuesday, August 24, 2010

माझं tweet.....मल्टिप्लेक्स आणि मराठी सिनेमा!

२४ ऑगस्त २०१०:  नारळी पोर्णिमेच्या शुभेच्छा!  गेल्या काही दिवसांपासुन महाराष्ट्रातील  मल्टिप्लेक्स हा चर्चेचा विषय बनला आहे.   मुंबईत मराठी हॉटेल्स, मराठी शाळा, नाट्यसृष्टी,  गिरणगावातल्या मराठी माणसांच्या चाळी, अशा सगळ्याच प्रंट वर आपण खुप मागे पडलो!   गेल्या ४० वर्षात मुंबईच मराठीपण जपण्यासाठी आपण ठोस काहीही करु शकलो नाही.   ज्या मराठी भाषेसाठी आपण जीवाच रान करतो, पोट तिडकीने बोलतो, त्या माय मराठी भाषेचं वर्षातुन एकदा होणारं साध साहित्य संमेलन आपण भांडण-तंट्या शिवाय नीट भरवु शकत नाही ही आपली शोकांतिका आहे!  याला जबाबदार कोण?   काही वर्षांनी तर मुंबईत मराठी माणुस  दुर्बिणीने शोधावा लागेल!   उद्या मुंबईत सगळीकडे मराठीच्या पाट्या लागल्या, मल्टिप्लेक्स मधे मराठी सिनेमा लागला तरी त्या आपल्या बांधवांना कल्याण डोंबिवली वसई आणि विरार मधुन मुंबंईत परत आणु शकणार नाही!   हे कटु सत्य आहे.  
त्याच्या जखमा अजुनही ओल्या असताना आपण आपला मोर्चा "’मल्टिप्लेक्स" कडे वळवलेला आहे.   उद्या मराठी सिनेमांना सगळी मल्टिप्लेक्स उपलब्द झाली तरी भरभरुन मराठी माणसं तिथं जातीलच याची खात्री कोण देणार?  त्यांना चित्रपट बघा असं आपण सुचवू शकतं नाही कारण आपल्या मराठी सिनेमांचा दर्जा?  सगळीच मराठी चित्रपट जरी ऑस्करच्या तोडीचे असणार नाही हे जरी आपण मान्य केले,  तरी त्यांना किमान दर्जा असायला हवा.   उदा.  ‘मुंबई पुणे मुंबई’ सिनेमा ‘बिफोर सनराईझ’ सिनेमावर आधारित चित्रपट असल्याचा एक लेख मी प्रहारमध्ये वाचला होता.  नंतर हा सिनेमा बघितलाही.   पण मुंबई पुणे मुंबई सिनेमा मला तितकासा मला आवडला नव्हता कारण मी इंग्रजी सिनेमा बघितला होता.  कित्येक निर्मात्यांना चित्रपट आणि कंटाळवाण्या दुरदर्शन मालिका यातला फरकच कळतं नाही!

इंग्रजी मुळ चित्रपट "बिफोर सनराईझ" हा सिनेमा आज दिनांक २४/८/१०ला रात्री १०:३० वाजता युटीव्ही वर्ल्ड मुव्हीज वर दाखवण्यात येणार आहे.  चुकवू नका!   ज्यांनी मराठी सिनेमा बघितला असेल त्यांना ओरिजन्ल काम काय असते हे कळेल.  जास्त काही लिहीत नाही, चित्रपट जरुन बघा.  जर आपण अशीच वाईट कॉपी करू लागलो तर मराठी चित्रपटांच काही खरं नाही!

ता.क:  आज आपण मल्टिप्लेक्स वर दगड मारले,  पण महाराष्ट्रभर मराठी मालकांचे मल्टिप्लेक्स आहेत आणि ते सुद्दा मराठी चित्रपट दाखवत नाहीत, त्यांना आपण काय शिक्षा देणार?  त्याच बरोबर सरकारच अनुदान मिळतं म्हणुन सिनेमा करणाऱ्यांवर आपण काय कारवाई करणार आहोत?   जो पर्यंत मराठी सिनेमांचा दर्जा आपण सुधारणार नाही तो पर्यंत मराठी सिनेमाला चांगले दिवस येणार नाही.  तुर्त इतकचं.

1 comment:

Anonymous said...

मुळात मराठी माणसासाठी काही राजकीय आंदोलने करणे म्हणजे शुद्ध मुर्खपणा आहे. सगळे राजकीय नेते फक्त स्वतःची भलाई करतात.
कानडी माणसासाठी अशी काही चळवळ नसताना बेंगलोर ने किती प्रगती केली आहे. अशी बरीच उदाहरणे सापडतील...