Monday, September 6, 2010

माझं tweet.....देशाच्या दारिद्र्याला जबाबदार कोण?

६ सप्टेंबर २०१०:   देशाच्या निरक्षरता, कुपोषण, स्वच्छतेच्या सोयींचा अभाव, अन्नधान्न्यांच्या व विजेच्या पुरवठ्याबाबतची दारूण स्थिती या गंभीर समस्यांच्या मागे दरिदी लोकप्रशासन ('पूअर गव्हर्नन्स') हेच कारण असल्याचे मत सॉफ्टवेअर उद्योगातील एक दिग्ग्ज व इन्फोसिस टेक्नॉलॉजिसचे 'चीफ मेण्टॉर' एन. आर. नारायणमूर्ती यांनी रविवारी बीएमएस कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग बेंगळुर मध्ये आयोजित बी. ई. व बी. आर्क.च्या प्रथम वर्ष विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आयोजित समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केले......... एक बातमी महाराष्ट्र टाइम्स
श्री. मूर्ती म्हणाले: स्वातंत्र्याच्या ६३ वर्षांनंतरसुद्धा ३५ कोटी भारतीय अजूनही वाचू आणि लिहू शकत नाहीत. २५ कोटी लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळू शकत नाही आणि ७५ कोटी लोक स्वच्छतागृहाच्या  सोयीपासून वंचित आहेत. देशात कुपोषित बालकांची संख्या एकीकडे प्रचंड आहे, तर दुसरीकडे देशात उत्पादन होणाऱ्या एकूण अन्नधान्यातील ३५ टक्के धान्य कुजून, खराब होऊन वाया जात आहे. भारतात उभारण्यात आलेली एकूण वीजनिमिर्ती क्षमता १४५ 'गिगावॅट्स' आहे आणि त्यातील फक्त 'गिगावॅट्स'च वापरली जात आहे. ही लाजिरवाणी व दु:खदायक गोष्ट आहे. केवळ दळभदी प्रशसानामुळे हे होत आहे, यात शंका नाही. (वृत्तसंस्था)

ता.क:  गेल्या वर्षी नारायण मुर्तींचे सहकारी नंदन निलकेणींना केंद्रिय सरकारने देशाच्या प्रत्येक नागरिकाला Unique Identification Cards देण्याच्या मोहिमेवर आणलं, आता सरकारने नारायण मुर्तींना सुद्दा एकुणच चांगल्या प्रशासनासाठी मार्गदर्शक म्हणुन नियुक्त करायला काय हरकत आहे.

No comments: