Monday, September 13, 2010

माझं tweet.....जय गजानन!

१२ स्पटेंबर २०१०:  संत गजानन महाराज संजीवन समाधीला कालच्या ऋषिपंचमीला शंभर वर्ष पुर्ण झाले!   गजानज महाराज संस्थान शेगाव हे एकच अस क्षेत्र आहे जिथं लाखो भक्त येतात, संस्था करोडोंचा खर्च करते, तरी कुठल्याही प्रकारच कमर्शियलाझेशन तिथं झालेल नाही.  मी शेगावला गेली ३० वर्ष, वर्षातुन एकदा तरी भेट देतो.   कालचा उत्सव हा अप्रतिम सोहळा झाला असणार यात शंकाच नाही.  ‘गण गण गणात बोतें’ या जयघोषांनी अवघा आसमंत निनादला असेल.  शेकडो दिंड्या  गजाननाच्या गजर करीत शेगावात दाखल झाले असतील आणि सर्वत्र भक्तीचा महासागर ओसंडून वाहत असेल.   गजानज महाराजांच देशात अस एकमेव स्थान आहे जिथं कुठलाही भेद भाव होत नाही - कुठलाही ’व्हीआयपी’ पास नाही.  प्रत्येकाला एकाच रांगेत उभं रहावं लागतं.
गजानन महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी कालच्या दिवशी शेगावात समाधी घेतली होती.   महाराजांच्या पोथीत ते जेंव्हा शेगावात प्रगटले तेंव्हा पासुन ते त्यांनी घेतलेली संजीवन समाधी पर्यंतचा काळाचे वर्णन आहे.   पोथीच्या १९व्या अध्यायात जेंव्हा आपण वाचतो की आता महाराज समाधी घेणार!  नकळतं पणे आपले डोळे पाणावतात,  महाराज आपल्याला सोडुन जाणार हा विचार मनाला बेचैन करतो!  मन दु:खी होतं.  तुम्ही म्हणाल की मी आज इतका भावूक का होतोय?  त्यांची शिकवण साधी आणि कार्य महान आहे.  मित्रांनो मी जे आज जे काही आहे ते श्री. गजानन महाराजांच्या आशीर्वादामुळेच आहे.   मी फक्त माझे कर्म केले, पुढच त्यांनी ठरवलं.  कित्येक संकट आली आणि गेली सुद्दा ही त्यांचीच कृपा.   गेल्या ३० वर्षात असंख्य वेळा त्यांनी मला धीर दिला आणि चुकलो तेंव्हा मार्ग दाखविला.  आज महाराज माझ्या ब्लॉग वर विराजमान झाले फार बरं वाटलं.  कृपा करून ही अंधश्रद्धा समजू नका. प्रत्येकाच एक श्रद्धा स्थान असतं तस माझ आहे.  माझ्या वाचक मित्रांना  श्री. गजाननाचा आशीर्वाद  मिळो!  हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करतो.

3 comments:

Nitin Joshi said...

reading the blog i felt as if i'm reading something that is what i feel. thanks for wording it

MeeKuchin said...

Rightly worded! I also visit Shegaon sansthan frequently and I am amazed everytime to see how this sansthan can work with so much honesty and modesty.
And as you said, everybody has to believe in something... which is God in different forms.

Anonymous said...

Gan Gan Gan Ganaat bote.