Saturday, October 16, 2010

माझं tweet.....आज रावणवध अशक्य?

१७ ऑक्टोबर २०१०:  दसऱ्याच्या सगळ्यांना शुभेच्छा!  दसरा म्हटंल की आपल्या आठवण होते ती - रामाने केलेल्या रावणवधाची!  दृष्टांचा संहार!  परंतु दुदैवाने आज सगळीकडे रामाच्या वेषात रावणच राज्य करीत  असल्या मुळे राम कोण आणि रावण कोण हेच समजत नाही,  म्हणजे आजतरी रावणवध अशक्य दिसतो!  बरं खऱ्या रावणाला दहा तोंड होती म्हणुन रामाला तो सहज ओळखता आला, आजचा राणाला एकच तोंड आहे, पण तो खातो मात्र शंभर तोंडाने!   त्यांना बघायच असेल तर अगदी सोप आहे,  काही रावण वर्षभर नाक्या नाक्यावर आपल्या वाढदिवसाची मोठमोठी पोस्टर्स, ऊंच कटआऊट्स लावतात!  
जाऊ दे अशा रावणांना मारण्यापेक्षा आपल्यातल्या रावणालातरी मारण्याचा प्रयत्न करूया!   काय आपल्यात रावण नाही?  असं म्हणता!  

अहो बस मधे आपण जोरात ढकलुन आत जातो,  कारण कंडक्टरने आपल्याला आत घेतलच पाहिजे, आणि  इतरांनी मात्र मागच्या बससाठी थांबाव अस आपलं प्रामाणिक मत असतं? आपल्याला कुणी मागुन ढकलायचा प्रयत्न केला तर आपला संताप अनावर होतो.   लोकल मधे आपल्याला चौथ्या सीटवर adjust करुन इतरांनी बसलं पाहिजे, पण आपल्याला तिसरी सीट मिळाली की वाटतं चौथी सीट असुच नये?  पब्लिक फोन वरून आपण बोलतो तेंव्हा इतरांनी थांबाव कारण आपलं बोलणं म्हत्वाचं आणि इतर बोलतात ते वायफळ?  आपण रस्ता क्रॉस करताना गाडी चालविणारे माजलेत अस आपल्याला  वाटणं स्वाभाविक आहे, पण आपण गाडी चालविताना लोकांना रस्ता क्रॉस करण्याची शिस्तच नसते अस आपल्याला वाटतं!  पुन्हा आपला संताप होतो.  आपण दोन पाच रुपयांची लाच घेतो कारण, इतर घेतात म्हणुन; संपुर्ण सिस्टिमच किडलेली आहे म्हणुन.  इतरांनी देश लुटला मग आपण मागे राहण्यात काही अर्थ नाही.  काय म्हणता रावण आपल्यातच जास्त आहे?  बघा बुआ हे मी म्हणतं नाहीय!

तसच ’दसरा’ म्हणजे सीमोल्लघंन!   आयुष्यात आपण ज्या टप्प्यावर आहोत त्यापेक्षा पुढे जाण्याचा निश्चय करणे म्हणजे सीमोल्लघंन!   कारण destiny gets decided only by dying desire! 

पुन्हा एकदा दसरा सणाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

2 comments:

नरेंद्र प्रभू (Narendra Prabhu) said...

वा...! एकदम बरोब्बर..., पटलं. रावण मारलाच पाहिजे आणि सीमोल्लघंनसुद्धा केलं पाहिजे.

Salil Chaudhary said...

आपल्यातला रावण मारणं तेवढे कठीण नाही आहे. मात्र आपल्यातला रावण ओळखणे हे सर्वात कठीण. सर, तुम्ही तो सोदाहरण दाखवून दिलात त्याबद्दल धन्यवाद.

तुम्हाला विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा !

सलिल चौधरी