Sunday, October 24, 2010

माझं tweet.....हत्ती! राष्ट्रीय़ वारसा.

२४ ऑक्टोबर २०१०:   मागच्या महिन्यात बंगालच्या मोराघाटच्या जंगलात सात हत्तींचा एका मालगाडीच्या धडकेने मृत्यु झाला तर एक हत्ती गंभीर जखमी झाला.  ह्या बातमीने सारा देश हळहळला नसता तरच नवलं.   तीन महिन्याआधी अशाच प्रकारे त्याच ठिकाणी एक हत्ती रेल्वेगाडीच्या  खाली  आल्याने मृत्यु झाला होता.   अपघाताची   नेहमी प्रमाणे चौकशी सुरु आहे?  त्या जंगलातुन जाताना आता रेल्वे गाडीचा स्पीड कमी करणार आहेत.   त्या बातमी नंतर आपल्या कडे गणपती आले आणी मला हत्तीविषयी जाणुन  घेण्याची  मना पासुन खुप इच्छा झाली.   गणपतीने माझी हाक ऎकली आणि या महिन्याच्या ४ तारखेला
श्रीलंकेत असताना  कॅन्डी या नयनरम्य ठिकाणी जाण्या आधी मुद्दाम Elephant Orphanage बघायचा योग आला.   मी तात्काळ हो म्हटंल.   एकदम ३० ते ४० हत्ती मी पहिल्यांदाच बघत होतो.   दुपारी लहान हत्तीच्या पिलांना मोठ्या बाटलीने दुघ देतात आणि मग सगळा हत्तींचा कळप आंघोळ करायला नदीवर जातो.   हत्तीवर बसण्याची  माझी  हौस होती ती सुद्दा पुर्ण केली.   हा प्राणी फारच शांत स्वभावाचा आहे, पण लहान हत्ती जरा खट्याळ असतात.   हत्तींच चालणं तर अगदी  बघण्यासारखं असतं.   हत्तींना संभाळायला लहानपणापासुन एकच व्यक्ति असते. 

"हत्ती" या प्राण्याला केंद्र सरकारने नुकतचं ‘राष्ट्रीय वारसा’ म्हणून दर्जा बहाल केला आहे.   यापुढे हत्तीला संपूर्ण संरक्षण देण्याच्या दृष्टीने सरकार प्रयत्न करील अशी आशा करुया.  हत्तीच नव्हे तर कुठलाही प्राण्याला शेवटी जीव आहे आणि त्या प्रत्येकाला सुद्दा माणसाप्रमाणे जगण्याचा पुर्ण अधिकार  नाही का?   खरं तर कित्येक माणसंच आज जनावरां पेक्षा जास्त हिंस्त्र आहेत तरी ते समाजात मोकाट  फिरत आहेत त्यांच काय?   गणपती बाप्पा त्यांना लवकर सुबुद्दी देवो हीच प्रार्थना करूया!

No comments: