Wednesday, November 3, 2010

माझं tweet.....शुभ दिपावली! २०१०

३ नोव्हेंबर २०१०:  दिपावली म्हटंल की आनंदाचा, उत्साहाचा आणि भरपुर कार्यक्रम activityचा सण! दिपावलीच्या शुभेच्छा कार्डस तयार करणे (कालपर्यंत विकत घेत होतो - आता आपण ई-ग्रीटिंगस पाठवितो), कंदिल  बनविणे (हल्ली फोल्डिंगचे विकतं घेतो), फराळ बनविणे (हल्ली तोही विकत मिळतो - त्यातच डायट आणि शुगर फ्री फराळ देखिल मिळतो!), फटाके घ्यायला जाणे (ते थोडं कमी झालंय), मित्रांच्या घरी जाणे (हल्ली एखाद्या मॉलला भेट देतो), नविन कपडे आपल्या नेहमीच्या शिंप्याला शिवायला देणे (हल्ली रेडी मेड ब्रॅण्डेड कपडे घेतो), मित्रांना फोन करणे (हल्ली फेसबुक, ट्विटर   आणि SMS वरून मेसेज पाठवितो), दिवाळीची नवीन खरेदी (त्यात मोबाईलचा हॅन्डसेट बदलणं हे हमखास असतं). मी दिपाली साजरी करण्याच्या पद्दतीवर मुळीच टीका करीत नाही, तशी इच्छा देखिल नाही, फक्त दिवाळी साजरी करताना होत गेलेला फरक मांडण्याचा प्रयत्न केला!  मला माहित आहे की ’बदल’ हीच अशी गोष्ट आहे की ती  ’कायम’ असते!  
वर म्हटंल्याप्रामाणे दिपावली साजरी करण्याची पद्दत जरी बदलत असली, तरी आपण जे काही करतो ते आनंदात आणि भरपुर उत्साहात करतो नव्हे ती तशीच साजरी केली पाहिजे!  फेसबुकर, ट्विटरवर किंवा एसएमएस (SMS) द्वारे शुभेच्छा पाठवीताना त्या दोन ओळीतुन आपल्याला "संवाद"  साधता येईल का?  आपण मेकॅनिकल होतो का?  आत्मीयता निर्माण होणं गरजेच आहे.  मनात  कुठलाही किंतू किंवा कटुता न ठेवता एकमेकांना प्रेमाने भेटायचा प्रयत्न केला तर केंव्हाही चांगल.  आज Internet मूळे जग जवळ आलयं अस आपण म्हणतो, पण दुर्दैवाने आपण एकमेकांपासुन दुर होत चाललो आहोत का? असा मला उगाच प्रश्न पडतो?   अस होत असेल तर हे सुद्दा कुठेतरी बदलायला हवं!    SMS किंवा फेसबुक वर किती मेसेजस पाठविले याला महत्व न देता किती मित्रांशी  आपण  प्रामाणिकपणे जवळीक साधु शकलो हे महत्वाच आहे.     

दिपावली म्हणजे Festival of lights! दिव्यांची दिपावली.  मनातल्या स्नेहभावनांचं प्रतीक!  मांगल्य-पावित्र्य, सौख्य, समृद्धी, उत्कर्ष, समाधान, शांती, आरोग्य, स्वप्नपुर्ती, असे अनेक गुण असणाऱ्या दिव्यांचा सण!!   मित्रांनो असे अनेक दिवे तुमच्या अंगणात, माजघरात, मनात, हृदयात, गाभाऱ्यात तेवत राहो आणि या दिव्यांचा प्रकाश तुमच्या संपुर्ण कुटूंबावर मित्रांवर अक्षय कृपावंत होवो हीच देवाजवळ प्रार्थना..............

दिपावली व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

No comments: