Tuesday, November 9, 2010

माझं tweet.....अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामां!

९ नव्हेंबर २०१०:  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा व त्यांची पत्नी मिशेल तीन दिवसांचा दौरा आटपून आशिया खंडाच्या पुढच्या प्रवासाला आज जातील.   त्यांच्या वर पहिल्या दिवशीच पाकिस्तानवर तोफ डागली पाहिजे होती इंथ पासुन ते अमेरिकेचे सेल्समेन आहेत आणि भारताला त्यांच्या कडुन काहीही फायदा होणार नाही, आज मंदीच्या काळात अमेरिकेला आपली गरज जास्त आहे आपल्याला नव्हे!  इथं पर्यंत सगळ्यांनी टीका केली,  आणि त्यांच्या भेटीचे कवित्व अजुन काही दिवस आपला मिडीय़ा जिवंत  ठेवतील यात काही शंका नाही.   ओबामांनी आपल्याला रस्ते, वीज, पाणी, अन्न, वस्त्र आणि निवारा या सगळ्यांसाठी कुठल्याही अटी शिवाय सढळ हस्ते मदत करावी, भरपुर पैसे द्यावेत आणि त्यावर आपल्यासाठी पाकिस्तानला सुद्दा सज्जड दम भरावा अशी काहींची अपेक्षा होती.   अमेरिका असो  किंवा इतर कुठलाही देश असो त्यांचे राष्ट्राध्यक्ष काही ब्लॅन्क (Blank) चेक बुक घेऊन कुठेच जात नाही!   अशी टीका करणाऱ्यांना मला साधा प्रश्न विचारायचा आहे की आपल्या राज्यकर्त्यांनी गेली ६३ वर्ष आपल्या देशासाठी काय केल?    आपल्या राज्यकर्त्यांनी कुठला "आदर्श" जनतेपुढे ठेवला हे आपल्याला चांगल माहित आहे?
जाऊदे!   २००८ सालीची बराक ओबामांची राष्ट्राध्यक्ष निवडणूक असताना मी अमेरिकेत होतो, आणि ते त्यावेळी जस बोलायचे तसचं किंबहुना त्यापेक्षाही ते जास्त Focussed आता मला वाटले.   ते हल्ली जास्त सिरिअस झालेत अस दिसते.  या वेळी त्यांचा एक गुण मला फारच प्रभावी वाटला आणि म्हणुनच माझं आजच हे ट्विट - त्यांचा तो गुण म्हणजे कुठल्याही प्रश्नाच उत्तर ते फार सिरियसली देत होते मग त्यांना प्रश्न विचारणारी आपल्या सेंट झेवियर्सची मुलं असोत की राजधानी दिल्लीतले  मुरब्बी पत्रकार!   प्रत्येक प्रश्न ते नीट समजुन त्याला विचारपुर्वक उत्तर देत होते.   किंबहुना मिशेल तर सेंट झेवियर्सच्या मुलांना म्हणाली की राष्ट्राध्यक्षांना चांगले "टफ" प्रश्न विचारा.   कुठल्याही प्रश्नकर्त्याला त्यांनी टोलवाटोलवी ची उत्तर दिली नाहीत की उल्टा प्रश्न विचारला नाही.    कुठलाही प्रश्न त्यांनी उडवला नही की कुणावरही टीका केली नाही.  त्याच बरोबर त्यांच्या चेहरा सतत प्रसन्न होता.  आपल्याकडे  कुठलाही राजकारणी (अटल बिहारी बाजपेय़ी आणि स्व. इंदिरा गांधी सोडल्यास) इतकी विचारपुर्वक अशी उत्तर देऊ शकत नाही,  किंबहुना आपण प्रत्येक प्रश्नाला कशी बगल दिली याच त्यांना  मोठ कौतुक असतं, त्यात महाराष्ट्राचे नेते सगळ्यात पुढे असतात हे सांगायलाच नको.   विषय कुठलाही असो आपले नेते त्यावर टीका मात्र चांगली करु  शकतात!   बराक ओबामांच्या भारत भेटीतुन देशाला काय मिळालं हे शोधत बसण्यापेक्षा आपल्या राजकर्त्यांनी निदान लोकसभेत तरी कसं बोलाव हे जरी समजलं तरी मी म्हणेन आपण पुष्कळ मिळवलं!

1 comment:

महेंद्र said...

खूप विचारपुर्वक लिहिलेली पोस्ट आहे.प्रत्येक मुद्दा पटला. धन्यवाद.