Sunday, December 5, 2010

माझं Tweet.....नटसम्राट नाना पाटेकर!

३ डिसेंबर २०१०:   आमिर खानने लगान मधे साकारलेला "भुवन"च्या भुमिकेत शाहरुख खान असता तर?   आणि दुसरीकडे स्वदेस मधे शाहरुखच्या भुमिकेत अमिर खान!  अमिरचा "गजनी" आपल्या सन्नी देओलने जास्त चांगला केला असता.   शारुखखानने अमिताभचा  "डॉन" करण्यापेक्षा १९६० सालचा दिलीपकुमारचा "नया-दौर"  आज इन्टर्नेटच्या युगातला करायला पाहिजे होता.   अमिरखान ने मनोजकुमारचा "पुरब और पश्चिम" करावा ही माझी मनापासुनची इच्छा आहे!  त्याच बरोबर "शोले" पुन्हा कुणीही करण्याच्या भानगडीत पडु नये अगदी अमिताभ, धर्मेंद्रने आणि हेमाने सुद्दा;  हे ही मला तेवढंच मना पासुन वाटतं!  कतरीना ने चित्रपटात काम करण्यापेक्षा "बिग बॉस" मधे काम कराव अशी इच्छा बऱ्याच लोकांची आहे म्हणजे तिला भरपुर काम करायला मिळेल?  मराठी चित्रपटांच विचाराल तर मला वाटतं दादा कोंडक्यांचे चित्रपट कुणीही करण्याचा प्रयत्न करू नये!  कारण दादा पुन्हा होणे नाही!  तुम्ही म्हणाल हा आज मी काय विषय घेउन माझं Tweet लिहितोय?  विषय कसा आला सांगतो.....
मराठी नाटकांच्या बाबतीत मला खुप दिवसांपासुन वाटतं होत की नाना पाटेकरांनी वि. वा. शिरवाडकरांच अजरामर पात्र आप्पासाहेब बेलवलकर केलं तर?  आणि ही बातमी आली की खरचं नाना पाटेकर नटसम्राट करणार आहेत!  (आता आमचे मित्र संजय गोविलकर असते तर पटकन म्हणाले असते क्या बात है!)   माझ्यासकट नानांच्या असंख्य फॅन्ससाठी ही आनंदाची बातमी  असणार आहे.   पण त्यात एक थोडी गफलत अशी आहे की नटसम्राट हा चित्रपट येतोय आणि तो बनविणार आहे महेश मांजरेकर.   मला नटसम्राट नाना पाटेकर मोठ्या पडद्या पेक्षा शिवाजी मंदीरात किंवा आमच्या रविंद्रमधे बघायला जास्त आवडले असतं.
‘कुणी घर देता का घर’ हा अजरामर करणारा प्रश्न यावेळी रंगमंचावर ऎकु येणार नसून मोठय़ा पडद्यावर नाना आपल्या खर्जातल्या आवाजात आपल्या पुढे मांडणार आहे.   त्याला कस बेअरिंग येईल हेच मला समजत नाही कारण  "नटसम्राट" हा चित्रपट असु शकतो यावर माझ मूळी विश्वासच बसत नाही.   तरीपण नाना पाटेकर या भूमिकेला रुपेरी पडद्यावर नक्कीच न्याय देतील यात शंकाच नाही.   नाना कुठल्याही रोल मधे जीव ओतुन काम करतात आणि प्रत्येक पात्राचं महत्व त्यांच्या कामामुळॆ नकळतपणे वाढत.  ही एका नटाची कुठल्याही कलाकृतीला मोठी Contribution असते अस मला वाटतं.   असो.  महेश मांजरेकर सध्या चित्रपटाच्या पटकथेवर काम करीत आहेत; त्यांना नाटकात असलेल्या व्यक्तिरेखांच्या स्वभावात काही बदल करण्याची इच्छा आहे, आणि प्रसंगही नाटकापेक्षा थोडे वेगळे करण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे.  सध्या चित्रपटाच्या पटकथेवर काम चालु आहे आणि जो पर्यंत पटकथा मनासारखी होणार नाही तो पर्यंत कामाला सुरुवात करायची नाही असं त्यांनी ठरवलं आहे.   सध्या फक्त नटसम्राटच्या भूमिकेत नाना असणार आहे  आणि तस नानांनी मांजरेकरांना कळवलं आहे अस त्यांनी सांगितलं. 
टीप:  नानांच्या प्रेमामुळे काल मुंबई ते लंडन प्रवासात नाना पाटेकरांचा प्रकाश झा दिगदर्शित "राजनीती"  पुन्हा बघितला.  नाना म्हणजे आपलं खणखणीत नाणं!  वाजणारचं.   आपण नानाला हसताना फार कमी बघतो म्हणुन त्यांचा एक छानसा हसणारा स्नॅप देत आहे.

2 comments:

नरेंद्र प्रभू (Narendra Prabhu) said...

क्या बात है नितीनजी, मस्त झालय लिखाण, नाना हा माझा खुपच आवडता नट, कलाकार आणि माणूस सुद्धा. आवश्यक नसेल तेव्हा तोंडाला रंग न लावता कॅमेर्‍यासमोर येणारा नाना सारखा कलाकार विरळाच. नाना नटसम्राट करणार हे वाचल्याबरोबर 'अरे वा...!!! अशीच प्रतिक्रीया होती माझी, पण पुढे हा अभिनय नाटकातला नसून चित्रपटातला असणार म्हटल्याबरोबर, अरे...? असं झालं खरं. असो नानाचा आणखी एक रोल बघायला मिळणार. वाट पाहूया.

सोहम said...

"नटसम्राट" आणि ते ही नाना व्वा क्या बात है ! पण नाटकाचा चित्रपट बनवताना ती मजा राहील की नाही शंका आहे.

उदाहरण द्यायचं तर हल्लीच आलेला " लालबाग परळ " . "अधांतर" हे नाटक जेवढा चटका लावुन जातं त्या मानाने चित्रपट अगदीच सुमार आहे. अर्थात महेश मांजरेकरने चित्रपटासाठी मुळ नाटकात बरेच बदल केले म्हणा त्यामुळेही असेल. तेव्हढं दिग्दर्शकाने टाळल तर बरं.