Wednesday, December 15, 2010

माझं Tweet.....शिस्त+संयम=प्रगती

१५ डिसेंबर २०१०:  आज १० दिवसांचा माझा पॅरिस, मिलान आणि लंडन असा युरोप दौरा संपला, उद्या लवकर मुंबई गाठायची!  घरी जायचं.   म्हणुन आज शांतपणे झोपायच ठरवलं तरी झोप येईना म्हणुन आजच ट्विट लिहायला घेतलं.  या दौऱ्यात दोन अनुभव मनात घर करुन राहिले ते इथं देत आहे.   सुरुवातीलाच लंडन ते पॅरिस हे माझं विमान स्नोफॉल मुळे रद्द झालं आणि मला लंडन विमानतळानजीकच्या हॉटेल मधे राहण्याची पाळी आली.   खराब हवामानामुळे हिथ्रोएअर पोर्टवर बरीच विमान रद्द झाल्यामुळे  लोकांचे खुप हाल होतील असं वाटल होतं.  पण आश्चर्य म्हणजे,  British Airwaysने सगळ्यांची चांगली सोय केली होती.   त्यांच्या प्रत्येक काऊंटर वर लोकांची प्रचंड गर्दी होती तरी मला त्यांचा संयम बघुन आश्चर्याचा सुखद: धक्का बसला.   म्हातारी माणसं, बायका, लहान मुलं मुली सगळे निमुटपणे चार ते पाच तास रांगेत शांतपणे उभं राहुन दुसऱ्या विमानासाठी आपली तिकीटं बदलून घेतं होती.  कित्येकांच दुसरं विमान सकाळी लवकर असल्यामूळे त्यांनी विमानतळावरचं राहण्याचा निर्णय  घेतला.   त्यांना विमानतळ अधिकाऱ्यांनी ब्लॅकेट्स आणि पाण्याच्या छोट्या बॉटल्स दिल्या.   प्रत्येक  passengerला अधिकारी वर्ग आणि विमनतळ कर्मचारी परिस्थिती नीट समजावुन सांगत होते, त्यांची विचारपुस करीत होते.   तर द्सरीकडे विमानतळावर रात्री एक किंवा दोनच कॉफीशॉप्स उधडी असल्या मुळे तिथं ही पुन्हा मोठी रांग.......कुठेही गडबड नाही, धक्काबुकी नाही!   अशा परिस्थितीत आपण रागावतो, ओरडतो, चिडतो  थोडक्यात मोठा तमाशा करतो...... ....

पॅरिस आणि मिलान नंतर गेली तिन दिवस माझा मुकाम लंडनला होता.   ट्युब ट्रेन मधुन प्रवास करताना पुन्हा असाच सुख:द आश्चर्याचा धक्का बसला......सकाळी गर्दीच्या वेळेस लोक भुयारी रेल्वे प्लॅफॉर्म वर येताना आणि जाताना कितीही गर्दी झाली तरी धक्का-बुक्की करीत नव्ह्ते.   Escalatorsवर उजवीकडे लोक उभी राहतं आणि ज्यांना लवकर जायचं असे ती लोक escalatorच्या  डावीकडुन भराभर-चालत जातं.  प्रत्येक स्टेशन वर हेच चित्र.   बरं एखादी ट्रेन रद्द झाली तरी Oh no!  इतकंच म्हणंत शांतपणे दुसरा मार्ग शोधतात.   कुठल्याही कारणासाठी हातात दगडं घेणं हा प्रकारचं किती क्रुर आहे हे मला इथं नव्याने उमगलं!

मनात प्रश्न पडला की ही माणसं रागावतात तरी केव्हां?  माणसांच्या डोक्यावर थंड हवामानाचा इतका परिणाम होऊ शकतो?  तर दुसरीकडे त्यांच्या कामाचा वेग आणि जोश बघितला तर एकदम उलटा.   छोट्या छोट्या कॉफीशॉप्स मधे काम करणारी मुलं मुली बघितली तर आपण थक्क होतो!  मला वरील दोन्ही गोष्टींच इतकं कौतुक वाटलं.   हळू हळू त्यांची शिस्त आणि संयम बघुन त्यांच्या प्रगतीचं  आणि यशाचं कोड उलगडल्या सारखं वाटु लागलं..... 

5 comments:

Fort Arnala said...

Dear Nitin,
Ihave been reading your blogs for some tme,they are really worth multiplying for wide KNO MMT,among Marathi youth,
As you are related to corp world,and if you think fit,please try to distribute your blogs to schools,college students,through Kno festival,ALONG WITH mARATHI sAHITYA sAMMELAN LIKE EVENTS,AS NOT MANY READ NEWSPAPERS,OR HAVE NET A/C.
Such events may be supported by (Y)our readers online,by supporting hard copy production cost,that may not be much,plus some paper manufacturing companies coul provide paper grant,
I have kept Ru.101,as token support redy to send it to you the moment you call for it.
For doing good to Marathi,one can act without speaking or writting in Marathi,
Istrongly respect Marathi,
but I am beyond the magneticfield of Marathi,and we can realy soar high,when we can overcome magnaticfield,with full respect to it.
HAPPY NEW YEAR 2011,FOR YOU ,MY NITY,READERS,SUPPORTERS,MEMBERS OF FAMILY AT WORKSTATION &BACK HOME.
Regards,
From:Noth sea.

Nitin Potdar, Corporate Lawyer, Mumbai. said...

Many thnx 4 ur kind words and ofcourse 4 d token support, which is like million dollar! Yes. I really appreciate ur gesture. I am doing whatever I cd do & hope others to do their bit for the society. Once again thnx 4 ur comment.

I could not get ur real identify from ur blog?

Fort Arnala said...

Thank you Nitin,
for taking off some time,and jotting down few words,
hope Jetlag is over,
bye till next post,
Regards,
From: North sea

Meena Lama said...

sir tumcha anubhav vachun khup chaan vatll....tya nimmitta ne sayyam aani shistt kiti mahatvachi aahe he punha ekada siddhh zall.....
thank u. Meena

Sonali Thorat said...

Hi,

We have shortlisted this article for Netbhet eMagazine Dec 2010. We seek your permission for incorporating this article in magazine.

Please provide your full name and email id.
Please write to salil@netbhet.com or call Salil Chaudhary - 09819128167 for more information.

Regards,
Sonali Thorat
www.netbhet.com