Friday, January 28, 2011

माझं Tweet.....व्याख्यानमाला - विचारांचा गुणाकार!

२८ जानेवारी २०१०:  मुंबईतील गिरणगावातील ‘स्वामी विवेकानंद व्याख्यानमाले’चे यंदा ५३ वे वर्ष!  अमर हिंद मंडळ दादर आणि विलेपार्ले येथील ‘मॅजेस्टिक गप्पा’नीही आता आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.    दादर आणि विलेपार्ले पाठोपाठ बोरिवली येथे ‘शब्दगप्पा’चे तर वसई येथे ’संजीवनी" व्याख्यानमालेचे आजोजन केले जाते.   दुसरी कडे ठाणे शहरातील ‘रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष आहे.   मुंबईत डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान  अशी विचारांची देवाणघेवाण मोठ्या प्रमाणात होत असते.   खरं तर ठिकठिकाणी, खास करून प्रत्येक शाळा आणि कॉलेजात असे कार्यक्रम व्हायला पाहिजे.   परदेशात सुद्दा मला वाटतं जिथं मराठी माणसं आहेत तिथं असे कार्कक्रम होत असावेत?   फेसबुक, लिंक्डईन किंवा ऑरकूट या सोशल नेटवर्किंग साईट्सपेक्षा "व्याख्यानमाला"  ही एक जिवंत आणि मोठं सोशल नेटवर्किंगच जाळं आहे!  ते वाढलं पाहिजे.  

मला वाटतं की अशा व्याख्यानमाला आयोजकांनी त्यांच्या संस्थेची एक चांगली वेबसाईट करायला पाहिजे. प्रत्येक व्याख्यान युट्युब वर अपलोड केलीत तर जगभरातील लोकांना त्याचा आस्वाद घेता येईल. आज फेसबुक किंवा तत्सम सोशल वेब साईट्सच्या मदतीने जास्तित जास्त लोकांपर्यंत अशा कार्यक्रमांची माहिती नेता येईल. ज्येष्ठ नागरिकांबरोबर आजच्या तरूणांना आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरतील किंवा आवडतील असे विषय घेतले गेले पाहिजे. आजचे तरूण उद्याचे नागरीक आहेत, ते आज जास्त व्यवहार्य (practical) असतील पण त्यांना प्रेमान दिशा देण्याच काम मोठ्या प्रमाणात अशा व्याख्यानमालेतुन होऊ शकतं. नव्हे ते व्हायलाच पाहिजे.

Wednesday, January 26, 2011

माझं Tweet.....२६ जानेवारी! कुठे चाललाय देश.


२६ जानेवारी २०११:  आज २६ जानेवारी! या दोन चित्रांकडे नीट बघा, कारण आपल्या देशाच भवितव्य या दोघांच्या हातात आहे!चित्र बघताना झेंडा ऊंचा रहे हमारा! म्हणायला विसरू नका.  कारण आजच्या दिवशी निदान तेवढं तरी करूया.  

  

Tuesday, January 25, 2011

माझं Tweet.....यशाच्या क्षितिजाचे रहस्य! पंडित भीमसेन जोशी.

२५ जानेवारी २०१०:  २०१० च्या कटू आठवणीतून बाहेर पडत असतानाच २०११ साल उजाडलं आणि हा संगीत सुर्य मावळला!...... पंडितजींनी १९९४ साली कालनिर्णयसाठी  लिहीलेला लेख आज महाराष्ट्र टाईम्स ने प्रसिद्द केला तो माझ्या वाचकांसाठी देत आहे.   ..... "मिले सूर मेरा तुमरा, तो सूर बने हमारा" या एका स्वरात पंडितजींनी देश जोडला!  आपली पिढी खरोखरच भाग्यवान  कारणं आपल्याला त्यांना ऎकता आलं.  पंडितजीं बद्दल मी काय लिहीणार..... ईश्वार त्यांच्या आत्म्याला शांती   देवो!

यशाच्या क्षितिजाचे रहस्य!  .. पंडित भीमसेन जोशी (१९९४)

तसे जीवनात काहीतरी भव्यदिव्य करण्याचे, कुणीतरी बनण्याचे स्वप्न प्रत्येकजण आपापल्या प्रकृती आणि प्रवृत्ती धर्मानुसार रंगवीत असतोच! अर्थात, त्या प्रत्येकाचा तो संकल्प, ते स्वप्न वास्तवात साकार होतेच असे नाही. कारण संकल्प आणि सिध्दी यांमध्ये इश्वरेच्छेचा फार मोठा सहभाग असतो. असे असते तरी एक मात्र खरे की, एखाद्याने जर आपण अमुक एक काम करून दाखवूच, मग काय वाटेल ते सहन करायला लागले तरी हरकत नाही असा दृढनिश्चय करून जिद्दीने न थांबता, न कंटाळता अथक परिश्रमाने त्या ईप्सिताचा पाठपुरावा केला, तर त्याचे ते ध्येय पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही!

जीवनात यशस्वी व्हायचे असेल, नव्हे, नेत्रदीपक यश मिळवायचे असेल तर आपण करीत असलेल्या कामाप्रती निष्ठा, आवड, प्रेम, आत्मियता आणि अर्थात त्या कामाला आवश्यक असलेले गुणही आपल्यामध्ये हवेत, त्याबरोबरच स्वत:बद्दल, स्वत:च्या गुणांबद्दल, कर्तृत्वाबद्दल प्रखर आत्मविश्वास आणि जिद्दही हवी. प्रतिकूलतेच्या भट्टीत जेव्हा ही जिद्द तावून-सलाखून निघते आणि वास्तवतेच्या ऐरणीवर भल्याबुऱ्या अनुभवांचे घाव तिच्यावर बसतात, तेव्हाच तिला खरा आकार मिळतो!

Sunday, January 16, 2011

माझं Tweet.....सचिन नंतर शतकं करणारे बेडेकर मसाले!

१६ जानेवारी, २०१०:   गेल्या ट्विट मधे आपण सचिनच्या शतकांच अर्धशतक साजरं केलं, उभ्या देशाने आणि समस्त मराठी माणसांनी त्याची पाठ थोपटली;  त्याच बरोबर  मागच्याच महिन्यात गिरगाव, मुंबई येथील "व्ही. पी. बेडेकर ऍण्ड सन्स प्रायव्हेट लिमिटेड" म्हणजे "बेडेकर मसाला" या उद्दोगसमूहाने साजरं केलेल शतक हे फार महत्वाचं आणि अभिमानास्पद आहे.   त्याची दखल घेणं आज जरूरी आहे.   मागच्याच वर्षी आपण दुबई स्थित मसाला किंग धनंजय दातार यांच कौतुक केलंच आहे. 

लोणची, मसाला आशी छोटी वाटणारी उत्पादनांचा देखील एक मोठा उद्दोगसमूह होऊ शकतो, आणि तो भरपुर पैसे देऊ शकतो हे त्या दोघांनीही जगाला दाखवून दिलं.   लिज्ज्त पापडचं उदाहरणं देखिल आपल्या समोर आहे.  या उद्दोगांची गंमत म्हणजे या उद्दोगांना कुठल्याही प्रकारच "रॉकेट सायन्स" लागत नाही की सोफेस्टिकेटेड टेकनॉलोजी;   मार्केटिंगच्या ब्रॅण्डिंगसाठी कुठल्याही सेलिब्रेटीवर करोडो रुपये खर्च करावे लागत नाही की, लाखोरुपयांची  प्लाण्ट आणि मशिनरी विकत घ्यावी लागत नाही.  अगदी छोट्या भांडवलावर, घरच्या घरी अगदी दोन माणसांच्या चार हातांनी हा उद्दोग सुरु करता येतो.   पण तुमची मेहनत संयमाच्या तेलात निमुटपणे मुरल्याशिवाय यशाच्या लोणच्याची चव तुम्हाला चाखता येणार नाही हे ही तितकचं खरं!   सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोठ्या प्रमाणात स्वंय रोजगार निर्मिती करणाऱ्या अशा ह्या उद्दोगांची आपल्या देशाला जास्त गरज आहे!   

Friday, January 14, 2011

माझं Tweet.....व्हयब्रंट गुजरात! थंड महाराष्ट्र...

१५ जानेवारी २०१०: मित्रांनो गेली दोन दिवस गुजरात इथं 'व्हायब्रंट गुजरात' या देशी आणि परदेशी उद्योजकांच्या मेळाव्याच्या गेल्या दोन दिवसामध्ये २०.२३ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची आश्वासने मिळाली आहेत.  या दोन दिवसात ८००० उद्दोगपतींनी गुजरात मधे ५२ लाख रोजगार निर्मिती होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.    त्यात वीज निर्मितीसाठी सगळ्यात जास्त गुंतवणुक  म्हणजे ३.३८ लाख कोटी रुपयांची आहे.   गुजरात राज्याने पुन्हा एकदा उद्योगक्षेत्राला आपल्याकडे खेचून घेण्यामध्ये यश मिळविले आहे.   या मेळाव्याला रतन टाटा पासुन अंबानी बंधु आणि कित्येक म्हत्वाचे देशी आणि परदेशी उद्दोगपती आले होते.  गुजरातचे सीईओ मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी काल म्हटंल की त्यांच्या आयुष्यात गुजरात एक "इकोनोमिक जायंट" म्हणुन निर्माण करायचा आहे!   या दोन दिवसात नरेंद्र मोदींनी कारखानदारीला भरपुर असे अनुकूल वातावरण तयार करून दिले.  एकेकाळी महाराष्ट्र हा कारखानदारीत आघाडीवर होता. आज तीच जागा गुजरात घेत आहे.   त्यांच्या प्रगतीच्या भरभरुन बातम्या येत आहेत..... मन उदास होतं कारण... 

इथं आपण पुण्यात पुतळ्यांच "आदर्श" राजकारण करण्यात मश्गुल आहोत.........काय लिहीणार?

..............महाराष्ट्राने फक्त गुजरातच्या प्रगतीच्या बातम्या वाचायच्या आणि थंड बसायचं?

Saturday, January 1, 2011

माझं Tweet.....नविन वर्ष संकल्प - टाईम मॅनेजमेंट!

१ जानेवारी २०११:    सर्वप्रथम माझ्या मित्रांनो तुम्हाला नववर्षाच्या खुप खुप शुभेच्छा!  

"वेळ कुणासाठीही थांबत नाही"  दरवर्षी ३१ डिसेंबरला नव्याने समजणारी गोष्ट!   ३१ डिसेंबरला सकाळची वृतपत्रे, बातम्या बघताना आपण नकळतपणे  भुतकाळात जातो, पण लगेच संध्याकाळ होताना दुसऱ्या दिवसाची म्हणजे १ जानेवारीची नव्या उमेदीने वाट बघतो!   सकाळी माईंड फ्रेश असतं!  मनात नव्या संकल्पना,  नविन दिशा आणि एका चांगल्या मुड मधे आपण असतो!  नव्हे असायलाच पाहिजे.  
काल दुपारी अचानक पुण्याला जायचा योग आला.   पुण्याला जाताना शक्यतो मी स्वत:गाडी चालवतो,  पण निघताना थोडा कंटाळा आला, आणि परत Express way वर ३१ डिसेंबरच ट्रॅफिक असेल म्हणुन म्हटंल चला आज टॅक्सीने जाऊया.  दुपारी २.०० वाजता दादरच्या टॅक्सी स्टॅण्डवर जाऊन टॅक्सी केली, माझ्या बरोबर एक आजी आजोबा, एक २० वर्षाचा पुण्याचा तरतरीत मुलगा - अमोल! आणि मी असा प्रवास सुरु झाला.