Friday, January 28, 2011

माझं Tweet.....व्याख्यानमाला - विचारांचा गुणाकार!

२८ जानेवारी २०१०:  मुंबईतील गिरणगावातील ‘स्वामी विवेकानंद व्याख्यानमाले’चे यंदा ५३ वे वर्ष!  अमर हिंद मंडळ दादर आणि विलेपार्ले येथील ‘मॅजेस्टिक गप्पा’नीही आता आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.    दादर आणि विलेपार्ले पाठोपाठ बोरिवली येथे ‘शब्दगप्पा’चे तर वसई येथे ’संजीवनी" व्याख्यानमालेचे आजोजन केले जाते.   दुसरी कडे ठाणे शहरातील ‘रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष आहे.   मुंबईत डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान  अशी विचारांची देवाणघेवाण मोठ्या प्रमाणात होत असते.   खरं तर ठिकठिकाणी, खास करून प्रत्येक शाळा आणि कॉलेजात असे कार्यक्रम व्हायला पाहिजे.   परदेशात सुद्दा मला वाटतं जिथं मराठी माणसं आहेत तिथं असे कार्कक्रम होत असावेत?   फेसबुक, लिंक्डईन किंवा ऑरकूट या सोशल नेटवर्किंग साईट्सपेक्षा "व्याख्यानमाला"  ही एक जिवंत आणि मोठं सोशल नेटवर्किंगच जाळं आहे!  ते वाढलं पाहिजे.  

मला वाटतं की अशा व्याख्यानमाला आयोजकांनी त्यांच्या संस्थेची एक चांगली वेबसाईट करायला पाहिजे. प्रत्येक व्याख्यान युट्युब वर अपलोड केलीत तर जगभरातील लोकांना त्याचा आस्वाद घेता येईल. आज फेसबुक किंवा तत्सम सोशल वेब साईट्सच्या मदतीने जास्तित जास्त लोकांपर्यंत अशा कार्यक्रमांची माहिती नेता येईल. ज्येष्ठ नागरिकांबरोबर आजच्या तरूणांना आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरतील किंवा आवडतील असे विषय घेतले गेले पाहिजे. आजचे तरूण उद्याचे नागरीक आहेत, ते आज जास्त व्यवहार्य (practical) असतील पण त्यांना प्रेमान दिशा देण्याच काम मोठ्या प्रमाणात अशा व्याख्यानमालेतुन होऊ शकतं. नव्हे ते व्हायलाच पाहिजे.
काही वर्षांपुर्वी रविवारी सकाळी दहा वाजता मुंबई दुरदर्शन केंद्रावरून "प्रतिभा आणि प्रतिमा" हा एक उत्कृष्ट कार्यक्रम होत असे.    नामावंत मंडळींच्या मुलाखतीचा हा कार्यक्रम असे.   हा कार्यक्रम का बंद केला हे काही कळलं नाही.   आज महाराष्ट्रात १० ते १२ मराठी चॅनेल्स आहेत त्यांच्या प्राईम टाईम वरचे कार्यक्रम बघितले तर काय?  "घरं", "लग्न" आणि "नातीगोती"  या संक्लपना कशा उध्वस्त करता येतील या करीता दिवस रात्र मेहनत घेत आहेत.   द्वेष, वैर आणि तिरस्कारावरच  जणू आपणं जगत असतो असं अस त्या निर्मात्यांना वाटतं.   एकही अशा चॅनेल्सवर प्रतिभा आणि प्रतिमा सारखे कार्यक्रम  करावसे वाटतं नाही याचं दु:ख होतं.   गेल्या दशकात कित्येक मराठी प्रतिभावंत विविध क्षेत्रातुन जगा समोर  आले,  पण आज आपण काय बघतो तर - गाण्यांच्या भेंड्या, थिल्लर नाच  आणि  स्वंपाकाचे  धडे! या पलिकडे त्यांची क्रियेटिव्हीटी जातच नाही.   त्यांच्या कडे ना प्रतिभा ना प्रतिमा!   ’दुरदर्शन’ इतकं प्रभावशाली   माध्यम आज  आपण संपुर्णपणे वाया घालवतोय.   निदानं काही ठराविक व्याख्यानं, परिसंवाद तरी टिव्ही चॅनेल्सवरून  दाखवायला काय हरकत आहे.   जाऊदे आजचा टिव्ही कार्यक्रमावर लिहायला घेतलं तर "व्याख्यानमाला" हा सुंदर विषय हातुन जाईल.

व्याख्यमालेच्या निमित्ताने  विचारांची देवाणघेवाण होते, त्याहून जास्त महत्वाचं म्हणजे समाज एकत्र येतो,  त्यांच्यात संवाद साधला जातो ..... जी आज काळाची खरी गरज आहे.    दोन ते तीन लाख वस्ती असलेल्या प्रत्येक विभागात एक चांगली व्याख्यानमाला आयोजित व्हायला पाहिजे.  कारणं  विचारांचा गुणाकार हाच उद्याच्या यशाचा पासवर्ड असणार आहे......

1 comment:

Pranav said...

फार महत्वाचा मुद्दा मांडला. सुचविलेले उपाय छान आहेत, पण ह्या व्याख्यानमाला आयोजित करणारे बहुतेक जेष्ट नागरिक आहेत त्यामुळे त्यांना सोशल साईट बद्दल पुरेशी मिहिती नसेल. आपण तरुणांनी आयोजकांशी संवाद साधून त्यांना रेकॉर्डिंग/ उपलोड मधे मदत केल्यास हे शक्य आहे. १० साहित्य संमेलनाने होणार नाही इतकी साहित्य सेवा ह्या छोट्याश्या प्रयत्नाने होवू शकेल. आपल्या हातून ही सेवा घडो!!