Sunday, February 27, 2011

माझं Tweet.....मराठी मिल्यनेयर! जय हो!!

२७ फेब्रुवारी २०११:  मित्रांनो आज २७ फेब्रुवारी "मराठी दिन"!   सगळीकडे मराठी कार्यक्रमांची रेलचेल, भाषणांचा पाऊस,  आणि घोषणांचा पुर!  मात्र मराठी भाषा कोरडीच!  आजच्या दिवशी जास्त काही लिहीत नाही.   याच दिवशी २००९ साली लोकसत्तेसाठी लिहीलेला लेख आज पुन्हा देत आहे.  याच कारणं माझे माझ्या मराठी भाषे विषयी असलेलं मत अजुनही तेच आहे.   प्रगतीचा एक्सप्रेस वे! या माझ्या पुस्तकात सुद्दा हा लेख आहे.   शेवटी एवढचं म्हणेन....

कळेल ती भाषा, मिळेल ते काम
पडेल ते कष्ट, तेंव्हाच होईल....... जय महाराष्ट्र! 

सौजन्य लोकसत्ता: 

‘‘जी कळते ती खरी भाषा, अशी वृत्ती ठेवून वागले पाहिजे,’’ हे उद्गार आहेत प्रसिद्ध निसर्गकवी ना। धों। महानोर यांचे. २७ फेब्रुवारी रोजी ‘मराठी दिन’ या दिवशी ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’चा ‘जनस्थान पुरस्कार’ स्वीकारताना मराठी भाषेच्या आजच्या स्थितीबद्दल महानोर असं म्हणाले की, ‘‘मराठी भाषेत काही चुकीच्या कल्पना रुजल्या आहेत. शब्द कुठल्या भाषेतून आला, त्यापेक्षा तो सर्वसामान्याला कळतो की नाही, हा निकष महत्त्वाचा आहे.’’ ‘‘भाषाशुद्धीपेक्षा भाषावृद्धी महत्त्वाची आहे.’’ माझ्या मते इतकी सरळ आणि सगळ्यांना सहज समजेल अशा शब्दात मराठी भाषेची व्याख्या आजपर्यंत कोणीही केलेली नाही. महानोरांनी केलेल्या मराठी भाषेच्या अशा ‘प्रोग्रेसिव्ह व्याख्ये’मुळे नकळतपणे जगभरातील मराठी बांधवांना मनांनी एकत्र आणलं आहे! म्हणून त्यांचे अभिनंदन आणि त्रिवार धन्यवाद!

आजच्या इंटरनेट, ब्लॉग्स, ईमेल्स, मल्टिप्लेक्स, रिमिक्स, प्रायव्हेट टीव्ही चॅनेल्स व शेवटी इंग्लिश माध्यमांच्या आयबी स्कूल्सच्या युगामध्ये शुद्ध मराठी भाषेचा जीव घुसमटून जातोय की काय, अशी भीती आपल्या सर्वाना लागून राहिलेली आहे। परिस्थिती नक्कीच गंभीर आहे! पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की आजच्या इंटरनेटच्या युगामध्ये लोक ब्लॉग्सच्याच भाषेत बोलणार आणि लिहिणार, वाहतं पाणी आहे! निदान एका गोष्टीचे समाधान मानू या की आज जगभरातून कितीतरी मराठी तरुण-तरुणी आपले विचार मराठीत या अशा ब्लॉग्सद्वारे जगासमोर मांडताना दिसत आहेत, एकमेकांशी संवाद साधायचा प्रयत्न करत आहेत, हेही नसे थोडके! अगदी अलीकडेपर्यंत कॉम्प्युटरवर मराठी हे इंग्लिश भाषेसारखे रोमन लिपीतून लिहावे लागायचे. आज सॉफ्टवेअरच्या साहाय्याने कॉम्प्युटरवर देवनागरीत मराठी लिहिता येणे शक्य झाले व आता युनिकोडमुळे हे आणखी सोपे झाले आहे. जशी माध्यमे बदलणार, तशी भाषा थोडीफार बदलणारच. मराठी भाषेची नुसती काळजी करून किंवा नवीन माध्यमांना व पिढीला व पालकांना दोष देऊन हा प्रश्न सुटण्यासारखा नाही. यासाठी आपल्याला ‘आऊट ऑफ द बॉक्स’ विचार करावाच लागेल, मोकळ्या मनाने नवीन पिढीचे मूलभूत प्रश्न समजून घ्यावे लागतील, त्यांच्या विचारांचा आदर ठेवून, प्रेमाने जवळ करावे लागेल।

Thursday, February 17, 2011

प्रगतीचा एक्स्प्रेस वे म्हणजे मराठी युवकांना रिचार्ज करणारे पुस्तक - डॉ. नरेंद्र जाधव

लोकसत्ता मुंबई वृतान्त: दिनांक १६ फेब्रुवारी २०११ - मराठी उद्योजकांनी विशेषत तरुणांनी पारंपरिक मानसिकतेतून बाहेर पडून आपली आíथक प्रगती केली पाहिजे. जुन्या मानसिकतेचा पगडा अजूनही अनेक मराठी लोकांवर आहे. ही कोती मनोवृत्ती बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पण त्याला हवा तेवढा वेग नाही. अशावेळी कॉर्पोरेट लॉयर नितीन पोतदार यांनी लिहिलेले प्रगतीचा एक्स्प्रेस वे हे पुस्तक म्हणजे तरुण मराठी उद्योजकांना अगदी योग्य वेळी रिचार्ज करणारे पुस्तक आहे, असे प्रतिपादन नियोजन मंडळाचे सदस्य व अर्थतज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांनी केले. जीवनरंग प्रकाशनने तयार केलेल्या प्रगतीचा एक्स्प्रेस वे या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. जाधव, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक, लोकसत्ताचे संपादक कुमार केतकर आणि लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोचे सीएफओ वाय.एम. देवस्थळी यांच्या हस्ते ताजमहाल हॉटेलमध्ये काल झाले. यावेळी समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी डॉ. जाधव म्हणाले की गरिबीचे उदात्तीकरण मराठीत सर्वाधिक आहे. आपल्या काही म्हणीही गरिबीचेच समर्थन करतात. गरिबांनी गरीब राहावे म्हणून श्रीमंतांनी पसरवलेली ही अफवा आहे. खरे तर दारिद्ऱ्यापेक्षा भयंकर गोष्ट म्हणजे मनोदारिद्रय़. ते अगोदर दूर व्हायला हवे. म्हणून बदलत्या मराठी मानसिकतेची चर्चा करणे अतिशय महत्त्वाची बाब आहे. मधु मंगेश कर्णिक यांनी आपल्या मनोगतात सांगितले की उद्योगात दूरदृष्टी आणि वेगळे काही करण्याची प्रेरणा आवश्यक असते. उद्योजकात ऊर्जा आणि नवनिर्मितीची ऊर्मी असावे लागते. त्यात त्याच्या प्रज्ञा आणि प्रतिभेचा कस लागत असतो. महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळात महाव्यवस्थापक म्हणून काम करताना मला उद्योगक्षेत्रात जे अनुभव आले होते, त्याचा पुनप्रत्यय मला नितीन पोतदारांचे हे पुस्तक वाचताना आला.

Wednesday, February 16, 2011

'प्रगतीचा एक्सप्रेस वे' - महाराष्ट्र टाईम्स

मुबंई दिनांक १५ फेब्रुवारी २०११:  नितीन पोतदार यांच्या ' प्रगतीचा एक्सप्रेस वे'चे दिमाखदार प्रकाशन!

मराठी उद्योजकांना, त्याच बरोबर मराठी तरूणांना प्रगतीचा मार्ग दाखवणाऱ्या कापोर्रेट लॉयर नितीन पोतदार यांच्या प्रगतीचा एक्सप्रेस वे या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक व साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मधु मंगेश कणिर्क व नियोजन मंडळाचे सदस्य डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते झाले. प्रमुख वक्ते कुमार केतकर व लार्सन अॅण्ड टुब्रोचे सीएफओ वाय.एम.देवस्थळी होते. सुधीर गाडगीळ यांनी त्यांच्या खुमासदार शैलीत सूत्रसंचालन केले.

याबाबत बोलताना डॉ. जाधव म्हणाले, पोतदारांच्या पुस्तकाचे ब्रीद 'कळेल ती भाषा, मिळेल ते काम, पडेल ते कष्ट... तंेव्हाच होईल जय महाराष्ट्र' हे आहे! आज मराठी पाऊल अडतं कुठे ही चर्चा बंद करून, पुढे पडणाऱ्या प्रत्येक पावलांचं तांेडभरून कौतुक करण्याचं आवाहन त्यांनी पुस्तकातून केलं आहे.' भांडवल उभारणी, बिझनेस नेटवकिर्ंग, ह्युमन रिसोर्स, डेलिगेशन, उद्योगांचे वारसदार, अशा अनेक विषयांवर पुस्तकात विश्लेषण केलं आहे.

Expressway to progress - Times of India 14.02.11

Mumbai: February 12, 2011.  It was an evening to remember as Padmashree Madhu Mangesh Karnik (veteran Marathi writer) and Dr Narendra Jadhav,Member Planning Commission,launched corporate lawyer Nitin Potdars book on entrepreneurship titled Pragaticha Express Way.  Loksatta Editor Kumar Ketkar and YM Deosthalee,Group CFO,Larsen Toubro,was among the key speakers at this event. Speaking at the occasion Dr Jadhav commented upon the industrial growth in Maharashtra. He praised Potdar for his commendable job despite his busy schedule. The

book highlights the need of local entrepreneurship for an overall growth and progress.It offers simple and effective solutions to handle issues including finance,human resources,delegation,business networking,succession and the local problems faced by any businessmen during the growth phase.Potdar said that that without any management degrees Indian businessmen today have proved successful even during the global recession because of their success mantra MNC which is multitasking,networking and commitment.

The event was attended by DM Sukthankar,Ashok Pradhan,Deepak Deshpande,Nandakishor Desai,Subash Dandekar Padmaja Phenani Joglekar,Gautam Rajyadhyaksha,Sudhir Patil and Sachin Jakatdar.From the financial sector Sunil Rohokale,Anay Khare,Upendra Kulkarni,Nikhil Naik,Nitin Vaidya,Uday Nirgudkar and Sanjiv Latkar.

Courtesy: Times of India
http://lite.epaper.timesofindia.com/getpage.aspx?pageid=29&pagesize=&edid=&edlabel=TOIM&mydateHid=14-02-2011&pubname=&edname=&publabel=TOI