Wednesday, February 16, 2011

'प्रगतीचा एक्सप्रेस वे' - महाराष्ट्र टाईम्स

मुबंई दिनांक १५ फेब्रुवारी २०११:  नितीन पोतदार यांच्या ' प्रगतीचा एक्सप्रेस वे'चे दिमाखदार प्रकाशन!

मराठी उद्योजकांना, त्याच बरोबर मराठी तरूणांना प्रगतीचा मार्ग दाखवणाऱ्या कापोर्रेट लॉयर नितीन पोतदार यांच्या प्रगतीचा एक्सप्रेस वे या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक व साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मधु मंगेश कणिर्क व नियोजन मंडळाचे सदस्य डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते झाले. प्रमुख वक्ते कुमार केतकर व लार्सन अॅण्ड टुब्रोचे सीएफओ वाय.एम.देवस्थळी होते. सुधीर गाडगीळ यांनी त्यांच्या खुमासदार शैलीत सूत्रसंचालन केले.

याबाबत बोलताना डॉ. जाधव म्हणाले, पोतदारांच्या पुस्तकाचे ब्रीद 'कळेल ती भाषा, मिळेल ते काम, पडेल ते कष्ट... तंेव्हाच होईल जय महाराष्ट्र' हे आहे! आज मराठी पाऊल अडतं कुठे ही चर्चा बंद करून, पुढे पडणाऱ्या प्रत्येक पावलांचं तांेडभरून कौतुक करण्याचं आवाहन त्यांनी पुस्तकातून केलं आहे.' भांडवल उभारणी, बिझनेस नेटवकिर्ंग, ह्युमन रिसोर्स, डेलिगेशन, उद्योगांचे वारसदार, अशा अनेक विषयांवर पुस्तकात विश्लेषण केलं आहे.
याबाबत बोलताना पोतदार म्हणाले, 'मी गेली २३ वर्षं जगभरातील कंपन्यांच्या मालकांसोबत जवळून काम केलं. तेव्हा व्यक्ती उद्योजक असते किंवा नसते. उद्योजकतेचा आणि व्यक्तीच्या भाषेचा, जातीचा काही संबंध नसतो. येणारं शतक हे नॉलेज बेस्ड सव्हिर्स सेक्टरचं असेल. व त्यात आपले मराठी तरुण मोठी कामगिरी करतील, असा माझा विश्वास आहे. म्हणून त्यांना प्रोत्साहन द्यायची गरज आहे.'

या सभारंभास गौतम राजाध्यक्ष, संजीव लाटकर, गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर, नितीन वैद्य, नंदकुमार देसाई, डायरेक्टर एचडीएफसी फिग, विपी टाटा रिटेल इन्टरनॅशनलचे दिपक देशपांडे, द.म.सुखटणकर, माजी मुख्य सचिव, महाराष्ट्र, अशोक प्रधान, मनोहर भिडे, जस्टिस अरविंद सावंत, भीमराव नाईक (निवृत्त), अरुणभाई कायगांवकर, उदय निर्गुडकर, सुधीर पाटील, सचिन जकातदार आदी मान्यवर उपस्थित होते.   हा दिमाखदार कार्यक्रम हॉटेल ताज पॅलेसमध्ये पार पडला.

टीप:  मित्रांनो गेली ४ आठवडे मी माझ्या पुस्तकाच्या प्रकाशनात खुपच व्यस्त होतो.  अजुनही पोस्ट प्रोडक्शन बरीच कामे आहेत, म्हणुन माझे ब्लॉग लिहू शकलेलो नाही.  खरं तर मला पुस्तका विषयी बरचं काही तुमच्याशी शेअर करायच आहे.  थोडा वेळ मिळताच लिहीन.  तो पर्यंत निदान वृतपत्रातील मजकुर तुमच्या साठी देत आहे.  नेट वरून पुस्तक  http://http://www.bookganga.com/  वर उपलब्द आहे, त्याची थेट लिंक खाली दिलेली आहे.

http://www.bookganga.com/eBooks/Books?BookSearchTags=nitin+potdar&BookType=1

सौजन्य: महाराष्ट्र टाईम्स -
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7495131.cms