Thursday, March 10, 2011

माझं Tweet.....जपान कडवट क्वालिटीचा देश.

१० मार्च २०११:   गेली चार दिवस काही कामा निमित्ताने मी टोकियो, जपान मधे आहे.  पहिल्या दिवशी एअरपोर्ट ते हॉटेल, आणि मग हॉटेल ते ऑफिस आणि ऑफिस ते हॉटेल असा आमचा ठरलेला कार्यक्रम झाला.   अगदी सांगण्यासारखं काहीच बघितलं नाही की काही अनुभवलं सुद्दा नाही.  

तरी जपानच्या नारीटा एअरपोर्टला उतरल्या पासुन माझी नजर सारखं काही तरी शोधत होती;  काय ते मलाच कळलं नाही.  दुमजली रस्त्यावरून आणि ब्रिजेसच्या सुंदर जाळ्यावरुन धावणाऱ्या मोठ्या बसेस, टोयोटा, निसान, होन्डा, सुझुकी यांच्या कार्स, सोनी, पॅनॅसोनिक, निकॉन, कोडॅक अशा मोठ्या ब्रॅण्डसचे बॅनर्स, काचेच्या चकचकीत उंच इमारती, इमारतींवर जपानी भाषेत लिहीलेल्या पाट्या  (जपानी भाषेला कांजी म्हणतात), बारिक डोळ्यांची माणसं,  हॉटेल्स, सगळं बघितलं तरी मनात जपान विषयी असलेली एक वेगळी इमेज काही केल्या सापडतं नव्हती.  युरोप सारखी स्वछता आहे!   हवा थंड सुद्दा आहे.  मग मी काय शोधत होतो?  खुप विचार केल्यावर माझं मलाच उमगलं की आपल्याला जपान म्हटंल पिन ते पियानो - प्रत्येक गोष्ट कशी परफेक्टच (perfect) असणार, उच्च दर्जाचीच असणार (high quality),  लेटेस्ट टेकनॉलॉजी असणार, कुठेही चलता है  ही मानसिक्ता (attitude) नसणार, मला वाटतं मी हा जपानी दर्जेचा "कडवटपणा" कुठेतरी हे शोधत होतो.   मित्रांनो माझा भ्रमनिरास मूळीच झाला नाही कारण इथल्या प्रत्येक गोष्टीत दर्जेचा कडवटपणा आहेच आणि तो आपल्याला प्रत्येक ठिकाणी दिसतो - पण मग काय?  तर मी त्या कडवटपणाची साक्ष शोधत होतो अस मला वाटतं!  
मनात हा प्रश्न घेउन मी तिसऱ्या दिवशी आमच्या चर्चेसाठी बसलो असता, आमच्या चर्चेच्या शेवटच्या टप्यात मला माझ्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं; मी ज्या जपानी कंपनी बरोबर काम करायला इथं आलो आहे,  त्यांची प्रोडक्ट्स इतकी चांगली आहे की त्यांच्याच बिझिनेस हेडने मला सांगितलं की इतके चांगले प्रोड्क्टस मार्केट मधे विकायचे कसे हा आमच्या समोर प्रश्न आहे?  त्याची किंमत कोण देणार?  अगदी जपानी मार्केट मधे सुद्दा हे अगदी कासवाच्या गतीने विकल्या जातात, तर भारत जो खुपच कॉस्ट कॉन्शियस (cost concious) आहे तिथं हे आमचे प्रोडक्टस आम्ही कसे विकणार?  हे प्रोडक्टस आता आम्ही थोडसे डाउन ग्रेड सुद्दा करु शकतं नाही?  कारणं आमच्या कंपनीचा इतिहास आहे की आम्ही आमचे प्रोडक्ट्स फक्त इंम्प्रुच (improve) केले!   ते डाउन ग्रेड करायचा विचार सुद्दा कधी आमच्या मनाला शिवला नाही.  तसा प्रश्नच उदभवत नाही.   बरं कंपनीचा कार्यभार इतका पारदर्शक आहे की जर आम्ही आमचे प्रोडक्टस डाउन ग्रेड केले तर ते सुद्दा आम्हाला लोकांना कळवाव लागेल!    तो  हे सांगत  असताना ह्ळु हळू त्या मिटिंगरुम  मधे एक भयाण शांतता पसरू लागली.  सगळे शांत  झाले.  काहींचे चेहरे लाल व्हायला लागले, आणि मधेच त्यांच्याल्या एकाने हा विषय तोडत  थोडस  चीडुन  सांगितलं की प्रोडक्टस विकता येत नसेल तर कंपनी बंद करु पण प्रोडक्टस डाउन ग्रेड करायचा विचार सुद्दा तुम्ही कसा काय करू शकता?  We are wasting our time!  इतकचं म्हणतं तो त्या कॉनफरन्स रुमच्या बाहेर निघुन गेला.  सगळे गप्प.   कहीही न बोलता आम्ही कॉफी घ्यायला निघुन गेलो.  विषय संपला!    मित्रांनो ह्या गोष्टी sensitive असल्यामुळे मी तुम्हाला त्या कंपनीच किंवा त्यांच्या प्रोडक्ट्सच नाव सांगु शकतं नाही - कृपया क्षमा करा.   ती पंधरा मिनिटांची चर्चा मला चांगलीच लक्षात राहीली.  "We are wasting our time" हे शब्द  पुन्हा पुन्हा माझ्या कानात घुमत होते.  हाच तो कडवटपणा आणि हिच त्याची साक्ष मला बघायची होती.  आणि मग एका क्षणात कळलं जपान जगात इतका पुढे कसा आहे!  हॅट्स ऑफ टु देम.

टिप १:   खाण्याच्या बाबतीत मी एकदम भारतीय आहे.  मला दोन दिवस जर आपलं अन्न मिळालं नाही तर मी कोलमडुन पडतो.   तरी आग्रहाखातर काल रात्री जेवायला अगदी खास जपानी रेस्टॉरन्ट मधे मला माझ्या मित्रांनी नेलं.   तिथं प्रत्येक शेफ एक स्पेशल रुम मधे त्याच्या भोवती आपल्याला बसवतो आणि मग तो आपल्या समोर ते टेम्पुरा तळुन देतो.   खुपच छान पद्दत आहे.  हे करत असताना त्याच्या चेहऱ्यावरची एक रेष सुद्दा बदलत नाही.  अगदी मख्खं चेहऱ्याने तो ते टेम्पुरा तळतो आणि आपल्या ताटात वाढतो.  जपानी टेम्पुरा म्हणजे अंड्याच्या बल्कामधे तळलेले मोठे प्रॉन्झ, श्रीम्पस, इतर मासे, बटाटा, पालक इत्यादी!  खुपच छान असतात.  त्याला मसाला नसतो, फक्त मीठ लावून खायचे.   टोकियोत मी अजुन एक दिवस आहे, बघुया उद्या रात्री परत एकदा टेम्पुरा खायला जायचा विचार आहे. 

टीप २:   जपानी भाषा ही तिन भाषांच्या अक्षरांवरुन लिहीली जाते, (अ) चाईनीज अक्षरं म्हणजे कांजी  (kanji) (漢字), आणि दोन सिलॅबिक अक्षरं हिरागना (hiragana) (ひらがな or 平仮名) आणि कटाकाना (Katakana) (カタカナ or 片仮名).   जपानी अक्षरं दिसायला खुपच सुंदर दिसतात.   आता हेच बघा  या लेखाच शिर्षक :जपान क्वालिटी कॉनशियस देश" हे 日本の品質意識の国 असेल, आणि  my नीती - 私の肉盛 व  नितीन पोतदार हे जपानी मधे ニティン.

7 comments:

Anonymous said...

They do not say moden pan vaaknaar naahee,but practically they are ready for it,and that's the reason they never break.
they break others.

Nitin Potdar, Corporate Lawyer, Mumbai. said...

Your comments are interesting, then why Anonymous?

अमित चिविलकर said...

लेख सुंदर झालाय सर... जपान इतकासा देश म्हणायची कुणाची हिंमत का नाही ते कळाले...

NAINASACHIN said...

I am imparting my knowledge about productivity & quality management to BMS Students. so many times I am giving a example of Japan Quality,but that was bookish after reading ur tweet I am so impressed on Japanese people.

Anonymous said...

भारतियांमध्ये कशी आणायची जपानची मानसिक़ता, न वाकायची ! आपण क़ायम संधिसाधू ...........ही सार्वत्रिक मानसिकता :)

नरेंद्र प्रभू (Narendra Prabhu) said...

जपानचं हे क्वॉलिटी प्रेम वाखाणण्याजोगं आहे पण आता आलेल्या सुनामीमुळे वाताहात झालेला हा देश पुन्हा कसा उभा राहतो ते पहाण्यासारखं असेल. लावकर परत या.

sharayu said...

जपानी कंपनीचा दर्जाचा आग्रह समजू शकतो. पण माझ्या आवश्यकतेपेक्षा उत्पादनाचा दर्जा जास्त असण्याने माझ्यापुढे अडचणी उभ्या राहू शकतात याचे भान त्यानी राखावयास पाहिजे.