Friday, March 18, 2011

माझं Tweet.....टोकियोतील ते चार तास...

१८ मार्च, २०११:  दिवस - शुक्रवार, तारीख - १२ मार्च २०११, वेळ - दुपारी २.४५ -    "So you come from Mumbai - the Film making city of India - I understand it is called as bollywood!"  अस उशिजिमा सान यांनी मला विचारलं.   उशिजिमा सान हे टोकियोतील मेसर्स उशिजिमा असोशियेट्स या टोकियोतील कायदेशीर सल्ला देणाऱ्या एका मोठ्या लॉ फर्मचे संस्थापक.  जपानी कंपन्यांना  भारतामधे गुंतवणुक आणि उत्पादन करण्यासाठी लागणाऱ्या कायदेशीर बाबींवर आम्ही चर्चा करीत होतो.  आपल्याकडे जस आपण "श्री" किंवा "मिस्टर" म्हणतो तसं जपान मधे वयाने मोठ्या व्यक्तिंशी बोलताना त्यांच्या नावा नंतर "सान" हे लावायची पद्दत आहे.

More than Bollywood, Mumbai is the financial capital of India and as such is extremely important City मी त्यांना सांगितल.   Compared to Chinese products, we respect Japanese brands.  We have all leading & top brands from Japan like Suzuki, Toyota, Honda, Sony, Panasonic, Hitachi, Nikon, Nissan, Yahama, Nintendo!   All are doing extremely well in India.  या माझ्या वाक्यावर त्यांच्या डोळे चमकले.   आमचं बोलणं छान चाललं होतं.  इतक्यात  आमची बिल्डिंग चांगलीच हलली, मी म्हटंल Is there an earthquake?  "It seems yes" - Ushijima San.   This must be normal?  मी म्हटंल.  No this does not seem to be normal, but dont worry nothing will go wrong this is the best building constructed in Tokyo"  उशिजिमांनी मला धीर देत म्हटंल.  "I am not worried.  So long as you are with me" मी हसत हसत त्यांच्याशी बोलत होतो.  भुकंपाची तीव्रता वाढत गेली, आम्ही दोघेही बाराव्या माळ्याच्या खिडकीतुन खाली बघु लागलो, लोक पळत होती.  ब्लॅबेरी वर ते तीस सेकंद मी रेकॉर्ड केले त्याची क्लिप दिलेली आहे. मधेच अनाऊन्समेंट झाली की हा मोठा भुकंपाचा धक्का आहे, लोकांनी खाली बसुन घ्याव आणि शक्य असल्यास मोकळ्या जागेत जावं.   बिल्डिंगची लिफ्ट बंद केली गेली.  टेलिफोन (मोबाईल आणि लॅण्ड लाईन) दोन्ही बंद झाल्या.  टिव्ही वरून बातमी थडकली की भुकंपाची तीव्रर्ता ८.९ इतकी आहे!  त्यातच सुनामीची मोठी लाट!!   ८.९ हा आकडा आणि सुनामीच्या लाटा टिव्ही वर बघितल्याबरोबर उशिजिमा सान थोडे घाबरले!  तरी मला धीर देत म्हणाले काळजी करू नका, आम्ही तुम्हाला सुखरुप तुमच्या हॉटेल पर्यंत नेऊन सोडु.  सेक्रेटरीला मला कॉफी द्यायला सांगत ते म्हणाले की कुठेही जाऊ नका.  मी बघतो काय करायचं ते.  दोन तास उलटुन गेले!  टिव्हीवरची दृश्य प्रत्येक सेकंदाला भयानक होत होती.  माझ्या बॅल्कबेरी मेसेन्जरवरुन मी घरी निरोप पाठवला की मी सुखरुप आहे काळजी करू नये, फोन बंद असल्यामुळे बोलु शकत नाही.   दुपारचे साधारणं पाच वाजले मी उशिजिमा सान यांचा निरोप घेतला आणि १२ माळे पायी उतरलो.  आणि बघतो तर काय, सगळे रस्ते जाम, ट्युब ट्रेन बंद, एकही टॅक्सी उपलब्द नाही, बस नाही, आणि हजारो जपानी नागरिक फुटपाथवरून शांतपणे घरी जाण्यासाठी निघालेले. 
टॅक्सीसाठी जवळपास अर्धातास घालवल्यावर माझ्या हॉटेलचा रस्ता धरला.  मधेच इनफोसिसची मुलं दिसली भारतीय वाटली म्हणुन त्यांना थांबवुन त्यांच्याशी बोललो - ती म्हणाली तुम्हाला टॅक्सी मिळेल असं वाटत नाही.  चालत रहा.   माझ्या खिश्यात Hotel Grand Palaceच कार्ड होतं, कार्डच्या मागे हॉटेलचा लोकेशन छोटासा नकाशा होता, त्यावरून नेमकं कुठल्या रस्ता धरायचा समजत नव्हतं.  शिवाय अंधार होत चालला होता.   अशा वेळेस पोलीसाला विचारलेलं बरं म्हणुन एका कॉफीशॉप समोर उभा असलेल्या पोलीसाला थांबुन माझ्या हॉटेलचा पत्ता विचारला.  त्याने खिश्यातला टोकियोचा नकाशा काढाला आणि मला समजावुन सांगायचा निष्फळ प्रयत्न केला.  आणि त्याने सांगितलेल सगळं समजलं अस दाखवून पुढे गेलो.
दर दहा मिनिटांनी समोर चार रस्ते दिसायचे, मग कुणाला तरी विचारुन पुढे जात होतो.  त्यात जपानी शिस्त इतकी की कुणीही फूटपाथ सोडत नव्हता.  तुडूंब गर्दी.  दादर, व्हिटी किंवा चर्चगेट स्टेशन वरून बाहेर पडताना जस आपण गर्दीतुन वाट काढत काढत चालतो तसा काहीसा प्रकार होता.  त्यात गार वार, हातात लॅपटॉपची बॅग आणि अंगावर सुट असला तरी थंडी वाजत होती.   कसा तरी एक तास चाललो.  हॉटेल काही माझ्या टप्यात दिसत नव्हतं.  थांबुन पुन्हा एका जपानी माणसाला विचारलं.   त्याने विचार करुन मला सांगितल की माझं हॉटेल टोकियो ट्युब स्टेशन पासुन ३० मिनिटांवर आहे आणि टोकियो स्टेशन साधारण २० मिनिटे; म्हणजे अजुन एक तास चालायच आहे.  त्यात त्याने प्रेमाने मला त्याच्या बरोबर चालायला सांगितल कारण तो टोकियो स्टेशनला जाणार होता.  त्याच्या बरोबर चालत गेलो, २० मिनिटांनी टोकियो स्टेशन आलं, थॅक्यु म्हणतं मी त्याचा निरोप घेतला.  तो ही जवळ जवळ दीड तास चालत आला होता.  फुटपाथवर एका बेन्च वर बसलो.  पाय तर खुपच दुखत होते.  गर्दी, अंधार आणि थंडी तिन्ही गोष्टी वाढतच होत्या.   पण चालणाऱ्या प्रत्येक जपानी माणसाचा शांतपणा आणि जिद्द बघुन मनात म्हटंल आपण इतक्या लवकर कस give up करतो.   नुसतं दोन तास चालायला जर आपण इतक घाबरलो, तर कस चालेल.  इतक्या मोठ्या भुकंप आणि सुनामीनंतर सुद्दा जर हजारो जपानी लोक शांतपणे टॅक्सी, ट्रेन अणि बस शिवाय गेली दोन तास चालत आहेत तर आपण का नाही चालू शकतं.   आयुष्यात असे प्रसंग आल्यावर आपण खरं तर निर्धाराने त्याला सामोरे गेल पाहिजे.   इतका विचार आला आणि ताडकन उठुन परत चालता झालो.   दर पाच ते दहा मिनिटांनी विचारव लागायच कारण प्रत्येक वळणावर तीन ते चार रस्ते फुटत होते, एका जरी चुकीच्या रसत्यावर गेलो तर पंचाईत. 
साधारणपणे अडीच तासानंतर हॉटेल गाठलं.   हॉटेलची लॉबी माणसांनी तुडूंब भरलेली.   कारण हॉटेलच्या मॅनेजमेन्टने थकलेल्या लोकांसाठी मोफत चहा कॉफी आणि लांब जाणाऱ्या लोकांसाठी आराम करण्याची व्यवस्था केलेली होती.   पायाचे तुकडे पडलेले होते, त्यातच हॉटेलच्या रिसेप्शन मधे कळलं की लिफ्ट बंद आहे आणि अजुन एक तासतरी सुरु होणारं नाही.  मी तिथेच बसलो.  कारण माझ्या पायात साधं उभं रहाण्याच सुद्दा त्राण उरलं नव्हतं.   एक तासाने सर्व्हिस लिफ्ट सुरु झाली आणि मी माझ्या १२व्या माळ्यावरच्या रुम मधे गेलो.  तो पर्यंत फोन सुरु झाले होते.  घरी फोन केला आणि दोन शब्द बोलल्यावर मन हलकं झालं. 
सुदैवाने रुममधे इन्टर्नेट सुरु होता, लगेच सगळ्यांना इमेल वरून सुखरुप असल्याच कळवलं.   CNNवर अशा संकटसमयी नागरिकांनी काय कराव याची माहीती दिली जात होती.  त्यात त्यांनी सांगितलं की फेसबुक, ट्विटर किंवा इतर कुठल्याही माध्यामातून तुम्ही कुठे आणि कसे आहात ते कळवायला विसरू नका.  लगेच मी युट्युब वरून मी सुखरुप असल्याची क्लिप अपलोड केली वर या ब्लॉगवरुन आणि माझ्या फेसबुक वरु टाकली.  मी दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी मुंबईला परत येणार होतो.  टोकियोपासुन जपानच नारीटा एअर पोर्ट दोन तासांवर आहे.  हॉटेलच्या रिसेप्शनवर कळलं की उद्या कुठलीही बस किंवा टॅक्सी एअरपोर्टवर जाणार नाही.    सीएनएन वरुन सुनामीच्या बातम्या बघितल्या, त्यात फुकुशिमाच्या न्युक्लियर प्लांटला सगळ्यात जास्त धोका आहे अस ते सारखे सांगत होते.  आणि तस झाल तर काय होईल याची कल्पनाच केलेली बरी अस ते सारखं सांगत होते.  मी लगेच मुंबईच्या माझ्या टिकीट एजंटला फोन करून शनिवारची एअर तिकीटं रद्द केली, पण त्याला कुठल्याही परिस्तितीत रविवारची तिकीट काढं अस सांगायला विसरलो नाही.   कशी बशी शुक्रवारची रात्र काढली - भुकंपाचे धक्के बसतंच होते.   दुसऱ्या दिवशी माझ्या एजंटचा इमेल आला की रविवारची जापान-बॅंग-कॉक कन्फर्मड टिकीट काढलंय, फक्त बँग-कॉक मुंबई वेटिंग आहे.  म्हटंल चालेल.
शनिवार तसा शांत उजाडला.  टोकियोतील रसत्यावरची वरदळ शांत झालेली होती.   जवळच असलेल्या जपानी मेघजी श्राईन या सगळ्यात जुन्या देवळाला भेट दिली.  त्यांच्या देवाचे आभार मानले.
रविवार सकाळी ६.१० वाजता टोकियो ते नारीटा एअरपोर्ट सोबो-लाईन ह्या रेल्वेने प्रवास करायचा होता म्हणुन पहाटे ५.१५च्या सुमारास टोकियो स्टेशनवर टॅक्सीने आलो.  रविवार असल्याने सगळीकडे शुकशुकाट.  टोकियोच्या नॉर्थ-एक्झिटला टिकीट काऊन्टर आहे अस मला हॉटेलच्या माणसाने सांगितलं होतं.  इथं तर कुणीच नाही नॉर्थ कुठलं आणि साऊथ कुठलं कुणाला विचाराव काहीच समजेना.  प्रत्येक पाऊलावर परिक्षा!   एक १४ ते १५ वर्षाची शाळकरी मुलगी दिसली, तिला थांबवुन मी विचारलं Could you please show me where is North Exit?  I want to take Sobo-line for Narita Airport.   Go one level below walk straight, on the right hand side you will see ticket counter तीने मला सांगितल.   खाली गेलो मी एकटाच चालत होतो.  तीन ते चार मिनिटांनी टिकीट काऊंटर दिसलं.   साईन बोर्डवर Sobo-Line to Narita Airport Train at 6.10 am हे वाचलं आणी जीव भांड्यात पडला.  साधारणं दहा मिनिटांनी तीच मुलगी धावत आली.  Did you get the Ticket Counter?  तिने मला विचारलं.  Yes.  Why did you come back मी विचारलं.  I was little worried for you!  तिनं काळजीच्या स्वरात सांगितलं.  Even I dont know much about Tokyo, I stay at Osaka.  मग मला स्टेशनवरील एका ऑफिसात नेऊन स्टेशन मास्तरशी ओळखं करुन दिली.  तिने त्याला सांगितल की मला मुंबईला जायचं आहे,  त्यांना काही मदद लागली तर ती त्याने करावी अशी विनंती करुन, मला बाय करुन ती परत धावत निघुन गेली.  मला काहीच सुचेना.    I was simply touched! 
मित्रांनो शुक्रवारी अडीचतासाचा पायी प्रवासात कुठल्याप्रकारे न त्रासता मला वाट दाखवणारे जपानी नागरिक असो की रविवारी सकाळी टोकियो रेल्वे स्टेशनवर भेटलेली ती चिमुरडी मुलगी असो, त्यांच्यातल्या संयमाला आणि मुख्य म्हणजे माणुसकीला मना पासुन सलाम!    दुसऱ्या महायुद्धात हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब पडल्यानंतर सुद्दा जपानने इतकी प्रगती कशी केली याच गुपीत मला उमगलं.   ज्या देशाचे नागरिक इतके शांत, संयमी आणि प्रेमळ असतील त्या राष्ट्राला  भुकंपाचे कितीही धक्के बसले  आणि सुनामीच्या कितीही उंच लाटा थडकल्या तरी काही बिघडणार नाही.  ते राष्ट्र जगाच्या नकाशावर पुन्हा एकदा ताठ मानेने उभं राहणारचं!   Long live Japan!! 

7 comments:

नरेंद्र प्रभू (Narendra Prabhu) said...

खुप छान लिहीलय पोष्ट, त्या दिवशी खरंच कठीण परिक्षेचा काळ होता. दुरचित्रवाणीवर जी दृष्य दाखवण्याते येत होती ती पाहून सारखी आपली चिंता वाटत होती. अशा परिस्थितीत अनोळखी देशात, माहित नसलेल्या वाटेने निवासस्थान गाठणं म्हणजे दिव्यच आहे, ते तुम्ही पार पाडलं. जपानी लोकांच्या सहनशीलतेला आणि सय्यमाला सलाम.

Varhadvasi said...

tumhi sukharup baher padalat he vachun changale watale. Japani lokanchya sayyamala naman! tyanchi hyatun chagalya prakare sutaka hovo, hi devacharani prarthana... akolkar

Ashwini said...

I am really touched for this post....simply gr8...pan hak nak bali gele...ani tyatch radiations cha dhoka...lihun parmeshwarane kay mahit...bas ekch prarthana...sambhal deva..

Anonymous said...

खूप मह्त्वाचा अनुभव साध्या शब्दात व्यक्त केलात त्यासाठी शत:श धन्यवाद ! प्रेमाचा अनुभव माण्साला संप्रुप्त करत्तो .............. हे प्रेम पुढे वाटण्यासाठी आहे!

Anonymous said...

11 R.S.,haa bhukampachaa sglyat teevra va pralaykaaree dhakkaa,Jaitapur parmaanu vidyut gruh jar banlech tar tyaachaa arakhadaa 15 R.S. sosel evdhaa dankat asaawaa,nisargaapudhe shewtee kaaheech chaalat naahee,
Oogawtyaa sooryaachyaa deshaateel,nisarg kopaas bali padlele naagreek,aanee aankhee nuksaan hou naye mhanun swtaahache praan RASHTRAACHE samzun aaplaa deh thewnaaryaa aanee ajun ladhaai karat aslelya sarv Parmaanoo San Samurai naa koti koti vela salaamee shastr,
te harakiri karat naaheet,tar jiwant raahun lokanaa kiwant thewnyaachaa aplaa anteem sangharsh,Lord Nelson Yuddh pataakaa "Z" chdhwoon karat aahet,Japanchi hee anteem ladhaai aso aanee saamuraai vijayee houn parat yaawet,hyaa saathee aaj sankashtee Angarakhi chaturthee chyaa diwshi Asht vinaayak,aanee Shri Dajanan maharajan charnee praarthanaa.
GAN GAN GAN GANAAT BOTE.

Nitin Potdar, Corporate Lawyer, Mumbai. said...

धन्यवाद. मराठीत लिहता आलं तर बरं होईल. किंवा सरळ इंग्रजीत तुमचे मत लिहा.

Anonymous said...

Oky Nitin,
point well accepted,
English will be my option in the future.