Monday, March 21, 2011

माझं Tweet.....रस्त्यावर उतरुन ‘एमबीए’ अविनाश बनला नारळ पाणीवाला!

२१ मार्च २०११:  मित्रांनो काल रंगपंचमी.   रसत्या रसत्यावर जेंव्हा तरूण तरूणी पाण्यात वेगवेगळे रंग मिळसुन रंगपंचमी खेळात दंग होते, तेंव्हा नाशिक येथील एम.बी.ए. (फायनान्स)  पर्यंत शिक्षण घेतलेला एक तरूण नाव अविनश इघे  रस्त्यावर उतरून साध नारळपाणी विकुन  आपल्या  आयुष्यात रंग भरण्याचा प्रयत्न करीत होता!  एम.बी.ए ची डिग्री घेतलेला कुणीही तरूण आज अशा प्रकारे रसत्यावर उतरून अस काम करील का?  म्हणुनच त्याच मनापासुन अभिनंदन करणं फार गरजेच आहे.   अविनाशच्या कामाची ही बातमी गेल्या सोमवारी लोकसत्ता मधे वाचली; अविनाश आणि त्याचे प्राध्यापक सचिन पाचोरकरांशी फोन वरून बोलणं झालं, त्यांच तोंड भरून कौतुक केले, ती बातमी तुमच्या पर्यंत या ब्लॉग वरुन देताना मना पासुन खुप आनंद होत आहे.   अविनाशला आणि त्याचे प्राध्यापक सचिन पाचोरकरांना त्यांच्या पुढील वाटचालीत मोठं यश मिळो हीच सदिच्छा   व्यक्त करतो.  ती बातमी देणाऱ्या अभिजीत कुलकर्णींचे देखील अभिनंदन -

रसत्यावरून उतरून ’एमबीए" अविनाश बनला नारळ पाणीवाला!

नाव: अविनाश इघे; शिक्षण: एम. बी. ऎ फायनास,  व्यवसाय : रस्त्यावर नारळपाणी विक्री ! एम.बी.ए. बॉईज्च्या जॉब प्रोफाईलशी अगदीच विपरित अशा व्यवसायाची निवड करुन अविनाशने वेगळी वाट चोखाळली आहे. अर्थात, कुणा कृष्णन अय्यरच्या तुलनेत नारळपाण्याच्या गाडीपासून त्याच्या ‘थंडगार’ गोडीपर्यंत सर्वच बाबतीत अविनाशने जाणीवपूर्वक वेगळेपण जपले आहे. ‘कमोडिटी बिझनेस’मध्ये सर्वाधिक उलाढाल रस्त्यावर होत असल्याने नाशिकचा हा मराठी तरुण एका वेगळ्या अर्थाने रस्त्यावर उतरला असून त्यामागे व्यवसाय वृद्धीबरोबरच सध्याच्या पिढीला गरज असलेल्या स्वयंरोजगार निर्मितीला चालना देण्याचा देखील उद्देश आहे.

एखाद्या कॉर्पोरेट कंपनीतल्या अलिशान केबिनमध्ये बसून दुसऱ्याच्या व्यवसायाचे व्यवस्थापन करण्यापेक्षा स्वत:च काही तरी करायचा ध्यास नाशिकच्या आय.एम.आर.टी. महाविद्यालयातून एम.बी.ए. करतानाच अविनाशने घेतला.  याच महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या सचिन पाचोरकरांचा ‘सेल्फ एम्प्लॉयमेंट डेव्हलपमेंट’ हा संशोधनाचा विषय असल्याने उभयतांचे सूर चांगले जुळले. त्यातूनच पाचोरकरांच्या सल्ल्यानुसार अविनाशने एम.बी.ए. पूर्ण झाल्यावर चक्क नारळ पाणीवाला बनण्याचा निर्णय घेतला. देशातील कमोडिटी मार्केटमध्ये रस्त्यावरील व्यवसायांचा वाटा खूपच मोठा आहे. पण, हे क्षेत्र असंघटित आहे, शिक्षण, व्यवस्थापन याची या व्यावसायिकांना फारशी जाणीव नाही. त्यामुळे भलेही एखाद्या कोपऱ्यावर उभे राहून बडय़ा साहेबापेक्षा जास्त कमाई करणाऱ्या ठेलेवाल्याला आपला ‘ब्रँड’ रुजवणे मात्र जमत नाही. नेमकी हीच बाब हेरून पाचोरकरांच्या सांगण्यानुसार अविनाशने ‘ग्रीन स्ट्रीट’ हा ब्रँड निर्माण करण्याचे ठरविले व त्याची सुरुवात नारळ पाण्यासाठीच्या ‘ग्रीन कार्ट’ने केली.

रस्त्यावर इतर अनेक पदार्थ मिळत असताना नारळपाण्याची निवड करण्यामागे काही कारणे निश्चितच होती. एकतर ते नैसर्गिक आहे, शिवाय शरीराला अपायकारक नसल्याची त्याला सर्वमान्यता आहे. पण, नारळपाण्यात वेगळे काय देणार, या प्रश्नाला त्यांनी उत्तर शोधले ते थंडाव्याचे. त्यासाठी जाणकारांकडून तांत्रिक सहाय्य घेतले व ग्राहकासमोरच नारळ या कार्टवरच्या कंटेनरमध्ये उपडा केल्यावर अवघ्या पाच सेकंदात त्यातून थंडगार नारळ पाण्याचा पेला त्याच्या हाती मिळेल, अशी दक्षता घेतली. शिवाय, नारळ फोडण्यासाठी लोखंडी कोयता वापरण्याऐवजी यंत्राच्या सहायाने त्याला केवळ वरुन छिद्र केले जात असल्याने स्वच्छतेच्या दृष्टीने ते खूपच सरस आहे. शिवाय भरलेले आणि रिकामे झालेले नारळ ठेवण्यासाठी या कार्टलाच वेगवेगळे कप्पे असल्याने रस्त्याकडेला कचरा फेकण्याचा प्रश्न नाही. शिवाय, ज्या पेल्यात नारळपाणी दिले जाते तो देखील कागदी असल्याने ही ‘कोकोनट एक्स्प्रेस’ पर्यावरणपूरकही आहे. एकसारख्या डिझाईनच्या या कार्ट चटकन नजरेत भरतात. नाशिकधल्या काही महत्त्वाच्या नाक्यांवर, चौकांमध्ये सध्या कोकोनट एक्स्प्रेस दिसू लागल्या असून त्याला पहिल्याच टप्प्यात अपेक्षेहून चांगला प्रतिसाद असल्याचे अविनाश सांगतो. या गाडय़ांवर उभे राहून सेवा देणाऱ्या तरुणांसाठी विशिष्ट रंगाचा टी शर्ट आणि टोपी असा ड्रेस कोडही त्याने निश्चित केला आहे. येत्या काळात त्या त्या ठिकाणच्या स्थानिकांना व्यवसाय संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून अन्य शहरांमध्ये देखील ग्रीन कार्टची साखळी निर्माण करण्याचा त्याचा मानस आहे. स्वयंरोजगाराकडे दुर्लक्ष करुन केवळ कुठल्याशा नोकरीच्या मागे धावण्याची मानसिकता बाळगणाऱ्या मराठी तरुणांसाठी अविनाशचा हा प्रयत्न प्रेरणादायी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. या संदर्भात माहिती वा सूचना करण्यासाठी ighe.avinash@gmail.com या पत्त्यावर संपर्क साधता येईल.

सौजन्य: लोकसत्ता दिनांक १४ मार्च २०११ - अभिजीत कुलकर्णी, नासिक.

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=142683:2011-03-13-16-47-59&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2 

3 comments:

Anonymous said...

it's time to get the trade mark,and think for spreding this network,near to hospitals in Maharashtra and other states,
Next step is to contact D,R.D.O. /D.F.R.L. Mysore and try to have technology related to coconut products products and waste to turn in to coir bricks
Which has great demand in Denmark and other countries.
Right place to buy coconut is either Arsikeri and / or Palkol in A.P.Arsikeri is in Karnataka short of Banglore.
May he become King first step to become Samraat.

MeeKuchin said...

Very Good initiative!! I see similar thing in Pune in 'Nira Milel' braches. Not sure who owns it. You can get good experience from him also if you get to talk to the owner.
How do you plan to spread this in other cities? I can try to talk to my friends in Akola about this.

Tushar S. said...

very good even company like google,apple are started from garage & today they are the worlds biggest company.so dont stop you will get definitely succes...