Friday, March 25, 2011

माझं tweet.....मेरा भारत महान!

२४ मार्च, २०१०:  श्रीमंतीत जगभरात तिसऱ्या क्रमांकावर असलेले ‘गुंतवणूक गुरू’ वॉरेन बफे हे गेली तीन दिवस भारताच्या दौऱ्यावर आहेत.   क्रिकेटचे आपीयल, दिल्लीतील कॉमन वेल्थ (कलमाडी) ते २जी स्पेक्ट्रम आणि महाराष्ट्रतील आदर्श पासुन ते कालच्या पुण्याच्या हसन अली पर्त्यंत स्कॅम्स बद्दल जगभारात चर्चेत आलेल्या आपल्या देशा बद्दल त्यांच काय मत आहे हे माझ्या दृष्टीने फारच महत्वाच होतं.   आश्चर्य म्हणजे वॅरेन बफेंनी कुठल्याही स्कॅम्स बद्दल एक शब्दही न बोलता सरळ आपल्या देशाला "गुंतवणुकीसाठी नंदनवन" ठरवलं!   हे वाचून मला आनंद झाला पण खर तर विश्वासच बसेना!   त्या उलट त्यांनी सांगितल की भारतातील व्यवसायात येत्या काळात आणखी वाढ करण्यासाठी आपण उत्सुक आहोत.   भारतीय अर्थव्यवस्थेसंबंधी पुरेशी माहिती आणि अभ्यास करूनच आपण येथे आलो आणि येथे आल्यावर त्या सर्वाची खरी प्रचीतीही आपल्याला आल्याचे त्यांनी सांगितले.    ‘भारतीय बाजारपेठ ही विस्तारत जाणारी आणि दिवसागणिक अधिकाधिक समृद्ध बनत जाणारी आहे आणि अशा बाजारपेठेत व्यवसाय हा भरभराट करणाराच असेल.’  देशाची वाढती लोकसंख्या आणि त्यातही खरेदीक्षमता असलेल्या लोकांचा विशाल वर्ग पाहता, नवनव्या उत्पादनांची निर्मितीला वाव आणि संधी ही खूपच अमर्याद असल्याचेही ते या वेळी म्हणाले.
खर तर प्रत्येक विकसनशील देशात अशा प्रकारे भ्रष्टाचार झालेला आहे, कारण प्रत्येकाला स्वत:ची प्रगती हवी असते मग तो राजकारणी असो की सनदी अधिकारी, एखादा मोठा उद्दोगपती असो की साधा शिपाई!   आपण जेंव्हा साधा रस्ता क्रॉस करताना सिग्नल तोडतो आणि १०० रुपये दंड न भरता १० रुपये पोलिसाच्या हातात ठेवतो कारण आपल्याला आपले ९० रुपये वाचवायचे असतात!   प्रत्येकाला वाटतं की हीच संधी  आहे,  आणि  कुणी ही मागे रहायला तयार नसतो.  पण माहिती, तंत्रज्ञान आणि माहितीचा अधिकार या पासुन कुठली ही गोष्ट लपुन रहाणार नाही.   मिडियाचा प्रसार आज इतक्या मोठ्या प्रमाणात  आपल्या देशात झाला आहे की प्रत्येक गोष्ट ही सुर्यप्रकाशा इतकी स्पष्ट दिसणारचं.  लोकांमधे खुपच जागृकता आलेली आहे.  कुणी कितीही कोंबड झाकल तरी सुर्य हा उगवणारच!  ही माझी नुसतीच इच्छा नसुन हा माझा  विश्वास आहे.  आणि हे आपण रोज घडताना बघतं आहोत.    जाऊदे भष्टाचार हा आज आपला विषय नाही.

ही बातमी वाचत असताना दुसरी बातमी काल लोकसभेत भाजपच्या नेत्या सुषमा स्वराज आणि आपले पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यात झालेल्या शेरो शायरीच्या जुगलबंदी संदर्भात होती.  त्यातच देशाच्या आजच्या परिस्थितीवर एक चांगल कार्टुन दिसलं ते सुद्दा खाली देत आहे.

भाजपच्या सुषमा स्वराज पंतप्रधानांना उद्देशुन म्हणाल्या की - ' पंतप्रधान कधी आघाडीच्या अपरिहार्यतेचा फायदा घेतात, तर कधी पडद्याआड काय घडले, त्याची आपणास कल्पना नसल्याचा संभावित पवित्रा घेतात. त्यांच्या या पळपुट्या विधानांना लोक कंटाळले आहेत. लोक प्रश्न विचारतात, की पंतप्रधानांना कशाचीच कल्पना नसेल, तर पंतप्रधानपद भूषवण्याचा त्यांना नैतिक अधिकार तरी काय?

या मुद्द्याचा शेवट सुषमा स्वराज यांनी एक शेर ऐकवून केला.

तू इधर उधर की न बात कर
ये रहज्जुर की बात नही
तेरी रहबरी (नेतृत्व) का सवाल है.....!


सुषमा स्वराजांना पंतप्रधान मन मोहन सिंग यांनी सुद्दा शेरोशायरीच्या अनोख्या अंदाजात उत्तर दिलं ते असं.


माना के तेरी दीद के काबिल नही हूं मै,
लेकिन तू मेरा शौक तो देख
मेरा इंतजार (तपस्या) तो देख......!

पंतप्रधानांचे हे अपरिचित आणि काहीसे चकित करणारे रूप पाहून सारे सभागृह स्तिमित झाले. बराचवेळ सत्ताधारी बाजूकडील बाके वाजत राहिली; तर विरोधकांच्या बाकावर आश्चर्यकारक सामसूम होती अशी बातमी वाचली.

टीप:  राजकारणावर सहसा मी माझ्या ब्लॉग वरून लिहणार नाही अस ठरवलं होतं.  पण वरील दोन्ही बातम्या महत्वाच्या आहेत  म्हणुन त्याची दखल आपण घेऊया, आणि म्हणुया मेरा भारत महान! 

2 comments:

नरेंद्र प्रभू (Narendra Prabhu) said...

वा...! एखाद्या बतमीकडे अलिप्तपणे कसं बघावं याचा हे पोष्ट म्हणजे वस्तूपाठ आहे. आशेचा पहिला किरण दिसतो तोच दाट धुक्यात वाट हरवून जावी, पण त्याच वेळी हाताला धरून कुणी चल म्हणावं तसं वाटलं. धन्यवाद.

Tushar S. said...

khup chan aahe.