Saturday, April 2, 2011

माझी tweet.....क्रिकेट हा खेळण्याचा नसुन बोलण्याचा गेम!

१ एप्रिल २०११:  क्रिकेट हा खेळ बॅट व चेंडूने खेळण्याचा नव्हे तर तोंडाने बोलण्याचा विषय आहे अस ज्याला वाटतं तो मुंबईकर!  हे वाक्य आहे पु. ल. देशपांडे ह्यांच्या मी मुंबईकर, नागपुरकर की पुणेकर या कथेतलं;  ह्या   वाक्याचा अर्थ मला गेल्या आठ दिवसात खऱ्या अर्थाने समजला.   "चर्चा" करणे म्हणजे नेमकं काय असतं हे सुद्दा मला याच काळात पुर्णपणे समजलेल आहे.    प्रत्येक कॉलेजच्या नाक्या नाक्यावर, कॅन्टीन मधे,  चाळीं-चाळीं मधे असलेल्या कॉमन गॅलरीत, लोकलच्या गर्दीत, बस मधे,  ऑफिस मधे, बॉसच्या केबिनमधे जिकडे तिकडे एकच विषय क्रिकेट !   त्याच बरोबर एकाच विषयावर विविध चर्चा, परीसंवाद, भाषण, मुलाखाती, आरोप, प्रत्यारोप, भांडण, मारामाऱ्या, दगडफेक कशी होऊ शकते हे सुद्दा आता आपल्याला लवकरच कळेल!  अगदी उद्या टॉस कोण जिंकणार, भारताने टॉस जिंकला तर काय करावं, सचिनने कसे खेळावे, धोणीने कुणाला बॉलिंग द्यावी इथ पासुन ते भारत-पाक मैत्री असावी की युद्द!   बेटिंग वर तर हल्ली इतकं बोललं जात की जणू प्रत्येक पडलेला बॉल हा कुणी बुकीच्या इशाऱ्यावरच पडत असतो अस वाटावं जाऊद्या.  आणि शेवटी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामाने क्रिकेट हा खेळ त्यांच्या देशात सुरु केला तर त्यांच्या इकॉनोमीला चालना मिळेल का? इथ पर्यंत सगळे विषय आले. 
मित्रांनो क्रिकेट या विषयावर मी  खरच ब्लॉग लिहीणार नव्हतो, पण म्हटंल जर १२१ कोटींचा देश "क्रिकेट" या एका विषयावर अडकला असेल तर मी मागे राहून कसं चालेल.  आणि नाही म्हणायला मी सुद्दा एकेकाळी क्रिकेट खेळलेलो आहे, नुसतच खेळलो नाही तर भरपुर खेळलेलो आहे.  आणि खर सांगतो मी भारत-पाकची मॅच सुद्दा संपुर्ण पाहिली, आणि उद्या भारत-श्रीलंका मॅच सुद्दा संपुर्ण बघणार आहे!   तुमच्या सारखं मला सुद्दा वाटतं की मॅच अटीतटीचीच झाली पाहिजे,  एक चांगल क्रिकेट बघायला मिळालं पाहिजे आणि त्याहुनही त्याच्या प्रत्येक बारकाव्याविषयी चांगल विशलेषण ऎकायला मिळाल पाहिजे.  आणि शेवटी खुप मजा आली पाहीजे पण भारतानेच ही मॅच जिंकावी म्हणजे १९८३ नंतर आपण परत एकदा वर्ल्ड कप जिंकु, आणि हो त्यात आपल्या सचिनने शतक सुद्दा करावं अस मनोमन वाटतं.   सचिनची एक मुलाखत नुकतीच मला आयबीन7 वरुन बघायला मिळाली आणि तो इतका महान का आहे ह्याचं गुपित कळलं.  आज प्रत्येक तरूणाला आयुष्यात काहीतरी करायचं असेल तर त्याने ती सचिनची मुलाखत जरुर जरुर पहावी अस मी कळकळीच आव्हान करीन.

काल पर्यंत क्रिकेट संदर्भात एक मुख्य विषय खुपच चर्चेत आला आणि तो म्हणजे आपण क्रिकेटचा अतिरेक करतो का?  देशा पुढे अन्य विषय असताना आपण या विषयाला इतक महत्व का देतो.   देशाची अर्धी लोकसंख्या दारिद्र्यात जगत असताना आपण क्रिकेट ह्या इंग्रजी खेळाला महत्व का देतो?  क्रिकेटवर सगळॆ इतके पैसे उधळल्यानंतर देशी खेळांसाठी पैसे कोण  देणार?   मला वाटतं की कुठल्याही गोष्टीला अतिरेक हा वाईट - ह्याच जातीवंत उदाहरण म्हणजे "आयपीएल"!  म्हणुन मला  क्रिकेटच्या होणाऱ्या अतिरेकाच खरचं काही वाटत नाही.  क्रिकेटवरून आपण जसं वेडे होतो, तसे जर्मनीत जर्मन्स आणि इटलीत इटालियन्स आणि स्पेनमधे स्पॅनिश लोक खरतर संपुर्ण युरोप मधे आणि साउथ अमेरिकेत फुटबॉलमुळे होतात.   ह्या प्रत्येक देशात श्रीमंत लोक जसे आहेत, तसेच गरीब सुद्दा आहेत.    पण निदान टेनिस, बॉक्सिंग, आणि गोल्फ सारख्या एकाच खेळाडुला अतिश्रीमंत करणाऱ्या खेळा पेक्षा किमान २२ खेळाडूंना एकाच वेळी खेळायला आणि श्रीमंत होण्यासाठी संधी देणारा क्रिकेट चांगला म्हटंल पाहिजे.   मी तर म्हणेन की बॉलीवूड आणि क्रिकेटमुळे जर आपल्या देशाची ओळखं होणार असेल तर का नको?  प्रत्येक राज्यात गल्लोगल्ली भ्रष्ट राज्यकर्ते आणि नोकरशाहं पेक्षा मी तर म्हणेन प्रत्येक राज्यात एक अमिताभ आणि एक सचिन निर्माण झाला पाहिजे!    हे असं होतं पु. ल. म्हणात तेच खरं - बघा आता आपला विषय काय होता क्रिकेट!  आणि आपण चर्चा करीत करीत कुठे आलो.   जाउद्या तुम्हाला जास्त बोअर करीत नाही, चला तयारी करून आपल्या टीव्ही समोर बसुया..... तुम्ही सुद्दा तेच करा.   भारत हा वर्ल्ड कप जिंकणार आहे!  विजयाचे शिल्पकार असतील धोणी आणि सचिन त्यांचे चित्र देत आहे.  सेलिब्रेट करायला तयार रहा!   जय हो!! 

टीप:   क्रिकेटवर चर्चा म्हटंल्यावर मला काही वर्षांपुर्वी क्रिकेट विथ विजय मर्चंट हा रेडिओ वरुन दर रविवारी सुपारी २.०० वाजता होणाऱ्या कार्यक्रमाची खुपच आठवण होते!  फक्त दहा मिनीटांचा हा कार्यक्रम रेडिओवर कानात जीव आणून मी ऎकत असे!  आणि मला अजुन आठवत त्यांच्या दहा मिनिटांच्या बोलण्यावर लोक दहा दहा तास चर्चा करीत!  त्यांचा रुबाबदार चेहरा, धारदार आवाज, नेमके शब्द!  त्यांना शब्दांची उणीव कधीच भासली नाही.  Sir we miss you today!

6 comments:

Anonymous said...

Nitin,
thanx for posting a blog on the game of ward boy,compounders`and those ready to get operated may be they will operate the body of balls,
by posting the blog you have proved,
you are walking with the time forward,
about what you keep talking to 9Y0 our reades,
KEEP IT UP.

Nitin Potdar, Corporate Lawyer, Mumbai. said...

Your comment is not clear.

Anonymous said...

I had remember'd johney liver's old audio commedy,on cricket,
Players wardboys,Compounders,umpires,and batsman ,rungnachya jagee,operation sathee,
I hope you see it clear now,it's old joke,almost 25 years.

Nitin Potdar, Corporate Lawyer, Mumbai. said...

Got it. I did not get the meaning of 9YO.

Anonymous said...

9 stands for miracal,
y for young
O for observers,
by mistake without remembering you may not be in touch with such wordings,it was posted,but no more such things while commenting on your blog.
Regards.

Nitin Potdar, Corporate Lawyer, Mumbai. said...

Thanks for clarifying. Your comments are valuable and I guess everyone must be able to understand the same.