Sunday, April 3, 2011

माझं tweet.....धन्य तो धोणी!

३ एप्रिल २०११:    सगळ्यात प्रथम भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोणी आणि त्याच्या संपुर्ण टीम चे आणि त्याच बरोबर संपुर्ण देशातील क्रिकेट प्रेमीचे त्रिवार अभिनंदन!  Nothing succeeds  like success!  अशी एक म्हण आहे.   आता सगळ विसरुन प्रत्येक खेळाडूंचे देशभर कौतुक होईल त्यात आपण सहभागी होऊया आणि आनंदाने उद्दा या मोठ्या यशाची गुढी उभारूया!      

मी १९८३ची वर्ल्ड कप मॅच संपुर्ण पाहिली होती; आणि कालची सुद्दा पाहिली.  खरं सांगतो मला कालचा विजय हा जास्त आवडला कारण तो एका निश्चयाने मिळवलेला होता!  म्हणुन १९८३चा विजय कूठेही कमी होत नाही.  पण एक क्रिकेटप्रेमी म्हणुन आणि एकुणच कालच्या प्रत्येक खेळाडुचा खेळ आणि मॅचच्या आगोदर पासुन त्यांच्या वर्ल्डकप जिंकायचाच आहे!  आणि तो सचिनसाठी जिंकायचा आहे हा निर्धार मला खुपच मोलाचा वाटतो.  काल सचिन कडुन मोठी खेळी झाली नाही त्याच मला जितकं वाईट वाटलं त्या पेक्षा इतर खेळाडू म्हणजे गौतम गंभीर, विराट कोहली आणि कॅप्टन धोणी हे ज्या एकाग्रतेने, इर्षेने आणि जिद्दीने खेळले त्याच मला जास्त कौतुक वाटत.  काल जिंकल्यानंतर युवराज देखिल म्हणाला की हे यश सचिनसाठी आहे.   इतकं प्रेम जिव्हाळा आणि आदर मला आज पर्यंत कुठल्याही क्रिकेटपटू विषयी त्याच्या सहकार्यांकडुन दिसला नाही.   हे यश सचिनच आहे!  त्याच्या Focussed बॅटिंगच्या बरोबरच त्याच्या मृदु स्वभावाच आहे!  सचिन कुणाचा अपमान करु शकतो हे मी imagineच करु शकत नाही.   यश इथंच असतं!   काल वर्ल्डकप जिंकल्याच्या आनंदापेक्षा सचिनला दिलेला  शब्द आम्ही पाळू शकलो ही भावना प्रत्येक खेळाडुच्या मनात होती, आणि म्हणून त्यांनी वर्ल्डकप डोक्यावर घेण्यापेक्षा सचिनला खांद्यावर घेणं पसंत केलं.   ते ही मुंबईच्या वानखेडेवर म्हणजे सचिनच्याच घरी!   आणि विजयी कॅपटन या मिरवणुकीच्या मागुन चालत होता.   किती मोठा मान!  आणि मनाचा मोठेपणा!!  हे सचिन कधीही विसरू शकणार नाही.   दर चार वर्षांनी येणारा वर्ल्डकप हा फक्त एका खेळाडूसाठी!  हा विचारच मला खुप मोठा वाटतो.   आपण आपल्या खेळाडूंच्या लाईफस्टाईल विषयी टीकेच्या स्वरात बोलतो, पण मला वाटतं भारतीय क्रिकेट खऱ्या अर्थाने परिपक्व झालेला आहे.  आणि हे इतर खेळांमधे देखिल बघायला मिळालं पाहिजे.
आता थोडसं भारतीय क्रिकेटचा विजयी कर्णधार महेंद्रसिंग धोणी विषयी.   काल सेहवाग आणि सचिन आऊट झाल्यावर बॅटिंगसाठी युवराजच्या आधी तो आला आणि हव्या असलेल्या विजयी रन्स काढल्या.  त्याची ही कालची खेळी बघुन १९८३ साली कपिलदेव झिंबाबवे विरुद्द काढलेल्या १८० धावांची मॅरेथॉन आठवली!   दोघही कॅप्टन्स इनिंग्स खेळले अस म्हणायला काही हरकत नाही.   काल धोणीची बॉडी लॅंगवेज काही वेगळीच होती.  त्याच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आणि नजरेत निर्धार स्पष्टपणे दिसता होता.   धोणीला आपला नॅचरल गेम न खेळता मान खाली घालुन घोरपडीसारखं विकेटवर चिकटल्याशिवाय आपण जिंकणार नाही हे माहीत होतं.   यशासाठी कुठल्याही परिस्थितीला अनुरुप "ऍडॅप्टेशन" करणं म्हणजे काय हे त्याने काल दाखवून दिलं.    हेच शिकण्यासारखं असतं.   मॅचच्या सुरुवातीला विकेटच्या मागे पॅडबांधुन ५० ओवर्स त्याने विकेटकिपिंग  केली;    हजारो लोकांच्या प्रेशरसमोर श्रीलंकेच्या बॅटिंग लाईनअपला २५०च्या आसपासच रोखलं, त्यासाठी बॉलिंग आणि फिल्डिंगची सतत नवी रचना मांडायची.    यश मिळालं तर ते बोलर्सच आणि अपयश मिळालं तर ते कॅप्टनच्या बोलिंग सिलेक्शनचं ही सतत टांगती तलवार कुठल्याही कॅप्टनच्या डोक्यावर असतेच.   आणि भारतीय़ बॅटिंगच्या अत्यंत खराब सुरुवात - मलिंगाच्या पहिल्याच स्पेल मधे सेहवाग आणि सचिन पॅव्हेलिन मधे परत आलेले!  काय त्या माणसाला वाटलं असेल.  अशा अत्यंत कठिण समयी धोणीला इतर खेळाडुंना पुढे करुन अपयशाच खापर दुसऱ्यांवर सहज फोडता आलं असतं.  अस न करता तो स्वत: बॅट घेउन मैदानात उतरला!  डोक शांत ठेवून श्रीलंका फिल्डर्स आणि बॉलर्सचा संपुर्णमान ठेवुन, पाठीच्या दुखणं निमुटपणॆ सहन करीत धावा करीत राहीला आणि यश खेचुन आणलं.   हो मझ्या मते धोणीनेच कालच यश खेचुन आणलं.   त्याला गौतम गंभीर आणि विराट कोहलीसुदा तेवढेच महत्वाचे आहेत.   लंडन येथुन प्रसिद्द होणाऱ्या "सन्डे टेलिग्राफ" या दैनिकाने धोणी हा "आधुनिक आदर्श" आहे असा त्याचा गौरव केला आहे.    यष्टीच्या मागे असोत् की पत्रकार परिषदेत "मिस्टर कुल" म्हणजे धोणी हा प्रत्येक दडपणाखाली थंड डोक्याने सामोरे जातो आणि यश खेचुन आणातो.   नियमांच्या पलिकडे जाउन तो क्रिकेट खेळतो.  प्रत्येक खेळाडुला प्रोत्साहन देण्यात कुठेही तो मागे राहत नाही.   कठीण आणि निर्णायक वेळी जो आपलं डोकं शांत ठेवून एका निश्वयाने यश मिळवतो तो खरा कर्णधार!   म्हणुन धन्य तो धोणी!!  बॉस तुला त्रिवार सलाम!!!

काल प्रत्येकाच्या तोंडात मां तुझे सलाम हे गाणं काल होतं!  एक क्रिकेट खेळ हा १२१ कोटींच्या देशाला दिवाळी साजरी करायला लावतो ह्याला यश म्हणता.   सगळ्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!!

2 comments:

Anonymous said...

Nitin,
Maharashtra too needs,
Captain like Dhoni,
in every field of govt. & private field,who is selfless,with eye on target,and hands working for victory of the state,and not only of own,like our thinkers,and self or made by godfather kind of people work exactly 180 d.otherway round,result is SUFFERING MAHARASHTRA,
Dhoni,paid perfect respect to his words,by not having self mirwanook,WAE NEED TO LEARN FROM THE WORLD AND PEOPLE LIKE DHONI.
BAMDDA REALLY GREAT HAIGAA SIRJEE.

Anonymous said...

क्रिकेट विश्व कप विजयावरचा तुमचा ब्लोग वाचला खूप चांगला लिहिला आहे, मीही सर्व खेळांचा आनंद घेत, क्रिकेटचाही घेतला, अगदी मनापासून..........मनात आल्याशिवाय राह्त नाही आपण हे असं यश हा देश म्हणून क़शा क़शात मिळ्वू शक़तो ? क्रिकेटच्या पलिकडे जावून आपण देशाचा एक़त्रित विचार किती वेळा क़ऱतॊ हा प्रश्न अनुत्तरित राह्तॊ आणि मनाला त्रासही देतो.............? नव - वर्षच्या शुभेच्छा !