Saturday, April 23, 2011

माझं Tweet.....नाशिकच्या "ग्रीन स्ट्रीट" नंतर पुण्याचं "ग्रीन बिल्ड"

२३ एप्रिल २०११:   गेल्याच आठवड्यात नाशिकचे प्राध्यापक सचिन पाचोरकरांची व त्यांचा शिष्य अविनाश इघे यांची मुंबईत भेट झाली.  त्यांनी तयार केलेल्या "ग्रीन स्ट्रीट" म्हणजे कॉर्पोरेट स्टाईलने नारळपाणी थंड करुन २५० एमएलच्या ग्लास मधुन थेट देण्याच्या संकल्पनेच तोंडभरुन कौतुक आपण करायला पाहिजे हे मी माझ्या ब्लॉग वरुन दिनांक २१ मार्च रोजी लिहिलेल होतं.   सचिन पाचोरकरांना हे करताना आलेले अनुभव म्हणजे मॅनेजमेंन्टचे किमान १०० नविन धडे होऊ शकतील.   तरी रसत्यावर उभं राहून नारळ विकायला मराठी तरूण मिळत नाही;  आपली मुल आठ तासांची शिपायाची नोकरी करतील, पण मालक बनुन पाच तास सुद्दा काम करणार नाही ही त्यांची मोठी खंत त्यांनी बोलुन दाखवली.   तरीही त्यांनी प्रयत्न सोडलेले नाही.   मी म्हटंल धीर सोडू नका!  त्यांचा व्यवसाय संदर्भात थोडी चर्चा झाली.  त्यांना शुभेच्छा देऊन मी त्यांचा निरोप घेतला, आणि ते नाशिकला परत गेले.    

ती बातमी ताजी असताना आज महाराष्ट्र टाइम्सने पुण्याच्या व्यवसायाने इंटेरियर डिझायनर आणि कन्सल्टन्सीचा दोन दशकांचा अनुभव असणाऱ्या प्रदीप जोशी आणि शिल्पा जोशी यांनी "ग्रीन बिल्ड"  नावाने पाण्याचा शंभर टक्के बचत करणारी आणि वापरण्यास सोपी असणारी तसेच पर्यावरणपूरक उत्पादने विकसित करण्यात आलेल्या या उत्पादनांना पेटंट देखील मिळाले आहे.   त्यांचा रिपोर्ट खाली देत आहे.

मराठी तरूण हे उद्दोगात "ट्रेडिंग" पेक्षा "मॅन्युफ्कचरिंग" मधे जास्त काम करताना दिसतात, कारण त्यांच्या कडे टेक्निकल ज्ञान आणि कल्पनाशक्ती भरपुर असते;  कुठलाही प्रोजेक्ट प्रोफेशन्ली बाजारात  आणुन कमर्शियली यशस्वी करणं हे महत्वाच असतं.  त्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे उद्दोगाच्या प्रत्येक क्षेत्रात म्हणजे भांडवल, मॅन्युफ्कचरिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग मधे प्रोफेशनल अप्रोच ठेवणं गरजेच आहे.
"घर बांधा सिमेंट, वाळूशिवाय!"

महाराष्ट्र टाइम्स, पुणे:  बिल्ड फास्ट, इको-रेंडर, ग्रीन आउट, ग्रीन रिपेयर, ग्रीन सील आदी बांधकामास उपयुक्त असणारी पर्यावरणपूरक आणि पाण्याची शंभर टक्के बचत करणारी उत्पादने बनविण्यात पुण्यातील 'ग्रीन बिल्ड प्रॉडक्ट' कंपनीला यश आले आहे. या उत्पादनांच्या आधारावर कंपनीच्या व्यवसायात गेल्या काही वर्षांत प्रचंड वेगाने वाढ झाली आहे. बांधकाम क्षेत्राला सध्या कुशल मनुष्यबळाची चणचण असून, ग्लोबल वॉर्मिंगमुळे 'ग्रीन' उत्पादने वापरा, असा आग्रह धरला जात आहे. ग्रीन बिल्डने विकसित केलेल्या उत्पादनांमुळे पाण्याची बचत होण्याबरोबरच बांधकाम खर्चात प्रति चौरसफूट आठ रुपयांपर्यंत खर्च कमी होतो, असे कंपनीचे म्हणणे आहे. बी. जी. शिर्के, परांजपे स्कीम, मगरपट्टा सिटी, द कन्स्ट्रक्शन ग्रुप आदी या कंपनीचे ग्राहक आहेत. उत्पादने गुणवत्तापूर्ण असल्याने कंपनीच्या उत्पादनांचा उपयोग नवी दिल्लीतील एअरपोर्टच्या तिस-या टर्मिनलच्या बांधकामात करण्यात आला होता. टर्मिनल तीनचे बांधकाम करण्याचे कंत्राट शापूरजी अँड पालमजी यां कंपनीला मिळाले होते. या कंपनीने ग्रीन बिल्डकडून बिल्ड फास्टच्या तीनशे बॅग घेतल्या होत्या.

व्यवसायाने इंटेरियर डिझायनर आणि कन्सल्टन्सीचा दोन दशकांचा अनुभव असणाऱ्या प्रदीप जोशी आणि शिल्पा जोशी यांनी ग्रीन बिल्डची स्थापना २००५ मध्ये केली. अवघ्या सहा वर्षांत कंपनीने चारपेक्षा अधिक उत्पादने विकसित केली आहेत. पाण्याचा शंभर टक्के बचत करणारी आणि वापरण्यास सोपी असणारी तसेच पर्यावरणपूरक उत्पादने विकसित करण्यात आलेल्या या उत्पादनांना पेटंट देखील मिळाले आहे. बांधकामासाठी पर्यावरणपूरक उत्पादनांची गरज भासणार आणि अशा उत्पादनांना मागणी येणार हे लक्षात घेऊन, अशा प्रकारची उत्पादने विकसित करण्याची कल्पना पुढे आली. कंपनीच्या तांत्रिक संचालिका शिल्पा जोशी म्हणाल्या, की 'पर्यावरणाला धोका पोचणार नाही, असे बांधकाम व्हावे असे वाटते.' कंपनीकडे कोटिंग आणि रिपेयरसारखी उत्पादने आहेत. पॉलिमर, बॉटम अॅश, रिन्युएबल मिनरल्स आदी घटकांपासून कंपनी उत्पादन तयार करते. बॉटम अॅश आणि फ्लाय अॅश या औष्णिक वीज निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या कोळश्यापासून, तसेच सिमेंट उत्पादनादरम्यान निर्माण होते. या उत्पादनांमध्ये वापरण्यात येणाऱ्या घटकांमुळे पाणी, सिंमेंट आणि वाळू यांचा वापर टाळला जातो. 'उत्पादनांचा थेट वापर करता येतो आणि कोणत्याही मनुष्यबळाची गरज भासत नाही,' असे जोशी यांनी सांगितले.

' सुरुवातीस बांधकाम व्यावसायिकांचा दृष्टिकोन सकारात्मक नव्हता. तो बदलण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले,' असे त्या म्हणाल्या. कंपनी २००८ मध्ये फायद्यात आली. पुण्यात २००८ मध्ये राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा झाल्या होत्या. याकाळात पुण्यात बरीच नवी हॉटेल्स बांधण्यात आली. दरम्यान, बांधकाम क्षेत्रास कुशल कामगारांची चणचण भासत होती. ग्रीन बिल्डची उत्पादने वापरण्यास कुशल कामगारांची गरज भासत नाही. त्यामुळे हॉटेल सयाजी आणि हॉटेल रॉयल ऑर्किड बांधणाऱ्यांनी आमची उत्पादने वापरली.

सौजन्य महाराष्ट्र टाइम्स, राधिका पी. नायर । पुणे

6 comments:

MeeKuchin said...

I think statement that 'Marathi youth tends to avoid hard work and prefers only 8 hours a day duty' is only partially true. One reason behind that might be that we marathi people do not migrate for work. I bet there are so many people trying to find work in Varhad , Vidarbha, Konkan region. But because of many reasons we do not migrate to cities like Mumbai, Pune or even Nagpur and prefer to stay idle in our villages.

Nitin Potdar, Corporate Lawyer, Mumbai. said...

तुमच म्हणं अगदी बरोबर आहे. पण वऱ्हाड, विदर्भ, आणि कोकणातल्या तरूणां पर्यंत पोहोचता आलं तर सचिन पाचोरकरांना आनंदच होईल. एखादी संघटना किंवा ग्रुप असेल तर त्यांना पाचोरकर सरां विषयी जरुन सांगा..... धन्यवाद.

Nitin Potdar, Corporate Lawyer, Mumbai. said...

तुमच म्हणं अगदी बरोबर आहे. पण वऱ्हाड, विदर्भ, आणि कोकणातल्या तरूणां पर्यंत पोहोचता आलं तर सचिन पाचोरकरांना आनंदच होईल. एखादी संघटना किंवा ग्रुप असेल तर त्यांना पाचोरकर सरां विषयी जरुन सांगा..... धन्यवाद.

Hobasrao said...

Surely will try to find if there is any such Organisation. Thanks!

Anonymous said...

Nitin
our nariyalpaneewall must contact,CB,FOR COCONUT DEVLOPMENT,abd naariyalpanee yaatra at far corners of india,for demo publicity.
reaching to groups manot be of use,as they will just use him,
he needs to have publicity drive for good.
Mr Limaye is the Chairman of CB KOCHI.
Lets see if taatyaa helps him in anyway.

Anonymous said...

Pepsi has started vending,GLUCOS | FOR Rs 5,in seal'd glass,