Tuesday, June 21, 2011

माझं tweet.....पाटीपासून आयपॅडपर्यंत…

२१, जुन २०११:   आपल्यापैकी प्रत्येकाच्या लिखाणाचा प्रवास हा दगडी पेन्सिलने पाटीवर लिहण्यापासून कालच्या ईमेल वरून SMSsवर आणि आजच्या आयपॅडवर पोहोचलेला आहे.  ह्या प्रवासाच सुंदर वर्णन "पाटीपासून आयपॅडपर्यंत" या लेखात शनिवारच्या लोकसत्तेच्या लोकरंग पुर्वणीमधुन अपर्णा मोडक या लेखिकेने केल आहे, त्यांचे धन्यवाद आणि अभिनंदन  (त्यांच्या लेख खाली दिला आहे).   हा लेख वाचताना नकळतपणे मला माझ बालपण डोळ्यासमोरुन गेलं.   वकिल असल्यामुळे खर सांगेन खोट सांगणार नाही - लिहीण्याबरोबर मला दगडी पेन्सिल खायला आवडत होती!  मला माह्ति आहे तुमच्या पैकी कित्येकाला तशी सवय असणार.   पुढे "नटराज" ब्रॅण्डची काळी आणि लाल पट्यांची पेन्सिल आणि कॅम्लिनचा कंपॉस बॉक्स, आणि नंतर "Reynold"चे बॉलपेन वगैरे वगैरे.  

आपण सारे एकाच प्रकारच्या दगडी पेन्सिलने अक्षरं गिरवायला शिकतो तरी प्रत्येकची लिहायची पद्दत स्वभावाप्रमाणे वेगवेगळी होत जाते.   पुढे काढलेल्या अक्षरांच्या शाईपेक्षा त्यांच्या मागे दडलेले अर्थ गडद होत जातात, तर कित्येक वेळा उडणाऱ्या शाईबरोबर शब्दांचे संदर्भ बदलत जातात.  काय गंमत आहे बघा, लहापणी आपलं अक्षर वेडवाकड असलं तरी त्याचा अर्थ सरळ आणि सोपा असतो.   त्याच बरोबर लहानपणी सरळ रेषेत लिहीणारे मोठे झाल्यावर सरळ वागतीलच अशी खात्री नसते.   लहानपणी आपण ठरवून देखिल जोड-अक्षर नीट काढु शकत नाही आणि काळांतराने जोड-अक्षर जरी सुंदर काढायला शिकलो तरी काढलेल्या अक्षरातुन माणस जोडायला आपण नेहमी कमी पडतो.   कित्येकांचे अक्षर स्वच्छ असले तरी त्याच्या मागचा विचार   शुध्द नसतो!  कदाचित "अक्षर" सुंदर काढाण्यावर आपण जितका भर देतो तितका भर आपण अक्षरापासुन तयार होणाऱ्या शब्दांच्या सुंदरतेवर देत नसु.  आज तंत्रज्ञानाच्या जोरावर कंप्युटर स्वच्छ आणि सुंदर लिहायला मदत करतो,  त्यातुन प्रकट होणारे विचार लाखो लोकांपर्यंत एका क्लिकवर पोहोचवता येतात.   प्रश्न सुंदर आणि स्वच्छ विचारांचा आहे?

Thursday, June 16, 2011

माझं tweet.....गांधीजी आम्हाला क्षमा करा!

१६ जुन २०११:   एखादी बातमी वरवर छोटी वाटली तरी ती कुठेतरी मनावर खुप खोल घाव करुन जाते!  अस्वस्थ करते!!  महात्मा गांधींचा त्यांच्या सेवाग्राम आश्रमातून चष्मा चोरीला गेला ही बातमी वाचली आणि खुपच वाईट वाटलं.   स्वातंत्र्यानंतर देशाला विकून काही लाख कोटी काळा पैसा स्विस बॅंकेत सत्तेत असलेल्या लोकांनी पाठवला,  ही मंडळी देशाला रोज विकुन खात आहेत!   त्या पेक्षाही गांधीजींचा चषमा चोरीला जाणं ही फार मोठी भयंकर घटना आहे अस मी मानतो.   प्रत्येक भारतीयांची मान शरमेने खाली घालायला लावणार हे कृत्य.   महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, वीर सावरकर, भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस................. अशा शेकडो लोकांच्या अपार त्यागातुन आणि बलिदानातुन आज आपली १५० कोटी जनता मोकळा श्वास घेत आहे.   खरं तर या थोर पुरुषांच्या  शिल्लक असलेल्या प्रत्येक गोष्टी आपण देव्हाऱ्यात ठेवाव्या इतक्या त्या पवित्र आहेत.    मला अजुनही एक भोळी आशा आहे - वाटतं की लवकरच दुसरी बातमी येईल की गांधीजींचा चष्मा हा चोरीला गेला नसुन तो कुणीतरी साफ करण्यासाठी नेला होता त्याने तो परत आणला आहे, पण झालेल्या कृत्याबद्दल त्याने गांधीजींची माफी मागितली!   

Sunday, June 12, 2011

माझं Tweet.....यश म्हणजे नक्की काय असतं?

११ जुन २०११: काल मला एक ईमेल आला तो पाठवणाऱ्याचे नाव व पत्ता काढुन खाली देत आहे.   त्यात त्यांनी जे प्रश्न मला विचारले   आहेत  तसे प्रश्न मला आधी बऱ्याच लोकांनी विचारलेले होते, म्हणु त्यांना उत्तर त्यांच्याच ईमेल मधे द्यायचा प्रयत्न केला आहे.  बघा पटतं का?

"श्री. नितीन पोतदार यांस,

तुमची http://www.myniti.com/ आणि माझं Tweet नेमाने वाचते, लोकसत्ता अर्थवृतान्तची नियमीत वाचक आहे मी. 

पण सगळी पुस्तके आणि न्युजपेपर्स फक्त successful businessmen वर लिहितात.  माझ्या डोळ्यासमोर एकट्या ******** मधे उध्योजक होण्यासाठी प्रयत्न करणारे ४० ते ५० वयोगटातील कमीत कमी १२ तरूण आहेत जे गेली १५ ते २० वर्ष उद्दोजक होण्यासाठी झटत आहेत.  पण तरीही म्हणावे तसे यश नाही.  अशा उद्दोजकांवर पुस्तक कोणी लिहील का?  त्यातुनही काही धडे घेता येणार असतील तर?

उत्तर:   जसे यशस्वी उद्दोजकांकडुन उद्दोजकतेचे धडे मिळू शकतात तसेच धडे किंबहुना जरा जास्त धडे अपयशी उद्दोजकांकडून मिळू शकतात.  काय करावं या पेक्षा काय करू नये ची यादी नेहमी मोठी असते.   उदा.  आपल्या मुलांना परिक्षेत चांगल यश मिळवण्यासाठी अभ्यास कर इतक सांगितल तरी पुरे होऊ शकतं.  आणि चांगला हुशार मुलगा इतक सांगितल्यावर पहिल्या नंबर काढतो;  चांगला अभ्यास कर अस सांगताना आपण मुलांना सांगतो की, (१) सर्व प्रथम उत्तर पत्रिकेत आपला नंबर बरोबर लिहुनच उत्तरं लिहायला सुरुवात कर, (२) प्रश्न नीट वाचुन मगच उत्तर लिहायला सुरुवात कर, (३) अक्षर नीट काढ, (४) वेळेच भान ठेव, जास्त खाडा खोडी करू नको, (५) उत्तर मुद्देसुद लिहायचं. (६)  पेपर संपायला थोडा वेळ ठेवुन सगळ्या प्रश्नांची उत्तर लिहीली आहेत की नाही हे तपासुन घे, (७) मुख्य म्हणजे कुणाचीही कॉपी करु नकोस, नापास झाला तरी चालेल.   अपयशातुन शिकण्यासारखं खरचं खुप असतं म्हणुन कुणी नुसतं अपयशावर पुस्तक लिहिणार नाही, कारण शेवटी प्रत्येकाला यश मिळवायच असतं.   आपण नेहमी उगवत्या सुर्यालाच नमस्कार करतो, कारण सुर्योदयापासुन आपल्याला उर्जा मिळते;   सुर्यास्त बघताना आपला जीव व्याकूळ होतो!  मन उदास होत,  कारण सुर्यास्त आपल्याला उर्जा देत नाही.    

Tuesday, June 7, 2011

माझं Tweet.....कॅम्लिनची शाई आणि कॅम्पसची वही.

७ जुन २०११:   गेल्या आठवड्यात दांडेकर कुटूंबाच्या कॅम्लिन कंपनीने जापानच्या कोकियो या बलाढ्या कंपनी बरोबर जॉईन्ट वेंचर करार केला, त्याची सविस्तर माहिती दैनिक लोकसत्ताच्या अर्थवृतान्त मधे काल म्हणजे ६ जुन रोजी प्रसिद्द झालेली आहे.   ह्या करारासाठी दांडेकर कुटूंबियांना आणि कॅम्लिन कंपनीला संपुर्ण डील तयार करण्यापासुन ते कोकियो बरोबर सविस्तर चर्चाकरुन करार करण्यासाठी लागणारी कायदेशीर बाजु संभाळायच काम  माझ्या फर्म तर्फे मी पाहिलं.   हा करार म्हणजे माझ्या दृष्टीने एक "क्लासिक"   जॉईन्ट वेंचर आहे.   मी नेहमी म्हणतो की आजच्या स्पर्धात्मक जगात टिकुन रहायचं असेल तर आपण जिथं कमी पडतो तिथं इतरांच सहकार्य घेण्यात कसलाही कमीपणा नसतो;   तेंव्हाच १+१=११ हे करता  येतं.     

आज   टेकनॉलॉजी  रोज बदलते आहे,  मार्केटिंगचे स्ट्राटेजी रोज बदलत आहे, नव-नविन उत्पादन मार्केट मधे येत आहेत अशा वेळी आपल्या उत्पादनांना complimentary products शोधले पाहिजे म्हणजे उत्पादनांचा पुर्ण बुके आपल्या कस्टमर्सला देता येतो.   ज्यांच्या कडे रिसर्च करुन नविन प्रोडक्टस तयार करण्याची क्षमता नसेल, किंवा नविन प्रोडक्टस मॅन्युफॅचर करण्यासाठी लागणारे भांडवल नसेल तर त्यांनी एखाद्या मोठ्या कंपनी बरोबर सहकार्याचा करार करणे क्रमप्राप्त आहे.   

कॅम्लिन कडे शाई कलर्स आणि स्टेशनरीचे काही उत्पादन वगळता इतर कुठलेही प्रोडक्टस नाही.  म्हणुन कॅम्लिनच्या शाई आणि कंपॉस बॉक्स बरोबर कोकीयो कंपनीच्या "कॅम्पस" नोटबुक्स आल्या तर त्यांना मोठ मार्केट सहज मिळवता येईल.   कोकीयो कंपनी ही जपानची नोटबुक्स बनविणारी सगळ्यात मोठी कंपनी आहे.   भारता मधे ब्रॅण्डेड नोटबुक्स/ वह्यांच मार्केट तयार होत आहे.   सध्या भारता मधे शिक्षणाला मुलभुत अधिकार मिळाल्याने शिक्षणाच महत्व आपल्या देशात रोज वाढत आहे.  अशा वेळी नुसत शाई आणि कलर्स या दोन प्रोड्क्ट्स वर कॅम्लिन आणखी मोठी होऊ शकली नसती.  त्याच बरोबर त्यांची शाई आणि कलर्स हे जागतिक बाजारपेठत जाणं गरजेच होत.  कोकिय़ो त्यांची नोटबुक्स भारता मधे कॅम्लिन मार्फत तर कॅम्लिनची शाई आणि कलर्स कोकियो मार्फत जपान आणि इतर देशांमधे विकु शकतील.  हे दोघांसाठी win win आहे.   ह्या सहकार्याचे इतर गोष्टी लोकसत्तेत प्रसिद्द झालेल्या अहातेच.   आपल्या कंपनीचे ब्रॅण्ड आणि उत्पादन हे जागतिक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात न्यायचे असेल तर विविध प्रकारच्या सहकार्याचे करार करावेच लागती त्याला पर्याय नाही. हे करत असताना संपुर्ण मालकी हक्क सुद्दा सोडावे लागतील, नव्हे इतरांनी ते तसे सोडले देखिल आहेत.  छोट्या कंपनीचे पुर्ण मालक राहण्यापेक्षा मोठ्या जागतिक कंपनीत छोटी भागिदारी म्हणजे वाईट अस समजण्याच कारण मुळीच नाही.  जगातल्या मोठ मोठ्या कंपन्यांचे मुळ मालक कंपनी जस जशी मोठी होत जाते तशी त्यांची मालकी कमी कमीच होत जाणार.  भारतातल ताज उदाहरण म्हणजे अगदी रिलायंसच्या मुकेश अंबानींनी देखिल ब्रिटिश पेट्रोलियमला त्यांच्या २३ तेल आणि गॅस ब्लॉक्स मधील ३०% शेअर विकला.  त्या विषयी जाणकारांनी काय म्हटंल आहे ते खाली बघा.... 

Saturday, June 4, 2011

माझं Tweet.....वॉशिंग्टन पोस्टवर - अस्सल मराठी माणुस अशोक खाडे

५ जुन २०११:  दिनांक ३० मे च्या Economic Times मधे पहिल्या पानावर "Dalit Entrepreneurs celebrate the launch of Dicci's Mumbai chapter ही बातमी वाचली, त्यात माझे मित्र श्री. अशोक खाडेंचा आदराने उल्लेख होता ......."Look ahead, the future belongs to us," says Ashok Khade, managing director of the Rs 550-crore DAS Offshore Engineering. Khade, who employs 4,500 people, of which 152 are BTech engineers.   Dicciची मिटिंग हॉटेल ताज मधे आयोजित केलेली होती, तिथ उपस्थित एका पत्रकाराने अशोक खाडेंना विचारल की तुम्हाला सरकारकडुन  concession नको का?  त्यावर नम्रपणे खाडे उत्तरले की आम्हाला कुठल्याही प्रकारच Concession किंवा Commission नको, आम्हाला पाहिजे चार शब्दांच Appreciation!  The Economic Times या भारतातील आघाडीच्या इंग्रजी बिझनेस वृतपत्रात पहिल्या पानावर नाव येण्याला कॉर्पोरेट जगात "arrived" असं म्हणतात.    त्यांना अभिनंदनाचा फोन काही केल्या लागला नाही म्हणुन मनापासुन वाईट वाटलं.   त्या नंतर मी कामात गर्क झालो आणि फोन करायचा राहुनच गेला.   नंतर म्हटंल त्यांच्या विषयी एक छानसा ब्लॉग लिहीन ते ही राहुन गेलं.  आणि आज अचानक त्यांच्या सेक्रेटरीने मला इमेल वरून एक बातमी पाठवली.   इमेल उघडुन बघतो तर अशोक खाडें बद्दल The Washington Post वर आलेली detailed बातमी.   ताबडतोब  त्यांना फोन लावला त्यांचे मना पासुन अभिनंदन केले त्यांच्याशी सविस्तर बोललो आणि हा ब्लॉग लिहायला घेतला.  अशोक खाडें आणि त्यांच्या बंधुंनी Das offshore मधे काय केल आहे ते The Washington Postच्या  शब्दातच  तुम्ही वाचलेल बरं.    मुंबईत बांद्रा रेलवे स्टेशन ते बीकेसी दरम्यान पहिला "स्काय वॉक" बांधणारे अशोक खाडे!